AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका दिवसांत आपण किती शब्द बोलता माहितीये? जाणून घ्या याबद्दलची रंजक माहिती…

सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काही ना काहीतरी बोलतच राहतो. कधी कुटुंबातील सदस्यांसह, कधी मित्रांसह, कधी क्लायंट किंवा ऑफिसच्या सहकाऱ्यांसमवेत... संभाषण कधीच संपत नाही. परंतु, आपण कधीही विचार केला आहे का की, आपण एका दिवसांत किती शब्द बोलता?

एका दिवसांत आपण किती शब्द बोलता माहितीये? जाणून घ्या याबद्दलची रंजक माहिती...
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 10:36 AM

मुंबई : सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काही ना काहीतरी बोलतच राहतो. कधी कुटुंबातील सदस्यांसह, कधी मित्रांसह, कधी क्लायंट किंवा ऑफिसच्या सहकाऱ्यांसमवेत… संभाषण कधीच संपत नाही. परंतु, आपण कधीही विचार केला आहे का की, आपण एका दिवसांत किती शब्द बोलता? कदाचित आपण याकडे कधीही लक्ष दिले नाही. शब्दांची शक्ती आपल्याला सर्वांनाच माहिती असे, त्याची जाणीव आपल्याल असेल. मात्र, याबद्दल सहज जाणून घेणे देखील आपल्यासाठी मनोरंजक असू शकते (How many words a person can speak in a day).

दररोजच्या शब्दांची संख्या जाणून व्हाल चकित!

प्रत्येकजण आपापल्या वागण्यानुसार बोलतो. काही लोक कमी बोलतात, तर काहींना खूप जास्त बोलायला आवडते. लिंक्डइन लर्निंग इंस्ट्रक्टर Jeff Ansell Research मते, एखादी व्यक्ती दिवसात कमीत कमी 7000 शब्द बोलते. असेही होऊ शकते की, बरेच लोक यापेक्षा अधिक शब्द बोलतात. हे जाणून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटले असेलच!

आयुष्यातभरात बोलतो ‘इतके’ शब्द!

जर, सरासरी अंदाज घेतला तर एखादी व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यात 860,341,500 शब्द बोलते म्हणजे सुमारे 86 कोटी शब्द. तर, अशी कल्पना करा की, आपण आपल्या संपूर्ण आयुष्यात 86 कोटी शब्द बोलण्यात आपली किती शक्ती खर्च केली असेल! ब्रिटीश लेखक आणि प्रसारक जिल्स ब्रॅन्डरथ यांनी आपल्या ‘द जॉय ऑफ लेक्स: हाऊ टू हॅव फन विथ 860,341,500 वर्ड्स’ (The Joy of Lex: How to Have Fun with 860,341,500 Words) या पुस्तकात ही माहिती दिली आहे. आपल्या शब्दकोशात तरी इतके शब्द आहेत का नाहीत, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल!

शब्दकोशाशी तुलना

जर, या शब्दांची तुलना इतर गोष्टींशी केली गेली, तर कोणताही सामान्य माणूस त्याच्या आयुष्यात ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीचे 20 खंड तब्बल 14.5 वेळा वाचतो. याचा अर्थ असा आहे की 20 खंडांमध्ये लिहिलेल्या शब्दांची संख्या, एखादी व्यक्ती 14.5 वेळा बोलू शकते. जर, मानवी शब्दांची तुलना विश्वकोशाच्या 32 खंडांशी केली गेली तर त्या शब्दांमधून 19.5 पुस्तके लिहिता येतील. जर, आपण याची तुलना बायबलशी केली तर, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात किंग जेम्स बायबलमध्ये जितके शब्द आहेत, त्याच्या 1110 पट अधिक शब्द बोलतो.

(How many words a person can speak in a day)

हेही वाचा :

संस्कृतमधील ‘या’ शब्दांचं विदेशी सेलिब्रिटींना वेड, जाणून घ्या नेमका अर्थ काय ?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नवजात बालकांना धोका? गर्भवती महिलांसाठी लस किती आवश्यक? जाणून घ्या तज्ज्ञांची उत्तरे

चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले.
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार.
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई.
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....