ऑनलाईन ब्रँडेड सामान मागवताय? वस्तू खरी की खोटी ‘असं’ तपासा

अनेकदा ब्रँडेड वस्तूंच्या नावाखाली बनावट आणि खोट्या वस्तू विकल्या जातात. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

ऑनलाईन ब्रँडेड सामान मागवताय? वस्तू खरी की खोटी 'असं' तपासा
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 10:19 PM

मुंबई : सध्या ऑनलाईन शॉपिंगला अनेक लोक पसंती देत आहेत. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर सर्रास ऑनलाईन शॉपिंगलाच प्राधान्य देण्यात येतंय. अगदी ब्रँडेड महागाच्या वस्तूही ग्राहक ऑनलाईनच मागवत आहेत. यामुळे दुकानातील संसर्गाचा धोकाही कमी होतो आणि वेळही वाचतो. असं असलं तरी ऑनलाईन शॉपिंगचे काही धोकेही आहेत. अनेकदा ब्रँडेड वस्तूंच्या नावाखाली बनावट आणि खोट्या वस्तू विकल्या जातात. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. या गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला मोठी फसवणूक टाळता येईल (How to check branded goods authenticity while online shopping).

वस्तूच्या मूळ किमतीवर लक्ष द्या

अनेकदा ब्रँडेड वस्तू अगदी कमी किमतीत देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केली जाते. त्यामुळे वस्तू खरेदी करण्याआधी एमआरपी (MRP) तपासा. तसेच शॉपिंग वेबसाईट तुम्हाला किती टक्के सूट देण्याची ऑफर देतेय तेही पाहा. जर ऑफर 80 टक्क्यांपेक्षा अधिक सूट देणारी असेल तर सावध व्हा.

शब्दांच्या स्पेलिंगवर लक्ष द्या

किमतीशिवाय तुम्ही ज्या कंपनीची वस्तू घेत आहात त्याची खरी स्पेलिंग आणि वस्तूवरील स्पेलिंग एकच आहे का ते तपासा. अनेकदा ब्रँडेट कंपनीच्या स्पेलिंगमध्ये एखाद्या अक्षराचा बदल करुन बनावट माल विकला जातो. तो दिसायला सारखाच असतो केवळ छोटासा बदल केला जातो. उदाहरणार्थ adidas कंपनीची बनावट वस्तू adibas या नावाने विकली जाते.

रिव्ह्यू चेक करा

वस्तूची सत्यता आणि गुणवत्ता याबाबत इतरांच्या अनुभवतातून शिकण्यासाठी संबंधित वेबसाईटवरील त्या वस्तूचे रिव्ह्यू वाचणं गरजेचं असतं. त्यात इतर ग्राहक त्यांचे अनुभव आणि वस्तूचे खरे फोटो पोस्ट करत असतात. तसेच त्यांची त्या वस्तूबाबतची निरिक्षणंही नोंदवत असतात.

ब्रँडेड वस्तूशी तुलना करणे

स्वस्तात मिळणारी वस्तूची ब्रँडेड वस्तूशी तुलना केल्यास बराच अंदाज येऊ शकतो. यासाठी ब्रँडेड कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरील माहिती आणि ऑफरमध्ये मिळणाऱ्या वस्तूची तुलना करु शकतो.

फेक वेबसाईट ओळखा

तुम्हाला जर एखाद्या वेबसाईटवर खूप स्वस्तात वस्तू देण्याचा दावा केला असेल तर वस्तू खरदीच्या आधी सावध व्हा. आधी त्या वेबसाईटची सत्यता तपासा. त्यासाठी गुगलवर वेबसाईटची रँकिंग आणि रिव्ह्यू पाहता येईल.

हेही वाचा :

Explained: Online Shopping च्या नव्या कायद्यांचा कुणाल फायदा? वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

ऑनलाईन शॉपिंगच्या मोठ्या डिस्काऊंटवर सरकारची बंदी?; Flash Sale होणार बंद

लॉकडाऊन काळात लोकांची जोरदार ऑनलाईन शॉपिंग, Amazon ची छप्परफाड कमाई

व्हिडीओ पाहा :

How to check branded goods authenticity while online shopping

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.