ताजमहाल सारखी वास्तू पुन्हा बनवली जाऊ नये म्हणून शाहजहानने कामगाराचे हात छाटले? खरं कारण काय?

काय खरंच ताजमहाल बांधणाऱ्या कामगारांचे हात छाटले गेले होते ? ताजमहल येथील गाईड या किस्साला खूप आवडीने अनेकांना सांगत असतात. शाहजहानने असे का केले होते? यामागील कारण काय? अनेकदा हा विषय पर्यटकांच्या आवडीचा व कुतुहुलाचा ठरतो.

ताजमहाल सारखी वास्तू पुन्हा बनवली जाऊ नये म्हणून शाहजहानने कामगाराचे हात छाटले? खरं कारण काय?
ताज महाल बाबतची इंटरेस्टिंग माहिती
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 11:10 PM

आग्रा मध्ये प्रत्येक वर्षी ताज फेस्टिवल (Taj Festival) आयोजित केला जातो. या वर्षी या फेस्टिव्हलची सुरुवात 20 मार्च पासून होत आहे. या फेस्टिवलमध्ये जगभरातील अनेक देशातून पर्यटक हजेरी लावतात. हे पर्यटक ताजमहलचे विशाल सुंदर रूप पाहण्यासाठी येथे येत असतात. इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना प्रत्येक गोष्ट पाहायची असते, जी त्यांनी अनेकदा फोटोमध्ये पाहिलेली असते. या 7 व्या आश्चर्याबद्दल (Seven Wonders) प्रत्येक लहानातली लहान गोष्ट येथे येणाऱ्या पर्यटकांना जाणून घ्यायची असते, जी या वास्तुचे वर्णन करणारी असेल. जसे की ताजमहाल ही वास्तू बनवल्यानंतर वास्तू बांधणाऱ्या कामगारांचे हात छाटण्यात आले होते, ही वास्तू बनवण्यामागे नेमके काय कारण होते, अशा प्रकारचे अनेक प्रश्न मनात घेऊन पर्यटक (tourist) येथे हजेरी लावत असतात. ताजमहल बनवण्यामागे सर्वात मोठे काय कारण होते? काय खरंच शहाजहान ने ही वास्तू बांधणाऱ्या कामगारांचे हात छाटले होते? जाणून घेऊया या सारख्या अनेक कुतूहल निर्माण करणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांबद्दल…

म्हणून बांधला ताजमहाल

तसे पाहायला गेले तर शहाजहानचे नाव अनेक महिलांसोबत जोडले गेले परंतु वास्तविकतेमध्ये शहाजहान सर्वात जास्त प्रेम मुमताज महलला करत होते. बीबीसीच्या रिपोर्टनुसार जोपर्यंत मुमताज महलमध्ये जिवंत होती, तोपर्यंत शहाजान फक्त त्यांचाच विचार करत असे. याचाच अर्थ अन्य पत्नीचे त्यांच्या जीवनामध्ये असलेले महत्व,स्थान खूपच कमी होते.

शाहजहान यांच्या दरबारातील इतिहासकार इनायत खां यांनी आपल्या पुस्तकात लिहले आहे की, शाहजहान हे मुमताज शिवाय अजिबात राहायचे नाही. ताजमहाल बांधण्यामागे मुमताजला पडलेले स्वप्न कारणीभूत होते. शाहजहान ला तख्त मिळाल्यानंतर पहिल्या 4 वर्षाच्या आत मुमताजचे निधन झाले. मृत्यूपूर्वी मुमताज ने शाहजहान ला सांगितले होते की त्यांनी स्वप्नांमध्ये एक सुंदर महाल आणि बाग पाहिला आणि तसा महाल आणि बाग जगात कोठे ही नाही. त्यानंतर मुमताज ने शाहजहान जवळ एक इच्छा व्यक्त केली अन् म्हणाली की, माझी तुमच्याकडे एक इच्छा आहे. जर तुम्हाला माझ्या आठवणीत काही करायचे असेल तर मला स्वप्नांत पडलेला महाल आणि बगीचा असलेला एखादा मकबरा बनवावा आणि यानंतरच ताजमहाल या वास्तूचा जन्म झाला….

ताजमहल बांधणाऱ्यांचे खरंच हात छाटण्यात आले?

ताजमहल बांधणाऱ्यांचे खरंच हात छाटण्यात आले होते? यावर बीबीसी यांचा रिपोर्ट असे सांगतो की, अशा प्रकारचे किस्से गाईड पर्यटकांना मोठ्या कौतुकाने सांगत असतात. अनेकदा पर्यटकांमध्ये हा विषय चर्चेचा सुद्धा असतो. कधीकधी पर्यटकांना ही गोष्ट खरी सुद्धा वाटू लागते कारण की या वास्तूला पाहिल्यावर प्रत्येकाच्या मनामध्ये सांगण्यात आलेल्या किस्सा बद्दलची खरी भावना जागृत होते परंतु ही एक पसरवलेली अफवा आधारित कल्पना आहे. आतापर्यंत इतिहासामध्ये याबद्दलची कोणतीच नोंद सापडली नाहीये किंवा कोणत्याही इतिहासकाराने याबद्दल कुठेच उल्लेख केला देखील नाहीये.

शाहजहान ने ही वास्तू बांधताना कोणत्याच प्रकारची कसर सोडली नाहीये. ही वास्तू बांधण्यासाठी कारागिरांची एक मोठी टीम तयार करण्यात आली होती. याचा उल्लेख शहाजहानचे चरित्र “शाहजहां द राइज एंड फॉल ऑफ द मुगल एम्‍परर” यामध्ये करण्यात आला आहे. या आत्मचरित्राला फर्गुस निकोल यांनी लिहिले आहे. त्यांनी पुस्तकामध्ये असे म्हटले आहे की, ताजमहल बनवणारे अधिक तर कामगार कन्नौजचे हिंदू होते. फुलांची नक्षी काम करण्यासाठी पोखरा येथून कामगारांना बोलावण्यात आले होते. कश्मीर येथील रामलाल यांना बाग बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

‘चला बसुया’ असं पुरुषांपेक्षा महिलाच जास्त म्हणतायत! दारु पिणाऱ्यांची ही आकडेवारी एकदा बघाच

हृदयविकारानं ग्रासलंय? चिंताजनक परिस्थिती उद्भवण्याची भीती? जाणून घ्या आधुनिक उपचार पद्धती!

नारळाची करवंटी फेकून देण्याचा मूर्खपणा करु नका! हे तर पैसे कमावण्याचं साधन आहे

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.