Toothbrush Day | जगातील पहिला टूथब्रश कोणी आणि कसा बनवला? जाणून घ्या याबद्दलची रंजक माहिती…
टूथब्रश आजमितीला प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. याशिवाय आपण आपली सकाळी सुरु झाल्याची कल्पनाच करू शकत नाही. एकेकाळी लोकांनी दातून किंवा बाभूळाची काठी दात घासण्यासाठी वापरली. पण, टूथब्रशने सर्वांचे आयुष्य बदलले.
मुंबई : टूथब्रश आजमितीला प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. याशिवाय आपण आपली सकाळी सुरु झाल्याची कल्पनाच करू शकत नाही. एकेकाळी लोकांनी दातून किंवा बाभूळाची काठी दात घासण्यासाठी वापरली. पण, टूथब्रशने सर्वांचे आयुष्य बदलले. आपल्यापैकी कित्येकांना हे माहित नसेल की, दात घासण्याच्या टूथब्रशचा इतिहास हा 500 वर्षांहून अधिक जुना आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, चीन हाच तो देश आहे, ज्याने जगाला टूथब्रशची ओळख करून दिली (Know the history of Toothbrush who and were its invented).
512 वर्षांपूर्वी लागला शोध
आजपासून 512 वर्षांपूर्वी म्हणजेच 26 जून 1498 रोजी, चीनच्या राजाने ब्रशची रचना केली. ज्यामुळे दात दातुनपेक्षा अधिक व्यवस्थित स्वच्छ करता येतील. म्हणुनच, जगभरात 26 जून हा दिवस ‘टूथब्रश डे’ म्हणून साजरा केला जातो. सुरुवातीच्या टूथब्रशचे हँडल हाड किंवा बांबूच्या लाकडापासून बनवलेले होते. त्यात डुक्कराच्या केसांचा वापर दात घासण्यासाठी केला जात असे. हळूहळू टूथब्रशचा इतिहास बदलला आणि शोधकर्त्यांनी त्यांच्या स्वत:च्या मार्गाने त्या आकार आणि रूप बदलण्याचा प्रयत्न केला.
हळूहळू पलटलं टूथब्रशचं रूपडं
चीनमध्ये टूथब्रशच्या अविष्कारानंतर इंग्लंडमध्ये 1780 मध्ये विल्यम एडिस नावाच्या व्यक्तीने थोडासा आधुनिक टूथब्रश बनवला. पण पेटंटच्या बाबतीत अमेरिकेचा विजय झाला. 7 नोव्हेंबर, 1857 रोजी अमेरिकेच्या एच.एन.वासवर्थ यांना टूथब्रशसाठी पेटंट प्राप्त झाले, ज्याचा पेटंट क्रमांक 18653 होता. आज आपण वापरत असलेल्या टूथब्रशचे 1938 मध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाले. दंतवैद्य म्हणतात की, आज टूथब्रश मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे, परंतु बहुतेक लोकांना त्याचा योग्य प्रकारे वापर कसा करावा हे अद्याप माहित नाही.
पहिला इलेक्ट्रिक टूथब्रश कधी आला?
सुरुवातीला टूथब्रश डुकराच्या केसांनी बनवलेले होते, जे काही हाड किंवा बांबूच्या तुकड्यांशी जोडलेले होते. सेल्युलोइड लॉयड प्लास्टिक ब्रश हँडल्स पहिल्या महायुद्धानंतरच दिसू लागले. याआधी भारतासह जगभरात दातूनचा वापर सामान्यत: केला जात असे. 1938 मध्ये, प्राण्यांच्या केसांऐवजी नायलॉन ब्रिस्टल्स वापरल्या गेल्या. एका सर्वेक्षणात लोक म्हणाले की, ते दात घासण्याशिवाय आपल्या आयुष्याची कल्पना करू शकत नाहीत. 1939 मध्ये स्विस इलेक्ट्रिक टूथब्रश आला, परंतु 1961 मध्ये स्किबच्या ब्रोक्सोडेन्टला यात मोठे यश मिळाले.
(Know the history of Toothbrush who and were its invented)