कोणाला दिला जातो शौर्य पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार कधीपासून प्रदान करण्यात येतोय?…तर परमवीर आणि महावीर चक्र पुरस्कारबद्दलही घ्या जाणून

26 जानेवारीनिमित्त शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशाच्या संरक्षणात योगदान देणाऱ्या शौर्य पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी 384 जणांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर 939 पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या धाडसाबद्दल गौरवण्यात येणार आहे. यामधील 189 गौरवमूर्तींना पोलीस पदक जाहीर झालं आहे. तर 88 जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (PPM) आणि 662 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक (PM) बहाल करण्यात येणार आहे.

कोणाला दिला जातो शौर्य पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार कधीपासून प्रदान करण्यात येतोय?...तर परमवीर आणि महावीर चक्र पुरस्कारबद्दलही घ्या जाणून
gallantry Award 2022
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 9:32 PM

देशाच्या संरक्षणासाठी कायम सज्ज असलेल्यांना वर्षातून दोन वेळा म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला (Republic day 2022 ) पुरस्काराने सन्मानित (Gallantry awards)  करण्यात येतो. काही पुरस्कार फक्त देशाच्या रक्षणासाठी दिवसरात्र लढणाऱ्या सैनिकांसाठी असतात. तर काही पुरस्कार हे पोलीस, जेल कर्मचारी आणि सामान्य नागरिकांसाठी पण असतात. बालशौर्य पुरस्कार त्यातीलच एक पुरस्कार आहे. परमवीर चक्र हा सैन्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यानंतर महावीर चक्र, कीर्ति चक्र, वीर चक्र, अशोक चक्र आणि शौर्य चक्र. आज आपण या पुरस्कारांबद्दल जाणून घेऊयात…देश स्वतंत्र झाल्यानंतर तेव्हापासून भारत सरकार दरवर्षी जवान आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देण्यात येत आहे. पुढे 26 जानेवारी 1950 ला खास करुन शौर्य पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. आणि अजून तीन पुरस्कारांची घोषणा केली परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीरचक्र. तसं तर 15 ऑगस्ट 1947 पासून हे पुरस्कार प्रभावी मानले गेले. त्यानंतर भारत सरकारने 4 जानेवारी 1952 मध्ये अजून तीन पुरस्कारांची घोषणा केली. अशोक चक्र श्रेणी-I, अशोक चक्र श्रेणी-II आणि अशोक चक्र श्रेणी-III. 1967 मध्ये त्यांचे नाव अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र अशी ठेवण्यात आले.

परमवीर चक्र : हे देशातील सर्वोच्च लष्करी बहुमान मानला जाणारा पुरस्कार आहे. युद्धातील शौर्य आणि बलिदानासाठी हा सन्मान दिला जातो. हा मरणोत्तर दिला जातो. मेजर सोमनाथ शर्मा यांना पहिले परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.

महावीर चक्र :

हा पुरस्कार सैनिकांना त्यांचा युद्धातील शौर्य आणि बलिदानासाठी देण्यात येतं. हा पुरस्कार मरणोत्तरही दिला जातो. परमवीर चक्रानंतरचा दुसरा सर्वौच्च पुरस्कार आहे.

वीर चक्र :

हा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. युद्धात दाखवलेल्या साहस आणि पराक्रमाबद्दल सैनिकांना हा पुरस्कार देण्यात येतो. एखाद्या सैनिकाला युद्धात वीरमरण येतं अशावेळी त्याचा वडिलांना किंवा पत्नीला हा पुरस्कार देऊन सैनिकांच्या शौर्याचा सन्मान केला जातो.

अशोक चक्र :

हा शांततेच्या काळात दिला जाणारा शौर्य पुरस्कार आहे. हे युद्धात अतुलनीय शौर्य, साहस आणि बलिदानासाठी दिले जाते.

कीर्ती चक्र :

हा पुरस्कार शांततेच्या काळात देण्यात येतो. असाधारण शौर्य आणि बलिदानासाठी हा सन्मान सैनिक आणि गैर-सैनिकांना दिला जातो.

त्यांनाही देण्यात येतो शौर्य पुरस्कार

1. सीआरपीएफच्या 30 जवानांना पोलीस पदक 2. 3 SSB जवानांना पोलीस पदक 3. आयटीबीपी 3 पोलीस पदकांसह एकूण 18 शौर्य पुरस्कार 4. 88 लोकांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक 5. गुणवंत सेवेसाठी 662 जवान पोलीस पदक 6. 42 तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधार सेवा पदक 7. 37 गुणवंत सेवेसाठी सुधारणा सेवा पदक

Padma Award 2022 : पद्म पुरस्कारांची घोषणा, सीडीएस जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर पद्म विभूषण, तर काँग्रेस नेते गुलाम नबी आझादांचाही सन्मान

Police Medal : तब्बल 51 मराठमोळ्या पोलिसांचा पदकाने सन्मान, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर

Neeraj Chopra : ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राला मिळणार विषेश सेवा मेडल, 384 जणांना शौर्य पुरस्कार जाहीर

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.