ट्रेनचा चार्ट बनल्यानंतरही कन्फर्म सीट मिळेल, ‘हा’ पर्याय माहीत आहे का ?
Train Confirmed Seat: अनेकदा प्रवाशांना कन्फर्म सीट मिळत नाही. चार्ट तयार झाल्यानंतर आपले तिकीट कन्फर्म करता येत नाही, असे अनेकांना वाटते. पण, तसे नाही. रिकाम्या जागेची माहिती तुम्ही दोन पर्यायांद्वारे काढू शकता. याविषयी विस्ताराने जाणून घ्या.
कदा रेल्वे तिकीटचा चार्ट तयार झाल्यानंतर आपले तिकीट कन्फर्म करता येत नाही, असे अनेकांना वाटते. अनेकदा प्रवाशांना कन्फर्म सीट मिळत नाही. पण, तसे नाही. रिकाम्या जागेची माहिती तुम्ही दोन पर्यायांद्वारे काढू शकता. याविषयी विस्ताराने जाणून घ्या.
रोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. वाहतुकीचे हे साधन अतिशय किफायतशीर आणि सुरक्षित आहे. प्रत्येक श्रेणीतील लोक त्यांच्या आर्थिक परिस्थिती आणि गरजेनुसार प्रवासासाठी कोच निवडू शकतात. त्याआधी रेल्वेप्रवासासाठी तिकीट घेणे आवश्यक आहे.
अनेकदा प्रवाशांना कन्फर्म सीट मिळत नाही. चार्ट तयार झाल्यानंतर आपले तिकीट कन्फर्म करता येत नाही, असे अनेकांना वाटते, पण तसे नाही. चार्ट तयार झाल्यानंतरही तुम्ही ट्रेनमधील रिकाम्या सीटबद्दल जाणून घेऊ शकता. यासाठी दोन मार्ग आहेत.
चार्ट तयार झाल्यानंतरही आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून ट्रेनमधील रिकामी सीट मिळू शकते. यासाठी तुम्हाला खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे पालन करावे लागेल.
नेमकी प्रक्रिया काय?
सर्वप्रथम आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.irctc.co.in/online-charts/. यावर जा. आता तुम्हाला तुमच्या प्रवासाशी संबंधित माहिती जसे की ट्रेन नंबर, स्टेशनचे नाव, तारीख इत्यादी भरून गेट ट्रेन चार्टवर क्लिक करावे लागेल.
रिक्त जागेची माहिती कोणत्या वर्गात हवी आहे, याचे पर्याय तुमच्याकडे असतील. जसे स्लीपर क्लास, फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी. क्लिक करताच आसनांची माहिती तुमच्यासमोर येईल.
यामुळे कोणती जागा कोठून कुठे रिकामी आहे, हे कळेल. माहिती मिळताच ताबडतोब आपल्या ट्रेनच्या टीटीईशी संपर्क साधून सीट बुक करा.
दुसरा पर्याय कोणता?
प्रवाशांना आयआरसीटीसीच्या मोबाईल अॅपद्वारे रिक्त जागांची माहिती मिळू शकते.
यासाठी अॅपवर लॉग इन केल्यानंतर ट्रेनऑप्शनमध्ये जाऊन चार्टवर क्लिक करा.
आता प्रवासाची माहिती, जसे की ट्रेन नंबर, तुम्ही कोणत्या स्थानकातून प्रवास करत आहात, तारीख इत्यादी भरा आणि गेट ट्रेन चार्टवर क्लिक करा.
आतापर्यंत ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी आयआरसीटीसी ॲपची मदत घेतली जात होती आणि ट्रेनचा लोकेशन जाणून घेण्यासाठी नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम ॲपची मदत घ्यावी लागते.तसेच तक्रारीसाठी 139 नंबर डायल करावा लागायचा. अशा किचकट परिस्थितीमुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होते, अशा स्थितीत रेल्वेच्या सुपर ॲपद्वारे या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
सध्या रेल्वे प्रवाशांना विविध ॲप्स आणि वेबसाइट्सचा वापर करावा लागतो. तिकिटांसाठी IRCTC, खानपानासाठी IRCTC eCatering, अभिप्राय किंवा मदतीसाठी Rail Madad, अनारक्षित तिकिटांसाठी UTS आणि ट्रेन ट्रॅक करण्यासाठी NTES. या ॲपची मदत घ्या