जर एखाद्या चित्रपटात चूकीची माहिती दाखवली गेल्यास काय करतात, कायद्याच्या आधारे करू शकता तक्रार!…

Complaint of Any Film: अनेकदा चित्रपटांमध्ये जी माहिती दाखवलेली असते, त्या माहितीमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. समाजामध्ये द्वेष , वैर भावना निर्माण होणाऱ्या चित्रपटातील माहिती बद्दल आपण तक्रार देखील करू शकतो.

जर एखाद्या चित्रपटात चूकीची माहिती दाखवली गेल्यास काय करतात, कायद्याच्या आधारे करू शकता तक्रार!...
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: File Photo
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 9:09 PM

चित्रपट(Indian Cinema) हा समाज मनाचा आरसा मानला जात असतो परंतु चित्रपटामध्ये अनेकदा जी माहिती दाखवली जाते, त्या माहितीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतात. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या माहितीवर अनेकदा वेगवेगळे तर्क वितर्क देखील लावले जातात. सध्याच्या दिवसांमध्ये अनेक चित्रपटांबद्दल सगळीकडे चर्चा होताना पाहायला मिळत आहे. चित्रपटांमध्ये चित्रित केलेल्या माहितीवर वेगवेगळे वाद देखील होताना दिसत आहेत. याआधी देखील सत्य घटनेवर आधारित (Films On Real Incidents) असलेल्या चित्रपटांवर अनेक चर्चा झाल्या व वाद ही झाला. अशावेळी आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की जर चित्रपटांमध्ये चुकीची माहिती दाखवली गेल्यावर नेमके काय करावे? याबद्दल काही कायदेशीर तरतुदी आहेत का? किंवा कोणता एखादा कायदा आहे का? जर चित्रपटातील एखाद्या सीनबद्दल काही आक्षेप (Content in Films) नोंदवायचा असेल तर अशा वेळी नेमकी तक्रार कोठे करायची? जर तुमच्या मनामध्ये सुद्धा असे अनेक प्रश्न असतील तर आज या प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत नियम

चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे आपत्कालीन आणि चुकीच्या माहितीवर आधारित असलेली माहिती यासंदर्भात बातचीत करताना दिल्ली हायकोर्ट चे एडवोकेट प्रेम जोशी यांनी म्हटले की, भारताचे संविधान प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करत असतो परंतु देशांमध्ये सांप्रदायिक तणावाची पार्श्वभूमी पाहता सांप्रदायिक आणि धार्मिक सद्भावना टिकवून ठेवण्यासाठी काही आशयावर बंदी लावली जाते. अशा वेळी समाजामध्ये तेढ निर्माण करणारा आशय हटवला जातो. माहिती तंत्रज्ञान कायदा 2011 नुसार, या कायद्याअंतर्गत आपत्ती निर्माण करणारा आशय अश्या सामग्रीचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. जर एखाद्या माहितीमुळे भारताची अखंडता संकटात येणार असेल, समाजामध्ये तेढ, वैर – भावना निर्माण होत असेल तर तसेच देशातील रक्षा, सुरक्षा धोक्यामध्ये येत असेल तर अशा प्रकारचा आशय प्रसारित करू नये, असे देखील सांगण्यात आलेले आहे. चित्रपट हे अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा एक माध्यम मानले गेले आहे. आपणास सांगू इच्छितो की, सार्वजनिक व्यवस्थेमध्ये लोकांच्या भावना आणि परंपरा लोकांचा विश्वास, सन्मान न करणे अश्लिलता, लिंग, हिंसा आणि चुकीची माहिती पसरवणे इत्यादी गोष्टींवर चित्रपटांमध्ये प्रतिबंध घालण्यात आलेले आहे. या सर्व गोष्टींचा उल्लेख कलम 19(1)(ए) मध्ये देखील करण्यात आलेला आहे.

सिनेमॅटोग्राफी कायदा 1988 कलम 8 आणि नियम अकराच्या अंतर्गत वेगळे नियम तयार करण्यात आलेले आहे. बोर्डाने या चित्रपटाला मान्यता देण्याआधी समाजामध्ये कोणत्याही प्रकारची वैर भावना निर्माण होणार नाही त्याचबरोबर समाजाचे हित लक्षात घेऊन चित्रपटाला मान्यता द्यायला हवी.

अशाप्रकारे करू शकता तक्रार

चुकीचा आशय आणि आक्षेपार्ह कशाबद्दल तुम्ही तक्रार करू शकता. अ‌ॅडवोकेट जोशी यांच्या मते जर तुम्हाला एखाद्या चित्रपटातील असे आक्षेपार्ह वाटल्यास व चित्रपटाला प्रमाण पत्र मिळून सुद्धा अशावेळी तुम्ही सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडे याबद्दल तक्रार करू शकता याशिवाय भारत सरकार च्या CPGRAMS लोक तक्रार पोर्टल वर देखील तुम्ही तक्रार नोंदवू शकता.आयपीसी,1860 नुसार चुकीची माहिती आणि दृश्य प्रसार ,माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 व कोड ऑफ सिविल प्रोसिजर अंतर्गत तुम्ही आक्षेपार्ह माहितीबद्दल तक्रार करू शकता.

इतर बातम्या :

जपानचे पंतप्रधान Fumio Kishida आणि Pm Modi यांची मोठी घोषणा, भारतात 3.2 लाख कोटी गुंतवणार

‘हिंदूहृदयसम्राट ऐवजी शिवसेनेनं जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलं’, MIM च्या मुद्द्यावरुन फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.