जगातील ‘या’ तीन नद्या गंगेसारख्या पवित्र, एकीचं तर थेट आकाशगंगेशी कनेक्शन जाणून घ्या
जगात आणखी तीन अशा नद्या आहेत ज्यांना तेथील लोक गंगेइतकंच पवित्र मानतात. तर आज आपण या तीन नद्यांबाबत आणि त्या इतक्या पवित्र का मानल्या जातात याबाबत जाणून घेणार आहोत.

मुंबई : गंगा नदी ही भारतातील सर्वात पवित्र नदी मानली जाते. या पवित्र नदीला सर्व लोक आई म्हणतात. पण भारतात जशी गंगा नदी पवित्र आहे त्याप्रमाणे जगात आणखी तीन अशा नद्या आहेत ज्यांना तेथील लोक गंगेइतकंच पवित्र मानतात. तर आज आपण या तीन नद्यांबाबत आणि त्या इतक्या पवित्र का मानल्या जातात याबाबत जाणून घेणार आहोत.
या तीन नद्यांपैकी पहिली नदी म्हणजे उरूबांबा नदी. उरूबांबा नदी ही दक्षिण अमेरिका या देशात आहे. उरूबांबा खोऱ्यातील इंका लोक या नदीला पवित्र मानतात. हे लोक या नदीला आईसारखं मानतात. तसंच त्यांचं पवित्र स्थान माचू पिच्चू देखील या नदीच्या काठावर आहे. येथील लोकांचा असा विश्वास आहे की ही पृथ्वीवरील एकमेव अशी नदी आहे जी थेट आकाशगंगेला प्रतिबिंबित करते.
आशियातील जॉर्डन नदी ही ख्रिश्चन धर्मानुसार अतिशय पवित्र मानली जाते. ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये या नदीला महत्त्वाचं स्थान आहे. ख्रिश्चन लोकांसोबतच ज्यू लोकही या पवित्र मानतात. पण सध्या इस्त्रायली आणि अरबी लोकांच्या भांडणामुळे ही नदी अतिशय प्रदूषित झाली आहे.
योरूबा जमातीतील लोकांसाठी नायजेरियाची ओसुन नदी अतिशय महत्त्वाची नदी आहे. या नदीला योरूबा जमातीचे लोक गंगेप्रमाणे जीवनदायी मानतात. तसंच या नदीच्या काठावर योरूबा जमातीची अनेक पवित्र ठिकाणे असल्यामुळे या नदीची पूजा केली जाते. या नदीवर श्रद्धा ठेवणारे लोक म्हणतात की, त्यांच्या पूर्वजांचे आत्मे या नदीत राहतात.
