फ्री- वायफायचा वापर करत आहात? तर आधी या धोक्यांना ओळखा, तुमचा डेटा हॅकर्सच्या निशाण्यावर तर नाही ना?

सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय मिळत असल्यास त्याचा वापर करणे, ऑनलाईन ट्रांजेक्शन करणे आणि फोन अपडेट करणे युजर्सना महागात पडू शकते. फ्री- वायफाय किती धोकादायक आहे, याचा वापर करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, कधी याचा वापर टाळावा, जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे..

फ्री- वायफायचा वापर करत आहात? तर आधी या धोक्यांना ओळखा, तुमचा डेटा हॅकर्सच्या निशाण्यावर तर नाही ना?
सावधान! चुकून सुद्धा डाउनलोड करू नका अश्याप्रकरचे ॲप्स
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 12:10 AM

सार्वजनिक ठिकाणी फ्री wifi चा पर्याय मिळाल्यानंतर ऑनलाईन ट्रांजेक्‍शन करणे आणि फोन अपडेट करणे युजर्सना महागात पडू शकते. एयरपोर्ट, रेल्वे स्‍टेशन, रेस्टॉरंट्स या इतर सार्वजनिक ठिकाणी मिळणाऱ्या फ्री Wifi च्या माध्यमातून हॅकर्स युजर्सना त्यांची शिकार बनवू शकतात. Wifi च्या माध्यमातून ते तुमच्याशी संबंधित असणारी माहिती जसे की, बँक अकाऊंट सारखी माहिती चोरी करू शकतात. यासाठी सावध राहण्याची आवश्यकता आहे. फ्री-wifi किती धोकादायक आहे, जर कुठे याचा वापर करत असाल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कधी याचा वापर करू नये, जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे..

फ्री-wifi किती धोकादायक आहे?

सायबर सिक्‍योरिटी फर्म कैस्‍परस्‍कायच्या रिपोर्टनुसार फ्री wifi सिक्योर आहे की नाही, एक सामान्य युजर याचा अंदाज लावू शकत नाही. बऱ्याचदा याचा वापर करण्यासाठी ऑथेंटिकेशनची गरज पडत नाही. हिच बाब हॅकर्स साठी जमेची बाजू ठरते. अशा परस्थितीमध्ये लोक अगदी सहजरीत्या wifi नेटवर्कसोबत कनेक्ट होतात. त्यानंतर हॅकर्सना फोनद्वारे कित्येक प्रकारची माहिती चोरी करण्याची संधी मिळते. कैस्‍परस्‍कायच्या रिपोर्टनुसार, वायफाय सिक्योर नसल्यास हॅकर्स युकर्सच्या मोबाईलमध्ये असे मालवेअर पोहोचवतात जे फोनमध्ये होणारी ॲक्टिविटी त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. यासाठी एक्सपर्ट सांगतात की अशा फ्री कनेक्शनचा वापर करताना आवश्यक ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.

फ्री-wifiचा वापर करताना ही गोष्ट लक्षात ठेवा

१- काही शेअर करू नका – एक्सपर्ट सांगतात की, सार्वजनिक wifi चा वापर करतेवेळी कोणत्याही प्रकारची फाईल, फोटो किंवा फोल्डर दुसऱ्यांना शेअर करण्यापासून स्वतः ला वाचवा. असे केल्यास हॅकर्सपर्यंत ती माहिती पोहोचण्याचा धोका अधिक वाढतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की या दरम्यान बँक ट्रांजेक्‍शन करण्यापासून सुध्दा आपण वाचायला हवे.

२- VPN कनेक्शनचा वापर करा- जर मोबाईल किंवा लॅपटॉपवर काही महत्वाचे काम करत असाल आणि सार्वजनिक वायफाय सुविधा वापरत असाल तर VPN चा वापर करावा. यासाठी गुगल प्ले स्टोअरवर अनेक VPN App उपलब्ध आहेत. Wifi कनेक्शनचा वापर करण्याआधी VPN App डाऊनलोड करून ऑन करावे. या App चा वापर करत असाल तर हॅकर्सना तुमचा डेटा चोरी करणे अवघड होवून जाते.

३- फ्री कनेक्शन प्रत्येकवेळी ऑन ठेवू नका – लक्षात असूद्या की फ्री-Wifi कनेक्शन असल्यास ते नेहमी ऑन ठेवू नका. जेव्हा तुम्हाला वाटेल आपले काम संपले आहे तर त्यावेळेस कनेक्ट असलेले Wifi त्वरित ऑफ करावे. जसे की समजा तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्पुटरला फ्री Wifi ला कनेक्ट केले आहे आणि तुम्ही वर्ड किंवा एक्सेलवर काम करत असाल तर लगेच wifi बंद करणे एक चांगला पर्याय ठरतो. तसेच हल्ली अधिकतर ऑपरेटिंग सिस्‍टम बेसिक फायरवॉल असलेल्या असतात. त्यामुळे हे ऑन ठेवल्यास हॅकिंगचा धोका कमी होतो.

रक्तदान शिबिरात प्लास्टिक न वापरण्याची शपथ घेतली आणि त्याच कार्यक्रमात वापर, केडीएमसीच्या उपायुक्तांना पाच हजार रुपयांचा दंड

Buldhana Murder : भावाच्या मदतीसाठी आलेल्या युवकाचे अपहरण करुन मारहाण, चौघांना अटक

Sulli Deal : “सुल्ली डिल” प्रकरणात पहिली अटक, बंगळूरमधून तरुण ताब्यात

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.