खरोखरच महिलांना मासिक पाळीमध्ये रजेची आवश्यकता? थेट स्मृती इराणी यांचा विरोध, थेट म्हणाल्या..

गेल्या काही दिवसांपासून एक विषय प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे या विषयावर दरवेळी फक्त चर्चा होते. त्यानंतर दोन गट होताना कायमच दिसतात. महिलांना मासिक पाळीमध्ये रजा मिळावी अशी मागणी सातत्याने केली जाते. नुकताच याबद्दल बोलताना स्मृती इराणी या दिसल्या आहेत.

खरोखरच महिलांना मासिक पाळीमध्ये रजेची आवश्यकता? थेट स्मृती इराणी यांचा विरोध, थेट म्हणाल्या..
Follow us
| Updated on: Dec 15, 2023 | 5:37 PM

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून एक विषय प्रचंड चर्चेत आहे. तो म्हणजे शासकीय कर्मचारी आणि खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळीमध्ये रजा द्यावी. विशेष म्हणजे ही रजा प्रत्येक महिन्यात दोन दिवस मिळावी. भारतामध्ये केरळ आणि बिहार राज्यात महिलांना महिन्यांमध्ये अतिरिक्त दोन रजा दिल्या जातात. विशेष म्हणजे यादरम्यान महिलांची पगार देखील कापली जात नाही. फक्त केरळ आणि बिहारच नाही तर अनेक देशांमध्ये याबद्दलचा कायदा आहे. सर्वात अगोदर स्पेन देशात याबद्दलचा कायदा तयार करण्यात आला.

स्पेनमधील महिलांना दरमहिन्याला मासिक पाळीदरम्यान रजा मिळते. नुकताच याबद्दल सभागृहात केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मोठे भाष्य केले आहे. इतकेच नाही तर महिलांना मासिक पाळीदरम्यान दोन सुट्टया द्याव्यात, यावर त्यांनी थेट असहमती व्यक्त केलीये. यासोबत त्यांनी मोठे विधान देखील केले आहे.

स्मृती इराणी या म्हणाल्या की, हा एक महिलांच्या जीवनातील नैसर्गिक भाग आहे. मुळात म्हणजे याकडे दुर्बलता म्हणून अजिबातच बघू नये. जर महिलांना मासिक पाळीमध्ये रजा मिळाली तर ते कुठेतरी भेदभावाचे कारण बनू शकते, असे स्मृती इराणी यांनी थेट म्हटले आहे. इतकेच नाही तर स्मृती इराणी या म्हणाल्या की, जे या प्रक्रियेतून जात नाहीत त्यांची याबाबत वेगळी विचारसरणी असून शकते.

राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्मृती इराणी दिसल्या. मुळात म्हणजे मासिक पाळी रजेचा विषय आजपासून नाही तर तब्बल 2017 पासून सतत चर्चेत आहे. मात्र, यावर अजूनही काही पाऊले ही उचलण्यात आली नाहीत. सर्वात अगोदर या विषयाला कांग्रेस पार्टीचे नेते खासदार निनॉन्ग यांनी हात घातला होता.

निनॉन्ग यांनी म्हटले होते की, माझ्या पत्नीला मासिक पाळीमध्ये प्रचंड त्रास होतो. माझ्या मुलींसोबत देखील या विषयावर माझी अनेकदा चर्चा होते. सरकारी आणि खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना दोन दिवस मासिक पाळीसाठी रजा मिळावी. मात्र, त्यानंतर यामुद्दावर दोन गट हे बघायला मिळाले. अनेक देशांमध्ये महिलांना दोन दिवस मासिक पाळीमध्ये रजा मिळते.

स्मृती इराणी यांनी थेट या गोष्टीला आता सहमती दर्शवली आहे. मात्र, स्मृती इराणी यांचा हा निर्णय अनेकांना अजिबातच आवडला नसल्याचे बघायला मिळते. हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत नक्कीच येऊ शकतो. स्पेन, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये महिलांना दोन दिवस मासिक पाळीमध्ये सुट्ट्या मिळतात आणि त्यांचा कोणत्याही प्रकारचा पगार हा कापला जात नाही हे विशेष आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.