What India thinks today | आरीफ मोहम्मद खान म्हणाले, सर्व पुस्तकांचं सार एकच, दुसऱ्यांचं भलं करा
केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान म्हणाले, भारत नेहमीसाठी ज्ञानाचं भांडार राहिलेलं आहे. इराण आपल्या वैभावासाठी, चीन कौशल्यासाठी, रोमन सुंदरतेसाठी तर तुर्की बहादुरीसाठी ओळखलं जातं. तसंच भारत हे ज्ञान आणि प्रज्ञा यांना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखलं जात असल्याचं ते म्हणाले.
भारतातील नंबर एक न्यूज नेटवर्कनं 9 च्या वतीनं व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट आयोजन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), केंद्रीय श्रम, रोजगार व वनमंत्री भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांनीही आपलं मत व्यक्त केलं. Tv 9 ग्लोबल समिट व्हॉट इंडिया थिंक टुडेमध्ये केरळचे राज्यपाल म्हणाले, आपल्या धर्मात बऱ्यात पुस्तक ( Book) आहेत. या सर्व पुस्तकांच्या लेखकांनी एकच गोष्ट सांगितली आहे. ती म्हणजे दुसऱ्याचा विचार करणं पुण्य, तर वाईट विचार करणं पाप होय, असं मत केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, भारत हे ज्ञानासाठी ओळखले जाते.
पाहा व्हिडीओ
भारत ज्ञानासाठी ओळखले जाते
केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान म्हणाले, भारत नेहमीसाठी ज्ञानाचं भांडार राहिलेलं आहे. इराण आपल्या वैभावासाठी, चीन कौशल्यासाठी, रोमन सुंदरतेसाठी तर तुर्की बहादुरीसाठी ओळखलं जातं. तसंच भारत हे ज्ञान आणि प्रज्ञा यांना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखलं जात असल्याचं ते म्हणाले. हदीसशी संबंधित म्हणाले की, हदीसमध्ये असं लिहलंय की, भारतातून येताना ज्ञान आणि शीतल हवेचा झोका असल्याचा भास होतो. अशाप्रकारे भारत ज्ञानाच्या परंपरेसाठी ओळखलं जातं.
भारत विश्वगुरू होण्याच्या दिशेने
खान यांनी सांगितलं की, ग्रीक पुस्तकांचा अनुवाद नंतर झाला. तत्पूर्व संस्कृत पुस्तकांचा अनुवाद अरबीमध्ये झाला. सर्य सिद्धाताला हिंद, सिंध नावानं प्रकाशित करण्यात आलं. याशिवाय ते म्हणाले की, आपल्या शिक्षणासोबत मुलांच्या शिक्षणाकडंही लक्ष दिलं पाहिजे. यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या वक्तव्याची आठवण करून दिली. स्वामीजी म्हणाले होते, शिक्षणाचा अभाव व उपासमारीचे काही लोकं शिकार होतात. भारत विश्वगुरु होण्याच्या दिशेनं आपण कुठं जात आहोत. याचा विचार केला तर शिक्षण, विज्ञानापासून आपण कुठंतरी दूर जाऊ नये. पुस्तकांमधील ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. ही सर्व पुस्तकं काहीतरी चांगलं करा, हेच सांगतात, असंही त्यांनी सांगितलं.