Jio Finance Smart Gold : मुकेश अंबानी यांची गजब ऑफर, घरी बसून 10 रुपयांत घ्या सोने

धनत्रयोदशीच्या दिवसी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. पिवळे धातू लक्ष्मीचे रूप मानले जाते. धनत्रयोदशीला धनाची देवी माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेरजी यांची पूजा केली जाते. या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात वर्षभर समृद्धी राहते, असे समजले जाते.

Jio Finance Smart Gold : मुकेश अंबानी यांची गजब ऑफर, घरी बसून 10 रुपयांत घ्या सोने
मुकेश अंबानी यांची सोने गुंतवणूक योजना
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 11:15 AM

Dhanteras 2024 Jio Finance Smart Gold : देशभरात दीपावली साजरी केली जात आहे. मंगळवारी धनतेरसचा सण साजरा केला जात आहे. त्यामुळे सराफ बाजारात चांगलीच गर्दी आहे. या दिवशी सोने किंवा चांदीची खरेदी करण्याची पारंपारीक प्रथा आहे. या दरम्यान अनेक कंपन्यांनी घरी बसून सोने खरेदी करण्याची संधी ग्राहकांना दिली आहे. यामध्ये मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्स कंपनीचाही समावेश आहे. विशेष म्हणजे जिओ फायनान्सने केवळ दहा रुपयांत डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचा पर्याय दिला आहे.

मुकेश अंबानी यांनी आणली नवीन योजना

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्स कंपनीने स्मार्टगोल्ड योजना लॉन्च केली आहे. त्या योजनेत ग्राहकांना केवळ 10 रुपयांमध्ये डिजिटल गोल्ड खरेदी करता येणार आहे. धनतेरसच्या दिवशी ही योजना लॉन्च केली आहे. स्मार्टगोल्ड योजनेत डिजिटल सोने खरेदीसोबत गुंतवणूक करता येते. या गोल्ड इन्वेस्टमेंटमधून कधीही स्मार्टगोल्ड युनिट विकून रोकड, सोने किंवा सोन्याचे दागिने घेऊ शकतात. केवळ दहा रुपयांपासून सुरु केलेल्या गुंतवणुकीतून हे लाभ घेता येतील.

सोन्यातील गुंतवणुकीचे दोन पर्याय

जिओ फायनान्स अ‍ॅपवर स्मार्ट गोल्ड योजनेत गुंतवणूक करण्याचे दोन पर्याय ग्राहकांना दिले आहे. त्यातील पहिल्या पर्यायात गुंतवणुकीची रक्कम निश्चित करता येते. दुसरा पर्याय सोन्याचे वजन म्हणजे ग्रॅमनुसार गुंतवणूक करता येते. फिजिकल गोल्डची डिलेव्हरी 0.5 ग्रॅमपेक्षा अधिकच्या गुंतवणुकीतून होणार आहे. म्हणजेच 0.5 ग्रॅम, 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 5 ग्रॅम आणि 10 ग्रॅम असेच सोने मिळू शकते. तसेच जिओ फायनान्स अ‍ॅपवर सरळ सोन्याचे सिक्के खरेदी करता येणार आहे. त्यासाठी होम डिलिवरीची सुविधाही मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

सोने खऱेदी अवघड

धनत्रयोदशीच्या दिवसी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. पिवळे धातू लक्ष्मीचे रूप मानले जाते. धनत्रयोदशीला धनाची देवी माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेरजी यांची पूजा केली जाते. या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात वर्षभर समृद्धी राहते, असे समजले जाते. सध्या सोने खरेदी करणे कठीण काम झाले आहे. कारण सोन्याच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. एससीएक्सवर सोन्याची किंमत 78,536 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आयबीजेएच्या वेबसाइटनुसार, देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 78,250 रुपये आहे.

Non Stop LIVE Update
'आर.आर.पाटील कुटुंबाची मी माफी मागितली', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
'आर.आर.पाटील कुटुंबाची मी माफी मागितली', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत',राऊतांचा टोला
'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत',राऊतांचा टोला.
अजितदादांनीच माझं सरकार पाडलं; पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपानं खळबळ
अजितदादांनीच माझं सरकार पाडलं; पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपानं खळबळ.
36 तासांनंतर वनगा रिचेबल, पत्नी म्हणाल्या, 'मध्यरात्री तीन वाजता...',
36 तासांनंतर वनगा रिचेबल, पत्नी म्हणाल्या, 'मध्यरात्री तीन वाजता...',.
शिंदेंकडून हेलिकॉप्टरने AB फॉर्म,देवळाली-दिंडोरीमध्ये महायुतीत बंडखोरी
शिंदेंकडून हेलिकॉप्टरने AB फॉर्म,देवळाली-दिंडोरीमध्ये महायुतीत बंडखोरी.
सलमान खानला पुन्हा धमकी, ‘दोन कोटी रूपये पाठव, नाहीतर मारून टाकेन..’
सलमान खानला पुन्हा धमकी, ‘दोन कोटी रूपये पाठव, नाहीतर मारून टाकेन..’.
लोकसभेच्या मिमिक्रीचं विधानसभेला उत्तर, पवारांनी केली दादांची मिमिक्री
लोकसभेच्या मिमिक्रीचं विधानसभेला उत्तर, पवारांनी केली दादांची मिमिक्री.
अजितदादांचा भाजपच्या विरोधाला ठेंगा, विरोध डावलून नवाब मलिकांना तिकीट
अजितदादांचा भाजपच्या विरोधाला ठेंगा, विरोध डावलून नवाब मलिकांना तिकीट.
मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कोणाविरोधात कोणाचं बंड?
मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कोणाविरोधात कोणाचं बंड?.
तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तास..
तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तास...