शुभ्र हिऱ्यांच्या अनेक कथा सगळ्यांनी ऐकल्या असतील, पण काळे हिरे देखील काही कमी नाही, का असतात हे काळे हिरे एवढे महाग?
Black Diamond Price:आपल्या पैकी अनेकांनी चमकणारे हिरे पाहिले असतील किंवा त्यांच्याबदद्ल ऐकले तरी असेल कि ते खूप महाग असतात. मात्र फक्त अशाप्रकारचेच हिरे नाहीत तर असे काळे हिरे देखील असतात ,ज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे.
मुंबईः आपल्यापैकी अनेकांना हिरे म्हटले तर आश्चर्याचा धक्का बसतो. हिऱ्याच्या अनेक कथा आपण लहानपणापासून ऐकलेल्या आहेत तर या शुभ्र हिरे बद्दल कुतूहल असते. आपल्यापैकी अनेकांनी शुभ्र चमकणाऱ्या बद्दल जाणून घेतलेले आहेत परंतु आज आम्ही तुम्हाला काळे हिरे यांच्या बद्दल सुद्धा सांगणार आहोत. काळे हिरे हे जरी दुर्लभ असले तरी त्यांची किंमत खूपच महाग असते.गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये( giniz world record) समाविष्ट असलेला हा दुर्मिळ काळा हिरा बिटकॉइन वापरून आपल्याला ही विकत घेता येऊ शकतो.आता हिरा(diamond ( म्हंटल्यावर त्याच्या किमतीचा अंदाज आपल्या सारख्या सर्वसामान्यांनी न लावलेलाच बरा. होय कारण आपल्याला त्याची किंमत न परवडणारी तर आहेच शिवाय त्याची किंमत ऐकली तरी आपल्या काळजात धस्स होईल. अगदी कोटींच्या घरातही आपल्याला याप्राकारच्या हि-यांच्या किंमती पाहायला मिळतात.चमकणारे हिरे तुम्ही पाहिले असतीलच, प्रत्यक्षात नाही निदान सिनेमात तरी.. पण एक काळा हिरा (black diamond) देखील आहे ज्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. असाच एक काळा हिरा चर्चेत आहे, जो नुकताच दुबईतील सोदबीच्या गॅलरीत विक्रीपूर्वी सार्वजनिक प्रदर्शनासाठी(exhibition) ठेवण्यात आला होता. हा काळा हिरा त्याच्या किंमतीमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. तर जाणून घेवूयात काळा हिरा इतका का महाग आहे आणि त्याची किंमत करोडोंमध्ये सांगितली जात आहे.
याला जगातील सर्वात मोठा कट डायमंड म्हटले जात आहे. ५५५.५५ कॅरेटचा हा काळा हिरा एनिग्मा या नावाने ओळखला जातो. असे सांगितले जात आहे की त्याची किंमत 50 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 37 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हा बहुकिंमती असलेला हिरा विक्रीपूर्वी दुबईतील सोदबीच्या गॅलरीत सार्वजनिक प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे.
उल्का आदळून काळा हिऱ्याची निर्मिती
सोदबीच्या लिलावगृहातील दागिने तज्ञ सोफी यांच्या मते, २.६ अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा उल्का पृथ्वीवर आदळली तेव्हा दुर्मिळ काळा हिरा तयार झाला असावा. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट असलेला हा दुर्मिळ काळा हिरा बिटकॉइन वापरूनही विकत घेता येईल.
संबंधित बातम्या