‘ईव्हीएम’ की मतपत्रिका: सर्वात स्वस्त काय; एका ईव्हीएमची किंमत ठाऊक आहे?

निवडणुकीच्या रणधुमाळीवेळी ईव्हीएमचा मुद्दा नेहमीच ऐरणीवर असतो. ईव्हीएम हॅकिंगचे अनेक आरोप (EVM Hack) आतापर्यंत लावण्यात आले आहेत. नेमकं ईव्हीएम म्हणजे काय, कार्यपद्धती ते निर्मिती खर्च याविषयी सर्व माहिती रंजकदार आहे.

‘ईव्हीएम’ की मतपत्रिका: सर्वात स्वस्त काय; एका ईव्हीएमची किंमत ठाऊक आहे?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 7:29 PM

नवी दिल्लीउत्तरप्रदेश सहित पाच राज्यांत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने मतदान तारखांची (Assembly Election Dates 2022) नुकतीच घोषणा केली आहे. सात चरणांत होणाऱ्या मतदान प्रक्रियेत मतदार ईव्हीएमद्वारे (Election EVM) हजारो उमेदवारांच्या भविष्याला फैसला होणार आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीवेळी ईव्हीएमचा मुद्दा नेहमीच ऐरणीवर असतो. ईव्हीएम हॅकिंगचे अनेक आरोप (EVM Hack) आतापर्यंत लावण्यात आले आहेत. नेमकं ईव्हीएम म्हणजे काय, कार्यपद्धती ते निर्मिती खर्च याविषयी सर्व माहिती रंजकदार आहे. निवडणूक प्रक्रियेची बारकाईने माहिती होण्यासाठी ईव्हीएमची ए टू झेड माहिती असणे महत्वाचे ठरते. एका ईव्हीएमची किंमत ते बॅटरी याबद्दलची सर्व माहिती जाणून घेऊया-

‘ईव्हीएम’ म्हणजे काय?

‘ईव्हीएम’ अर्थातच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन. पारपंरिक मतदानाची पद्धत मतपेट्या कालबाह्य होऊन मतदान आणि मतमोजणीसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (EVM) या आधुनिक उपकरणाचा वापर करण्यात येतो. ‘ईव्हीएम’चे मुख्यत्वे बॅलेट युनिट (BU), कंट्रोल युनिट (CU ), व्होटर व्हेरिफाइबल पेपर ऑडिट ट्रेल मशीन (VVPAT) असे तीन भाग असतात. मतदान अधिक पारदर्शी करण्यासाठी 2010 नंतर ‘व्हीव्हीपॅट’चा वापर करण्यास सुरूवात झाली आहे.

‘ईव्हीएम’ मशीनची किंमत किती?

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ईव्हीएमच्या विविध प्रकारांविषयी माहिती देण्यात आली आहे. एम2 ईव्हीएम (2006-10) ज्यामध्ये नोटा सहित अधिकतम 64 उमेदवारांची नावे समाविष्ट केली जाऊ शकतात. म्हणजे चार मशीन एकावेळी जोडल्या जाऊ शकतात. याशिवाय एम3 ईव्हीएम देखील आहे. ज्याद्वारे 24 मशीन एकत्रित करण्याद्वारे 384 उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया राबविली जाऊ शकते.

एम2 ईव्हीएमची (2006-10 दरम्यान निर्मिती) किंमत रु.8670/- प्रति ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन) (बॅलेटिंग यूनिट आणि कंट्रोल यूनिट) होती. आता सध्या वापरण्यात येणाऱ्या एम3 ईव्हीएमची किंमत अंदाजित लगभग 17,000 रुपये प्रति यूनिट आहे. प्रथमदर्शनी किंमत अधिक भासते. मात्र, मतपेटीतून होणाऱ्या मतदानापेक्षा तुलनेने कमी खर्च लागतो. निवडणूक आयोगाच्या मते, प्रत्येक मतदारासाठी लाखोंच्या संख्येने मतपत्रिकांची छपाई, वाहतूक तसेच संग्रह करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो.

ईव्हीएम वीजेवर चालते?

ईव्हीएममध्ये बॅटरी असते. त्यामुळे वीज नसल्यास मतदान प्रक्रिया खंडित होत नाही. ईव्हीएममुळे कधीही शॉक बसण्याचा धोका संभावत नाही. ईव्हीएम मशीनची रचना सर्व बाबींचा विचार करुन त्यानुसार केलेली असते.

महाराष्ट्रातील उदारमतवादी समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

Parasi Funeral : पारसी अंत्यसंस्काराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; जाणून घ्या सरकारने बंदी घातलेली ‘ही’ प्रथा नेमकी काय आहे?

धक्कादायक! विदेश प्रवास ना लोकांशी भेटगाठ तरीही या राज्यात 60 टक्के लोकांना ओमिक्रॉन….

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.