Know This | Health | ज्येष्ठंना तरुणांपेक्षा जास्त थंडी वाजते! असं का होतं?
हिवाळा ऋतू हा तसा तर प्रत्येकाच्या आवडीचा असतो परंतु जानेवारी महिन्यामध्ये जी थंडी पडते त्या थंडीमुळे प्रत्येक जण हैराण होऊन जातो, विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना या थंडीचा जास्त त्रास जाणवतो. चला तर मग जाणून घेवूया ज्येष्ठ नागरिकांना अचानक थंडी का वाजू लागते नेमके काय कारण आहे त्यामागील...
संपूर्ण भारतामध्ये थंडीने जोर धरलेला आहे. नुकताच पाऊस पडून गेल्याने अनेक ठिकाणी थंडीचा जोर वाढलेला आहे आणि अनेक भागांमध्ये धुके, गारठा यामुळे प्रत्येक जण हैराण झालेला आहे परंतु कधी तुम्ही एका गोष्टीचे निरीक्षण केले आहे का ? या दिवसांमध्ये आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांना जास्त प्रमाणामध्ये थंडी वाजू लागते.. अशा वेळी आपल्याला चिंता सुद्धा भासते परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना थंडी का वाजते?? असे का घडते आणि या जानेवारीच्या थंडीमध्ये ज्येष्ठ नागरिक का हैराण असतात त्यामागील नेमके कारण आपल्याला माहिती नसते म्हणूनच आज आपण यामागील कारण जाणून घेणार आहोत.
याबद्दल जाणून घेण्यासाठी वरिष्ठ नागरिक तज्ञ आणि जेरियाट्रिक मेडिसिन एमडी डॉक्टर ऋषव बंसल यांच्याशी बातचीत केली तेव्हा त्यांनी सांगितले की , तसे पाहायला गेले तर यामागे अनेक वेगवेगळे कारणे आहेत ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात थंडी वाजू लागते. त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे की या नागरिकांचे जास्त वय झाल्यामुळे त्याच्या शरीरातील मेटॅबॉलिझम रेट म्हणजेच पचन संस्था सुद्धा खूपच कमी होऊन जातो अश्याने त्यांच्या शरीरातील मेटाबॉलिझम रेट कमी झाल्यामुळे सुद्धा अनेकदा या ज्येष्ठ मंडळींना जास्त थंडी वाजू लागते.
शरीरावरील त्वचेचा थर कमी होऊ लागते
डॉक्टर बंसल यांचे असे म्हणणे आहे की,वाढत्या वयोमानानुसार व्यक्तीच्या शरीरावर जी त्वचा असते त्या त्वचेवरील जो थर किंवा त्वचेची रचना असते ती हळूहळू पातळ होऊ लागते आणि यामुळेच आपल्या शरीरातील जे काही इन्सुलेशन प्रक्रिया आहे,ती हळूहळू कमी सुद्धा होते. या कारणामुळे सुद्धा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना थंडी जास्त वाजू लागते.
कमी होणारा र”क्तपुरवठा
मानवाच्या शरीरामध्ये सुपरफिशियल व्हेन्स असतात, ज्या आपल्या शरीरातील र”क्त पुरवठा सुरळीत करण्यास मदत करतात परंतु या अशामुळे आपल्या शरीरातील तापमान सुद्धा स्थिर राहण्यास मदत होत असते. जसे जसे मानवाचे शारीरिक वय वाढत जाते तसतसे या नसांचे तापमान व नसांमधील र”क्तपुरवठा प्रवाह सुद्धा हळूहळू कमी होऊ लागतो कालांतराने या नसांमधील र”क्तप्रवाह कमी होतो म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांना थंडी जास्त वाजत असते.
स्किन थर्मोरेसेप्टर्स ठरू शकते कारण..
आपल्या शरीरावरील त्वचामध्ये थर्मोरेसेप्टर्स म्हणून काही विशिष्ट अश्या पेशी असतात ,ज्या आपल्या शरीरातील तापमानात असणारी तफावत दर्शवितात.या पेशीची संख्या आणि त्यांचे आपल्या शरीरातील स्थान आधारावरून त्वचेची संवेदनशीलता ठरते तसेच वाढत्या वयामुळे ज्येष्ठ नागरिक यांच्या शरीरातील या पेशींची घनता हळू हळू कमी होऊ लागते हे कारण सुद्धा अति थंडी वाजण्याचे लक्षण असते.
अशा वेळी काय घ्यावी काळजी..
आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये एखादे तरी ज्येष्ठ नागरिक असतात, अशा वेळी त्यांना सुद्धा जास्त प्रमाणात थंडी वाजत असेल यांना लोकरीचे,गरम सुती कपडे घालायला द्यावेत जेणेकरून बाहेरील थंड वातावरणाचा त्रास होणार नाही तसेच त्यांच्या आहारामध्ये अनेक असे काही पदार्थ समाविष्ट करावे ज्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होईल जसे की चिकन सूप,टमाटे सूप, पपईरस,मेथीचे लाडू, तूप इत्यादी जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहील.