बघता बघता गगनाला भिडले तेल, डाळ, मसाल्यांचे भाव! वर्षभरात अत्यावश्यक गोष्टींचे दर झाले दुप्पट!
आजारपणामुळे आणि घटत्या कमाईमुळे त्रस्त झाल्यानंतर, आता वाढत्या महागाईमुळे लोकांना दुहेरी फटका बसत आहे. जर आपण मागील वर्षाच्या लॉकडाऊनपासून आतापर्यंत वस्तूंच्या किंमतींची तुलना केली, तर दररोज वापरल्या जाणार्या वस्तूंच्या किंमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत.
मुंबई : कोरोना विषाणूंमुळे लोकांना बर्याच गोष्टींचा त्रास सहन करावा लागला आहे आणि जवळपास दीड वर्षांपासून लोक त्यामुळे त्रस्त झाले आहेत. या आजारामुळे अनेकांनी आपले प्रियजन गमावले आहेत, तर दुसरीकडे या आजारामुळे बहुतांश लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. आजारपणामुळे आणि घटत्या कमाईमुळे त्रस्त झाल्यानंतर, आता वाढत्या महागाईमुळे लोकांना दुहेरी फटका बसत आहे. जर आपण मागील वर्षाच्या लॉकडाऊनपासून आतापर्यंत वस्तूंच्या किंमतींची तुलना केली, तर दररोज वापरल्या जाणार्या वस्तूंच्या किंमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत (The prices of essentials things like pulses and oils gets doubled during the past year).
अलीकडेच तेलाच्या वाढत्या भावमुळे अनेक चर्चा झाल्या आहेत. पण याशिवाय दररोजच्या वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. गेल्या एका वर्षात या किंमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत आणि त्याउलट, लोकांची कमाई कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत खाण्यापिण्याच्या आणि महत्वाच्या वस्तूंच्या महागाईबद्दल, ज्यांचे गेल्या एका वर्षात दर किती वाढले…
तेलाच्या किंमती
यावर्षी मोहरीच्या तेलाचे दर खरोखरच गगनाला भिडले आहेत. गतवर्षी सुमारे 100 रुपये प्रति लीटर या दराने विकले जाणारे हे तेल या जूनमध्ये दुपटीने वाढले आहे. या जूनमध्ये तेल 200 किंवा त्याहून अधिक किंमतीला विकले गेले आहे. तेल कारखाना बंद झाल्यामुळे आणि तेल आयात कमी झाल्यामुळे असे घडल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, कारण काहीही असो, त्याचा सर्वसामान्यांवर प्रचंड परिणाम झाला आहे.
डाळही महागली
पूर्वी असे म्हटले जात होते की, डाळ अगदी साधे अन्न आहे आणि डाळ-चपाती हे सामान्य माणसाचे अन्न मानले जात होते. तथापि, आता उलट झाले आहे. गेल्या वर्षी 23 जूनला तुरीची डाळ 65-125 रुपये प्रति किलो दराने विकली गेली होती आणि आता या किंमती 150 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत.
मसाल्याचा तडकाही महागला
या एका वर्षात मसाल्यांनीही आपला रंग दाखवला आहे. मसाल्यांच्या किंमतीतही तब्बल दीड ते दोन पटींनी वाढ झाली आहे. पूर्वी मिरची 80-100 रुपये प्रति किलोला विकली जात होती, तीच मिरची आता 160 रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे.
गव्हाचे वाढते दर
एक किलो गव्हाचे पीठ 23 जूनला 20 ते 57 रुपयांच्या दराने विकले गेले होते, जे एका वर्षापूर्वी 17 ते 45 रुपयांना विकले जात होते. सध्या गहू बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहेत. पण, तरीही लवकरच या किंमती आणखी वाढवू शकतात.
चहाचे घोटही महागडे
असे सांगितले जात आहे की, चहाचे उत्पादन आणि पुरवठा या दोन्ही गोष्टींवर कोरोना लॉकडाऊनमुळे परिणाम झाला आहे, ज्याचा त्याच्या किंमतींवर देखील खूप परिणाम झाला आहे. तसे, चहाचे बरेच प्रकार बाजारात उपलब्ध आहेत आणि प्रत्येकाच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. परंतु, सरासरी अंदाज घेतल्यास चहाच्या किंमतीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
(The prices of essentials things like pulses and oils gets doubled during the past year)
हेही वाचा :
PHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान
पावसाळ्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढेल का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…