चीनने खरोखरच नकली सूर्य बनवला आहे ? त्याचे तापमान किती आणि हे त्यांच्यासाठी का आहे खास?
चीनने स्वत:चा व्यक्तिगत सूर्य बनवल्याची चर्चा सुरू आहे. चला तर मग जाणून घेवूया काय आहे चीनच्या व्यक्तिगत सूर्याची कहाणी...
ज्या नकली सूर्याबद्दल बोलले जात आहे, तो काही आकाशात दिसणार्या सूर्यासारखा अजिबात नाही.
चीनबाबत सोशल मीडियावर एक बातमी येत आहे, ज्यात म्हटले गेले आहे की, चीनने स्वत: चा व्यक्तिगत सूर्य बनविला आहे. चीनने बनवलेल्या या विशेष सूर्याचे तापमान खऱ्या सूर्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. सूर्याचे तापमान १५ दशलक्ष सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात असले, तरी चीनमध्ये असे एक ठिकाण आहे ज्याचे तापमान पाच पट अधिक आहे.
शेवटी तुम्हाला सुद्धा हे वाचून आश्चर्य वाटले असेल की हे नेमके काय प्रकरण आहे यानंतर लोकांच्या मनात असा हि प्रश्न निर्माण झाला आहे की, जर चीनने सूर्य बनवला तर तो भारतात का उगवणार नाही? तसेच या सूर्याबद्दल असे काय विशेष आहे आणि त्याचा काय उपयोग होणार आहे म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या बद्दल एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत आणि या बातमी मागील नेमके सत्य काय आहे आणि चीनने खरोखरच कृत्रिम सूर्यासारखे काहीतरी तयार केले आहे का?
नकली सूर्य म्हणजे नक्की काय?
या बातमीचा शोध घेताना असे दिसून आले की, ज्या नकली सूर्याबद्दल बोलले जात आहे तो आकाशातील सूर्या प्रमाणे नाहीच. त्याची कथाच वेगळी आहे. हा एखाद्या ग्रहा प्रमाणे नाही की त्याची उष्णतामुळे पृथ्वीवर प्रकाश आणेल किंबहुना सोशल मीडियावर ज्या सूर्याबद्दल बोललं जात आहे, तो फ्युजन एनर्जी रिॲक्टर आहे. याला मॅन मेड सन असेही म्हणतात, म्हणून हे सूर्याच्या नावाने सध्या चर्चेत आहे.
आपणास सांगू इच्छितो की ,शास्त्रज्ञांनी रिॲक्टरमध्ये याचे तापमान ७० दशलक्ष सेल्सिअसपेक्षा जास्त केले आहे, जे खऱ्या सूर्याच्या तापमानापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे शिवाय हे असे तापमाना वर असणे खरोखरच आश्चर्यचकित करणारे आहे तसेच याला वर्ल्ड रेकॉर्ड मानले जात आहे.जेव्हा या रिॲक्टरचे तापमान जेव्हा पाहिले गेले, तेव्हा सुमारे १,००० सेकंद तापमान सूर्याच्या तापमानापेक्षा कितीतरी पटीने जास्त होते.
नकली सूर्य का म्हणतात?
नकली सूर्यालाच सन फ्युजन एनर्जी रिॲक्टर असे ही म्हणतात. याला सूर्य समजण्याचे कारण म्हणजे सूर्याप्रमाणेच हे रिएक्टर न्यूक्लियर फ्यूजन सिद्धांतावर आधारित आहे आणि म्हणूनच त्या इतक्या उष्ण असतात. यात इंधन म्हणून हाइड्रोजन आणि ड्यूटीरियम यांचा वापर केला गेला आहे. या शोधामागे चिनी शास्त्रज्ञ खूप पूर्वीपासून संशोधन करत आहेत आणि त्यांनी असे करण्यामागचे कारण म्हणजे ऊर्जेचा साठा गोळा करणे हे आहे.
पेट्रोल आणि डिझेल इत्यादी यांवर पर्याय शोधण्यासाठी चीन या प्रकल्पावर काम करत आहे. याशिवाय चीनने या प्रकल्पावर ७०० दशलक्ष युरो खर्च केले आहेत. हे संशोधन अनेक वर्षे चालणार असून २०४० पर्यंत या संशोधनात यशस्वी होण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. सध्या याचे तापमान ७० दशलक्ष सेल्सिअस आहे आणि लवकरच ते १०० दशलक्षपर्यंत पोहोचणार आहे. असे झाले तर चीन उर्जेच्या बाबतीत खूप पुढे जाईल.
इतर बातम्या-