पोलिसांनी तुमची तक्रार नोंदवण्यास नकार दिला, तर तुम्ही काय करायला हवं? वाचा…

पोलिसांनी तुमची तक्रार नोंदवण्यास नकार दिला तर तुम्ही भारतीय कायद्याप्रमाणे नागरिकांना दिलेल्या अधिकारांचा उपयोग करु शकता.

पोलिसांनी तुमची तक्रार नोंदवण्यास नकार दिला, तर तुम्ही काय करायला हवं? वाचा...
MAHARASHTRA POLICE
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 6:14 PM

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडे जायचं म्हटलं तरी नको वाटतं. याचं कारण त्यांना पोलीस ठाण्यात मिळणारी वागणूक आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा हे आहे. अनेकदा पीडित व्यक्ती पोलीस स्टेशनला जाते आणि तक्रार (FIR) नोंदवण्याचा प्रयत्न करते, मात्र, पोलिसांकडून वेगवेगळे दबाव किंवा हितसंबंधांतून तक्रार नोंदवून घेण्यासच नकार दिला जातो. आरोपींची चौकशी करण्याऐवजी पीडितालाच याचा त्रास होतो. त्यामुळे पोलिसांनी तुमची तक्रार नोंदवण्यास नकार दिला तर तुम्ही भारतीय कायद्याप्रमाणे नागरिकांना दिलेल्या अधिकारांचा उपयोग करु शकता. यामुळे पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला तरी तुम्ही तक्रार नोंदवू शकता (Know how to register FIR if police deny to do so).

FIR शिवाय कोणतीही कारवाई होत नाही

जेव्हा केव्हा काही गुन्हा घडतो आणि दुर्घटना घडते तेव्हा या घटनेची सर्वात आधी माहिती पोलिसांना देणं आवश्यक असतं. ही माहिती अथवा तक्रार देण्यालाच First Information Report (FIR) म्हणतात. एफआयआर म्हणजे घटना घडल्यावर पोलीस सर्वात आधी त्यांच्याकडे नोंदवतात तो दस्तावेज. याच्याच आधारे पुढील कारवाई केली जाते. एफआयआरशिवाय पोलिसांना कोणतीही कारवाई करता येत नाही.

FIR नोंदवून घेतली नाही तर काय करावं?

प्रत्येक व्यक्तीला पोलिसांकडे जाऊन तोंडी अथवा लेखी तक्रार दाखल करण्याचा अधिकार असतो. पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्यास तुम्हाला तक्रार नोंदवण्यासाठी इतरही मार्ग खुले असतात. यानंतर पहिलं पाऊल म्हणून तुम्ही संबंधित कर्मचाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे याबाबत तक्रार करुन FIR नोंदवण्याची मागणी करु शकता.

यानंतरही तुमची एफआयआर नोंदवून घेतली नाही, तर तुम्ही CrPC च्या सेक्शन 156 (3) अंतर्गत न्यायालयाकडे (मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट) तक्रार नोंदवण्यासाठी अपिल करु शकता. यानंतर न्यायालय पोलिसांना तुमची FIR नोंदवून घेण्याचे आदेश देते. जर एखादा पोलीस अधिकारी एफआयआर नोंदवण्यास नकार देत असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्यावर कारवाई देखील होऊ शकते.

ऑनलाईन आणि अॅपद्वारे FIR नोंदवता येते

पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला तर पीडित व्यक्तीला ऑनलाईन पद्धतीने देखील तक्रार नोंदवता येते. आपली तक्रार नोंदवण्यासाठी तुमच्या भागातील पोलीस स्टेशनच्या वेबसाईटवर जावं लागेल. राजधानी दिल्लीत e-FIR अॅपमधूनही तक्रार नोंदवता येते. यासाठी तुम्हाला ते अॅप इन्स्टॉल करावं लागतं. यानंतर पीडित व्यक्तीला सहजपणे आपली तक्रार नोंदवता येईल.

हेही वाचा :

आम्ही निवडणूक आयोगाला मनुष्यबळ देणार नाही, काय करायचं ते करा : विजय वडेट्टीवार

पुण्यातील गर्दीला अजित पवार, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा, प्रविण दरेकर आक्रमक

लग्नाच्या आमिषाने बलात्कार, औरंगाबादच्या कथित बँक अधिकाऱ्यावर मुंबईतील महिला पोलिसाचा आरोप

व्हिडीओ पाहा :

Know how to register FIR if police deny to do so

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.