आधार कार्डमध्ये नाव, पत्ता आणि जन्मतारीख किती वेळा बदलता येईल? जाणून घ्या

Aadhar card Update : आधार कार्डवर तुमचे नाव, लिंग, जन्मतारीख आणि पत्ता अशी सगळी माहिती असते. आधार कार्ड हा तुमच्या पुरावा म्हणून अनेक ठिकाणी वापरला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की आधार कार्डवरील कोणती माहिती किती वेळा बदलता येते. त्यासाठी काय आहे नियम जाणून घ्या.

आधार कार्डमध्ये नाव, पत्ता आणि जन्मतारीख किती वेळा बदलता येईल? जाणून घ्या
aadhar card
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 5:31 PM

Aadhar card rules : आधार कार्ड आता एक महत्त्वाचे ओळखपत्र झाले आहे. आधार कार्डवर तुमचे नाव, लिंग, जन्मतारीख आणि मागच्या बाजुला पत्ता दिलेला असतो. पण आधार कार्डवर जर एखादी माहिती चुकीची असेल किंवा तुमचा पत्ता वारंवार बदलत असाल पण याची मर्यादा किती आहे. हे अनेकांना माहित नसेल. आधारमध्ये बदल करण्याचे काही नियम तयार करण्यात आले आहेत. पण अनेकांना त्यांची माहिती नसते.

नाव, पत्ता किती वेळा बदलता येईल?

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) नुसार, आधार कार्ड धारकांना त्यांचे नाव जास्तीत जास्त 2 वेळा बदलण्याची सुविधा दिली जाते. तर लिंग आणि जन्मतारीख एकदाच बदलता येते. मात्र आधार कार्डवरील पत्ता तुम्ही कितीही वेळा बदलू शकता. यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. वीज किंवा पाणी किंवा टेलिफोन बिल तसेच भाडे करार यांसारखे वैध पुरावे देऊन किंवा आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन किंवा तुम्ही तुमचा पत्ता ऑनलाइन देखील बदलू शकता.

नावात बदल कसा करावा

अनेक महिलांचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या आडनावात बदल करावा लागतो. त्यामुळे आधार कार्डावर तुम्ही तुमचे ते नाव एकदाच बदलू शकता. यासाठी तुम्हाला आधार नोंदणी केंद्रावर जावे लागेल. आवश्यक कागदपत्रे जोडून फॉर्म सबमिट केल्यानंतर ही प्रक्रिया होते. बायोमेट्रिक डेटा घेतल्यानंतर त्यानंतर दस्तऐवजाचा पुरावा स्कॅन करुन मूळ दस्तऐवज परत केला जातो. यानंतर काही दिवसात तुमच्या नावात बदल होतो. यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर ५० रुपये इतका खर्च येतो.

जन्मतारीख कशी बदलावी

तुम्हाला आधार वरची जन्मतारीख बदलायची असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला आधार नोंदणी केंद्रावर जावे लागेल. कारण ही संधी तुम्हाला एकदाच मिळते. पॅनकार्ड, जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, बँक पासबुक, विद्यापीठाने दिलेले प्रमाणपत्र या कागदपत्रांपैकी एक पुरावा म्हणून तुम्ही देऊ शकता. यासाठी तुम्हाला दुरुस्तीचा फॉर्म भरुन द्यावा लागेल. आधार केंद्रावर उपस्थित अधिकारी तुमचा बायोमेट्रिक तपशील घेतील आणि त्यांची पडताळणी करतील, ज्यामध्ये तुमच्या फिंगर प्रिंटपासून ते डोळे स्कॅनपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. तुमचा फॉर्म तपासला जाईल आणि तुमच्याकडून माहितीची पुष्टी केली जाईल. तुमची कागदपत्रे बरोबर आढळल्यास, तुमची जन्मतारीख अपडेट केली जाते. यासाठी देखील तुम्हाला ५० रुपये आकारले जातील.

पत्ता कसा बदलावा

तुम्ही घरी बसून देखील आधार कार्डमधील पत्ता ऑनलाइन बदलू शकता. ऑफलाइन अर्ज देखील आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन करु शकता. ऑनलाइन पत्ता बदलण्याची प्रक्रिया काय आहे जाणून घ्या.

– सर्व प्रथम UIDAI myaadhaar.uidai.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

– लॉगिन करण्यासाठी तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. यानंतर कॅप्चा कोड भरा आणि Send OTP वर क्लिक करा.

– तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. ते प्रविष्ट करा आणि लॉग इन करा.

– शीर्ष मेनूमधील आधार अपडेट पर्यायावर जा. यानंतर Proceed to Aadhaar अपडेट या पर्यायावर क्लिक करा.

– आता पुढच्या पेजवर पत्ता निवडा आणि Proceed to Aadhaar अपडेट या पर्यायावर क्लिक करा.

– यानंतर तुमचा वर्तमान पत्ता तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

– यानंतर तुम्हाला जो ॲड्रेस अपडेट करायचा आहे त्याचा ऑप्शन दिसेल. तुम्हाला नवीन पत्त्याचा तपशील भरावा लागेल.

– यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

– तुम्हाला खाली दिलेल्या दोन्ही चेक बॉक्सवर क्लिक करून नेक्स्ट वर क्लिक करावे लागेल.

– यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल. येथे तुम्हाला 50 रुपये नॉन-रिफंडेबल फी भरावी लागेल.

– पेमेंट पूर्ण होताच तुम्हाला एक पावती मिळेल. यानंतर तुमचा आधार एक-दोन दिवसांत अपडेट होईल.

– तुमच्या आधारवर नवीन पत्ता अपडेट झाल्यावर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर मेसेजद्वारे माहिती मिळेल.

आधार कार्डमधील पत्ता बदलण्यासाठी, तुम्हाला 28 हून अधिक कागदपत्रे स्वीकारली जातात. तुम्ही यापैकी कोणतेही दस्तऐवज सबमिट करू शकता ज्यात तुम्हाला अपडेट करायचा असलेला पत्ता आहे.

पासपोर्ट बँक स्टेटमेंट (पासबुक, पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट) शिधापत्रिका मतदार ओळखपत्र चालक परवाना पेन्शनर कार्ड अपंगत्व कार्ड मालमत्ता कर पावती (1 वर्षापेक्षा जुनी नाही) विमा पॉलिसी (केवळ जीवन विमा आणि आरोग्य विमा) सीजीएचएस/ईसीएचएस/ईएसआयसी/मेडी-क्लेम कार्ड राज्य/केंद्र सरकार/पीएसयूने जारी केलेले छायाचित्र असलेले प्रीपेड पावत्यांसह वीज बिल (३ महिन्यांपेक्षा जुने नाही) पाणी बिल, टेलिफोन लँडलाईन बिल/फोन (पोस्टपेड मोबाईल) बिल/ब्रॉडबँड बिल (३ महिन्यांपेक्षा जुने बिल नाही) तुम्हाला तुमचा ओळखीचा पुरावा (POI), जो तुमचा पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ. सोबत ठेवावा लागेल.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.