सर्फ पावडर आणि साबण नसताना लोक कपडे धुवायचे तरी कसे? जाणून घ्या कशाचा व्हायचा वापर…
कपडे चमकदार होण्यासाठी आपण सर्फ पावडर आणि साबण वापरतो. मळके अस्वच्छ कपडे साबण आणि सर्फ वॉशिंगने स्वच्छ होतात. सुमारे 130 वर्षांपूर्वी भारतात प्रथमच साबणचा प्रवेश झाला. ब्रिटीश कंपनी लीबर ब्रदर्स इंग्लंडने भारतीय बाजारात प्रथमच साबण सादर केला होता.
मुंबई : कपडे चमकदार होण्यासाठी आपण सर्फ पावडर आणि साबण वापरतो. मळके अस्वच्छ कपडे साबण आणि सर्फ वॉशिंगने स्वच्छ होतात. सुमारे 130 वर्षांपूर्वी भारतात प्रथमच साबणचा प्रवेश झाला. ब्रिटीश कंपनी लीबर ब्रदर्स इंग्लंडने भारतीय बाजारात प्रथमच साबण सादर केला होता. 1897 मध्ये प्रथमच मेरठमध्ये आंघोळ आणि कपडे धुण्याचे साबण तयार करण्याचा कारखाना सुरू केला. कंपनीचे नाव होते ‘नॉर्थ वेस्ट सोप’. पण देशात साबण नसताना लोकांनी कपडे स्वच्छ कसे ठेवले? चला जाणून घेऊया…
देशात साबण येण्यापूर्वी, भारतीय लोक आपले कपडे सेंद्रिय घटकांनी स्वच्छ करायचे आणि यासाठी सर्वात जास्त वापरण्यात आलेला घातक म्हणजे रिठा. त्याची झाडे राजांनी आपल्या राजवाड्यांच्या बागांमध्ये लावली होती. मग, लोक याचा वापर करून कपडे स्वच्छ करायचे.
अशा प्रकारे करायचे कपडे स्वच्छ
रिठ्याच्या सालातून आलेला फेस घाणेरडे कपडे स्वच्छ करून त्यांना चमकदार बनवायचा. आजही रिठा महाग आणि रेशमी कपडे स्वच्छ करण्यासाठी वापरली जाते. रिठा केस धुण्यासाठी देखील वापरले जाते. भारतात आज घडीलाही केस धुण्यासाठी रिठा वापरली जाते.
साबण येण्यापूर्वी सामान्य लोक कपडे धुण्यासाठी ते आधी काहीवेळ गरम पाण्यात भिजत टाकून कपडे ओले करायचे. त्यानंतर त्यांना दगडावर आपटून स्वच्छ करण्यात आले. कारण, तेव्हा रिठा सर्वांच्या आवाक्याबाहेर होती. असे म्हटले जाते की, आजही धोबीघाटमध्ये कपडे साबण आणि सर्फशिवाय जुन्या पद्धतीने धुतले जातात.
कशी वापरली जायची रिठा?
रिठा महाग आणि मऊ कपड्यांसाठी वापरली जात असे. पूर्वी कपडे धुण्यासाठी पाणी घेऊन त्यात रिठाची फळे गरम केली जात होती. यापासून फेस तयार होण्यास सुरुवात व्हायची आणि नंतर ती फेस काढून कपड्यावर चोळला जायचा आणि दगड किंवा लाकडावर आपटून कपडे स्वच्छ केले जायचे. यामुळे कपड्यांची घाणच साफ व्हायची नाही, तर ते जंतूमुक्तही व्हायचे. ते सेंद्रिय असल्याने, शरीरावर कोणत्याही प्रकारची वाईट प्रतिक्रिया देखील होत नव्हती.
कपड्यांची साफसफाई अशी व्हायची…
जुन्या काळात कपडे वाळूने देखील स्वच्छ केले जात होते. वाळू एक प्रकारची खनिज आहे. त्यात सोडियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम सल्फेट असतात. ही पावडर पाण्यात मिसळून त्यात कपडे भिजवले जायचे आणि नंतर थोड्या वेळाने कापड घासून किंवा ते दगडावर आपटून घाण साफ केली जायची.
आंघोळीसाठी मातीचा वापर
साबण येण्यापूर्वी लोक अंगावर माती किंवा राख लावून आंघोळ करत असत. हातावरील घाण देखील त्याच प्रकारे स्वच्छ केली जायची. ग्रामीण भागात अजूनही हात स्वच्छ करण्यासाठी राख किंवा मातीचा वापर करतात. भांडी स्वच्छ करण्यासाठी देखील राख किंवा माती वापरली जाते.
हेही वाचा :
Know This : वडनगर ते गांधीनगर आणि नवी दिल्ली, चहावाला ते पंतप्रधान, मोदींचा भन्नाट प्रवास