Samosa History : भारतात कुठून आला समोसा? जाणून घ्या समोसा पदार्थाचा इतिहास

समोसा पदार्थातील मटनाची जागा आता बटाटा आणि इतर पालेभाज्यांनी घेतली. काळी मिर्ची आणि मसाला पदार्थांचा वापर सुरू झाला. समोसा पदार्थामध्ये बटाटा टाकण्याची सुरुवात पोर्तुगीजांच्या वेळी सुरू झाली.

Samosa History : भारतात कुठून आला समोसा? जाणून घ्या समोसा पदार्थाचा इतिहास
(फोटो-Freepik)
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 3:13 PM

नवी दिल्ली : समोसा असा पदार्थ आहे ज्याचं नाव घेतल्यानंतर तोंडाला पाणी सुटते. तोंडात गेल्यानंतर स्वाद अतिशय सुंदर असतो. भारतात समोसा कधी गोड हिरव्या चटणीसोबत तर कधी भाजीसोबत खाल्ला जातो. तुम्हाला माहीत आहे का समोसा भारतात केव्हापासून आला. समोसा पदार्थाचा इतिहास काय आहे. समोसा पदार्थाची निर्मिती इरानची असल्याचे समजले जाते. इरानमध्ये याला संबुश्क म्हणतात. याचा उल्लेख सर्वात आधी इतिहासकार अबुल फजल बेहकी यांनी ११ व्या शतकात केला.

भारतात पोहचताना झाला समोसा

असं म्हटलं जाते की, सर्वात आधी समोसा मजबूम गजनवी यांना दिला जात होता. त्यावेळी समोसा पदार्थात किवा, मेवा आणि फळं राहत होते. तो त्रिकोणी केव्हापासून बनने सुरू झाले याचा स्पष्ट उल्लेख दिसत नाही. भारतात पोहचता पोहचता हा समोसा झाला. सुरुवातीला बिहार, पश्चिम बंगालमध्ये याला शिंघाडा म्हटलं जात होतं.

जंगलात जाताना घेऊन जायचे समोसे

इरानवरून समोसा भारतात आला. त्यासाठी समोसा पदार्थाला उजबेकिस्तान आणि अफगाणिस्तान होत प्रवास करावा लागला. अफगाणिस्तानमध्ये सुका मेव्याशिवाय फक्त मटन आणि कांदे भरावे लागत होते. जंगलात जनावरे चारायला जाणारे लोकं याचा वापर करत होते. भारतात शाकाहारी लोकांचे प्रमाण जास्त असल्याने त्यामध्ये बटाटे टाकले जातात.

मटनाची जागा बटाट्याने घेतली

समोसा पदार्थातील मटनाची जागा आता बटाटा आणि इतर पालेभाज्यांनी घेतली. काळी मिर्ची आणि मसाला पदार्थांचा वापर सुरू झाला. समोसा पदार्थामध्ये बटाटा टाकण्याची सुरुवात पोर्तुगीजांच्या वेळी सुरू झाली.

अशा प्रकारचे असतात समोसे

भारतात समोसा पदार्थाचा मोठा व्यवसाय आहे. भारतात वेगवेगळ्या प्रकारचे समोसे तयार होतात. छोले समोसे, जॅम समोसा, फीश समोसा, पास्ता, पंजाबी आणि किमा, चीज, मशरूम, फूल गोबी, चॉकलेट, कांदा, चिकन पनीर समोसा असे विविध प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. शिवाय मोठ्या हॉटेल्समध्ये मागणीनुसार तयार करू दिले जातात.

Non Stop LIVE Update
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात.
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?.
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?.
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा.
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा.
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'.
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?.
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?.
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक.