S. Jaishankar:तुमची समस्या ही जगाची समस्या असू शकत नाही, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी युरोपला फटकारले, चीनला उत्तर देण्यासाठी भारत सक्षम

मेरिका आणि युरोपीय देश इराणच्या तेलाला बाजारात का आणू देत नाहीत, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. व्हेनेज्युएलला बाजारात तेल का विकू देत नाहीत, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. अमेरिका आणि युरोपने आमच्याजवळचे सगळे तेलाचे स्रोत शोषून घेतले आहेत आणि ते सांगतायेत की बाजारात जाऊ नका, आमच्याकडे या आम्ही चांगला करार मिळवून देऊ.

S. Jaishankar:तुमची समस्या ही जगाची समस्या असू शकत नाही, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी युरोपला फटकारले, चीनला उत्तर देण्यासाठी भारत सक्षम
S jaishankar slammed EuropeImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 9:59 PM

ब्रातिस्लावा – युरोपची समस्या ही युरोपची (Europe)आहे, ती जगाची समस्या होऊ शकत नाही, या शब्दांत परराष्ट्रमंत्री एस जयशकंर (S Jaishankar)यांनी युरोपला फटकारले आहे. युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर जर भारत आणि चीन तटस्थ (India and China)असतील, तर याचा अर्थ आम्ही एकत्र आहोत असा होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. जर उद्या चीनसोबत भारताची तणातणी झाली, तर भारताला कुणाचा पाठिंबा मिळणार नाही, या भ्रमात युरोपीय देशांनी राहू नये असेही जयशंकर यांनी युरोपीय राष्ट्रांना सुनावले आहे. ब्रातिस्लावा य़ेथील एका संमेलनात जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट करताना युरोपीय राष्ट्रांना खडे बोल सुनावले. आम्हाला एका संघर्षात मदत मिळेल म्हणून आम्ही दुसऱ्या एखाद्या संघर्षात सामील व्हावे, हे कसे शक्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जग अशा प्रकारे चालत नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यापुढे जात आशियात यापूीर्वी अशा अनेक घटना घडल्या, त्यावेळी युरोपिय राष्ट्र मौन बाळगून होती, याची आठवणही त्यांनी करुन दिली.

व्यावसायिक करारांना युद्धाच्या नजरेतून पाहणे चुकीचे

एका प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की – जेव्हा तुम्ही गॅस खरेदी करता आणि त्याचे तुम्ही पैसे देता, याचा अर्थ रशियाला गैरजबाबदार हरकतींसाठी देता असा होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे भारत तेल खरेदी करतो आणि त्या बदल्यात पैसे देतो. या व्यावसायिक कराराकडे दुसऱ्या परिप्रेक्ष्यातून पाहणे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

अमेरिका आणि युरोपच्या मनमानीवरही भाष्य

भारताने सध्या गव्हाची निर्यातबंदी केली आहे. चीनने भारताच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. जगभरात याविषयी अपप्रचार करण्यात येतो आहे. याचाही समाचार जयशंकर यांनी घेतला. भारताने या वर्षभरात २३ देशांना गहू निर्यात केल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिका आणि युरोपीय देश इराणच्या तेलाला बाजारात का आणू देत नाहीत, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. व्हेनेज्युएलला बाजारात तेल का विकू देत नाहीत, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. अमेरिका आणि युरोपने आमच्याजवळचे सगळे तेलाचे स्रोत शोषून घेतले आहेत आणि ते सांगतायेत की बाजारात जाऊ नका, आमच्याकडे या आम्ही चांगला करार मिळवून देऊ. ही योग्य भूमिका नसल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

हे युद्ध संपावे हीच आमची भूमिका

रशिया-युक्रेन युद्धाच्या पहिल्या दिवसापासून भारताची भूमिका ही युद्ध संपावे अशीच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही देशांनी चर्चेतून शांततेच्या मार्गावर चालायला हवे. युद्ध हा पर्याय असू शकत नाही. रशिया-युक्रेन युद्धात यूएनमध्ये झालेल्या मतदानावेळी भारताने कुणाचीच बाजू घेतली नाही, त्यावरही युरोपीय राष्ट्रांनी आक्षेप घेतला, असेही जयशंकर यांनी सांगितले.

यापूर्वी अमेरिकेच्या टू प्लस, टू चर्चेच्या वेळी तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावर त्यांनी अमेरिकेला घेरले होते. जयशंकर म्हणाले होते की भआरत रशियाकडून महिनाभरात जेवढे तेल विकत घेतो, त्याच्याहून अधिक तेल युरोप रशियातून एका दुपारपर्यंत खरेदी करतो. त्यावेळी त्यांनी अमेरिकेला ऐकवले होते की- जर तुम्ही रशियाशी भारताच्या ऊर्जाखरेदीबाबत चर्चा करत असाल तर माझा सल्ला आहे की तुम्ही आधी युरोपवर लक्ष द्या.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.