AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वातंत्र्योत्तर काळात पहिला राष्ट्रीय दुखवटा कधी जाहीर झाला… काय आहेत नियम….

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. लतादीदींवर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एखाद्याच्या मृत्यूवर राष्ट्रीय शोक कसा जाहीर केला जातो, त्याची नियमावली व काळानुसार झालेले बदल माहीत आहे का?

स्वातंत्र्योत्तर काळात पहिला राष्ट्रीय दुखवटा कधी जाहीर झाला... काय आहेत नियम....
लता मंगेशकर
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 2:00 PM

गानकोकीळा भारतरत्न लता मंगेशकर (Lata mangeshkar) यांचे रविवारी निधन (Death) झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच कला, संगित, साहित्य अशा सर्वत्र क्षेत्रांवर शोककळा पसरली आहे. राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवरांकडून लतादीदींना अखेरची श्रध्दांजली अर्पण करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आदींसह सर्व मान्यवरांनी लतादीदींच्या आठवणीला उजाळा दिला आहे. भारतरत्न असल्याने लतादीदींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार होणार असून देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा (Rashtriya shok) जाहीर करण्यात आला आहे. श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाने आपला आवाज गमावला आहे. लता मंगेशकर या देशासाठी एखाद्या वारशापेक्षा कमी नव्हत्या. 2001 मध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला. परंतु एखाद्याच्या मृत्यूवर राष्ट्रीय दुखवटा कसा जाहीर केला जातो? नेमक कुणाच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्याचे संकेत आहे, याविषयी या लेखात जाणून घेऊ

राष्ट्रीय शोक जाहीर करण्याचा नियम पूर्वी मर्यादित लोकांसाठी होता. देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान राहिलेल्या लोकांच्या निधनावर केवळ राज्य किंवा राष्ट्रीय शोक जाहीर केला जात होता. दरम्यान, स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिला राष्ट्रीय दुखवटा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर घोषित करण्यात आला. त्यांच्या मृत्यूनंतरच्या नियमांनुसार, पंतप्रधान किंवा राष्ट्रपती पदावर असताना किंवा पूर्वी पंतप्रधान किंवा राष्ट्रपती राहिलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर देशात राष्ट्रीय दुखवटा घोषित केला जातो. कालांतराने राष्ट्रीय दुखवटा पाळण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. बदललेल्या नियमांनुसार, काही खास मान्यवरांच्या बाबतीतही केंद्राला विशेष सूचना जारी करून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्याचा अधिकार देण्यात आला होता. एवढेच नाही तर देशातील कोणत्याही मोठ्या आपत्तीच्या वेळीही ‘राष्ट्रीय दुखवटा’ जाहीर केला जाऊ शकतो.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

प्रत्येक वेळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्यावर राष्ट्रीय किंवा राज्य दुखवटा जाहीर केला जावा, असा नियम नाही. याचे उदाहरण म्हणजे सिनेअभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले, परंतु राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला नाही. भारतीय सैन्यात किंवा इतर दलात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांचे अंत्यसंस्कारही सरकारी इतमामात होतात, परंतु राज्य शोक जाहीर केला जात नाही. यापूर्वी केंद्राकडून राष्ट्रीय किंवा राज्य शोक जाहीर केला जात होता. केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार केवळ राष्ट्रपती हे करू शकत होते, परंतु बदललेल्या नियमांनुसार हे अधिकार राज्यांनाही देण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून स्वतंत्र घोषणा करण्यात आली होती.

राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवणे

भारतीय ध्वज संहितेनुसार, राष्ट्रीय शोकदरम्यान, सचिवालय, विधानसभा यासह सर्व महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवला जातो. त्याच वेळी, देशाबाहेरील भारतीय दूतावास आणि उच्च आयोगांमध्येही राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जातो. याशिवाय कोणतेही औपचारिक आणि शासकीय कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत. केंद्र सरकारने 1997 मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अशावेळी कोणतीही सार्वजनिक सुट्टी घेणे आवश्‍यक नसते. त्याची तरतूद रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रपती किंवा पंतप्रधानपद भूषवताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर सुट्टी असते. सरकारलाही अशा वेळी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार आहे.

मनमोहन सिंग यांची सही असलेली 2  रुपयांची नोट बनवू शकते तुम्हाला मालामाल, जाणून घ्या या मागील इंटरेस्टिंग माहिती!

Under Trial Prisoners In India : तुरुंगात आहेत, पण अजून दोषी आहेत की नाही, हे ठरणं बाकी! असे एकूण किती कैदी आहेत भारतात?

कोल्डड्रिंक, सोडा बॉटलच्या खालील भाग सपाट का नसतो? जाणून घ्या इंटरेस्टिंग कारण!