Asani Cyclone : जाणून घ्या चक्रीवादळांची नावे कशी ठरवली जातात आणि याची प्रक्रिया नेमकी काय आहे!
भारतीय हवामान विभागाने (IMD) गेल्या आठवड्यात इशारा दिला होता की नैऋत्य हिंद महासागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे आणि पुढील आठवड्याच्या सुरुवातीस ते चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात IMD ने इशारा दिली आहे की चक्रीवादळ 21 मार्च रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर येण्याची शक्यता आहे.
मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) गेल्या आठवड्यात इशारा दिला होता की नैऋत्य हिंद महासागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे आणि पुढील आठवड्याच्या सुरुवातीस ते चक्रीवादळात (Cyclone) तीव्र होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात IMD ने इशारा दिली आहे की चक्रीवादळ 21 मार्च रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर (Andaman and Nicobar) येण्याची शक्यता आहे. यानंतर एकच चर्चा रंगली ती म्हणजे या वादळाच्या नावाची…या वादळाचे नाव असानी चक्रीवादळ (Asani Cyclone) असे आहे…
जाणून घ्या असानी चक्रीवादळाचे नाव कसे ठरले!
अनेकांच्या मनात प्रश्न पडला असेल की, या वादळांची नावे कशी आणि कुठे ठेवली जातात. विशेष म्हणजे दरवेळी येणाऱ्या वादळांची नावे हटकी आणि खास असतात. चला तर मग जाणून घेऊयात, वादळांची नावे कश्या पध्दतीने ठेवली जातात आणि याची प्रक्रिया नेमकी काय आहे. हवामान खात्याने (IMD) आतापर्यंत 169 वादळांची नावे जाहीर केली आहेत. या नावांना जागतिक मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट (WMO) पॅनेलने एप्रिल 2019 मध्ये मान्यता दिली होती. या यादीनुसारच येणाऱ्या वादळाचे नाव असानी ठेवण्यात आले आहे.
8 देशांचा यामध्ये समावेश आहे…
विशेष म्हणजे असानी वादळाचे नाव यावेळी श्रीलंकेने दिले आहे. यानंतर थायलंडचे ‘सित्रांग’, यूएईचे ‘मेंडस’ आणि येमेनचे ‘मोछा’ अशी वादळाची नावे दिली आहेत. वादळाचे नाव अटलांटिक प्रदेशात 1953 मध्ये कराराद्वारे करण्यात आले, तर हिंद महासागर क्षेत्रात हे 2004 मध्ये सुरू झाली. सर्वात विशेष म्हणजे भारताच्या पुढाकाराने या भागातील 8 देशांनी वादळांना नाव देण्यास सुरुवात केली. यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान आणि थायलंड यांचा समावेश आहे.
भारताने आतापर्यंत 13 चक्रीवादळांची नावे ठेवली
वादळांना दिलेल्या नावांचा एक विशेष अर्थ असतो, जो त्या देशाची भाषा आणि संस्कृती दर्शवतो. वादळांना नाव देण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या 13 देशांनी 13-13 नावे दिली आहेत. एकूण 169 नावांची यादी तयार करण्यात आली आहे. आतापर्यंत भारताने 13 वादळांची नावे दिली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने प्रभंजन, घुरनी, अंबुद, जलधी आणि वेला यांचा समावेश आहे. नामकरण प्रक्रियेत सदस्य देशांनी त्यांच्या वतीने दिलेल्या नावांची यादी, त्या देशांची वर्णमाला यादी केली जाते. वर्णमालानुसार, प्रथम बांगलादेश, नंतर भारत आणि नंतर इराण आणि इतर देशांची नावे दिली जातात, त्याच क्रमाने वादळी चक्रीवादळांची नावे सुचविलेल्या नावावरून ठेवण्यात येतात.
संबंधित बातम्या :
एक दोन नव्हे तब्बल 2 हजार 779 मोबाईल्सचा मालक आहे हा व्यक्ती, Guinness World Records मध्ये नोंद
विजा चमकल्यावर ढगांचा गडगडाट आवाज येण्यामागे नेमके कारण काय,जाणून घेऊया इंटरेस्टिंग माहिती!