AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPF : तुमची कंपनी तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये पैसे भरतेय का कसे तपासावे जाणून घ्या

epf balance check : दर महिन्याला कंपनी आपल्या खात्यात पीएफचे पैसे जमा करत असते. तुमची कंपनी तुमच्या खात्यात पैसे जमा करत आहे का किंवा तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा झाले आहे. हे कसे तपासावे जाणून घ्या.

EPF : तुमची कंपनी तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये पैसे भरतेय का कसे तपासावे जाणून घ्या
pfo
Follow us
| Updated on: Nov 13, 2023 | 10:55 PM

EPF Balance Check : दरमहिन्याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे पैसे नोकरदाराच्या खात्यातून कापले जातात. कंपनी पगारातून ठराविक रक्कम कापून दर महिन्याला पीएफचे पैसे जमा करते आणि तुम्हाला त्यावर वार्षिक व्याज मिळते.

ईपीएफचे पैसे कसे कापले जातात?

कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या 12% आणि डीए पीएफ खात्यात जमा केला जातो. कंपनी कर्मचार्‍यांच्या पीएफ खात्यात 12% योगदान देखील जमा करते. कंपनीच्या योगदानापैकी 3.67 टक्के रक्कम EPF खात्यात जमा होते. त्याच वेळी, पेन्शन योजनेत 8.33 टक्के पैसे जमा केले जातात.

आपच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा झाले आहेत हे आपण  दरमहिन्याला तपासत नाही. कोणी ईपीएफओच्या साइटवर जाऊन लॉगिनही करत नाही. अशा परिस्थितीत तुमची कंपनी ईपीएफचे पैसे जमा करत आहे की नाही हे तुम्हाला कसे कळेल? तुमचे पैसे नियमितपणे जमा केले जात आहेत की नाही याबद्दल तुम्हाला एसएमएसद्वारे माहिती मिळते.

कंपनीने पैसे जमा केले आहेत की नाही कसे तपासावे?

तुम्हाला तुमच्या ईपीएफ खात्याचे पासबुक तपासायाचे असेल तर किती पैसे कधी आणि किती जमा केले याचा तपशी पासबुकमध्ये मिळतो. तुम्ही ईपीएफओ पोर्टलला भेट देऊन हे तपासू शकता, यासाठी खालील पायऱ्या दिल्या आहेत-

ईपीएफओ पोर्टलवर पासबुक कसे तपासायचे

पायरी 1- सर्वप्रथम, EPFO ​​पोर्टल https://www.epfindia.gov.in/site_en/index.php वर जा. यासाठी तुम्ही तुमचा UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) सक्रिय केलेला असणे आवश्यक आहे.

पायरी 2- साइट उघडल्यानंतर, ‘Our Services” टॅबवर जा आणि नंतर ‘for employees’ ड्रॉप-डाउन मेनू निवडा.

पायरी 3- सर्व्हिसच्या खाली असलेल्या ‘member passbook’ वर क्लिक करा.

स्टेप 4- पुढील पेजवर तुम्हाला तुमचा UAN आणि पासवर्ड टाकावा लागेल. कॅप्चा प्रविष्ट करून लॉग इन करा.

स्टेप 5- लॉग इन केल्यानंतर मेंबर आयडी टाका. यानंतर तुमची ईपीएफ शिल्लक दिसेल. यामध्ये, खात्यातील शिल्लक सोबत, तुम्हाला सर्व ठेवींचे तपशील, आस्थापना आयडी, सदस्य आयडी, कार्यालयाचे नाव, कर्मचारी हिस्सा आणि नियोक्ता शेअरची माहिती देखील मिळते.

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....