एक दोन नव्हे तब्बल 2 हजार 779 मोबाईल्सचा मालक आहे हा व्यक्ती, Guinness World Records मध्ये नोंद

जगातील सर्वाधिक मोबाईल फोन असण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड एक्रेमच्या नावावर आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत वेबसाइटनुसार, एक्रेमकडे 150 वेगवेगळ्या मॉडेलचे 2,779 मोबाईल आहेत.

एक दोन नव्हे तब्बल 2 हजार 779 मोबाईल्सचा मालक आहे हा व्यक्ती, Guinness World Records मध्ये नोंद
जगातील सर्वाधिक मोबाईल फोन असण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नावावर असणारा एक्रेम कारागुदेकोग्‍लुImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 11:12 AM

मुंबई : आजच्या काळात स्मार्टफोन (Smartphone) असणं अत्यंत आवश्‍यक आहे. अनेक ठिकाणी स्मार्टफोन हा कामाचा भाग बनला आहे. त्याशिवाय कामाचा समन्वय राखणे अत्यंत कठीण होउन बसले आहे. परंतु आता विचार करा की, एखाद्या व्यक्तीकडे किती स्मार्टफोन असू शकतात… एखाद्याकडे फारतर दोन किंवा तीन स्मार्ट फोन असू शकतात. त्यापेक्षा जास्त फोन सांभाळनेही अवघड असते. परंतु आम्ही तुम्हाला सांगितले की एका व्यक्तीकडे तब्बल अडीच हजारांहून अधिक फोन आहेत, तर तुम्हाला विश्‍वास बसणार नाही. परंतु हे खर आहे. याबाबत एक्रेम कारागुदेकोग्‍लु (Ekrem Karagüdekoglu) नावाच्या तुर्की माणसाचा रेकॉर्ड धक्कादायक आहे. जगातील सर्वाधिक मोबाईल फोन असण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness world record) एक्रेमच्या नावावर आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत वेबसाइटनुसार, एक्रेमकडे 150 वेगवेगळ्या मॉडेलचे 2,779 मोबाईल आहेत. जाणून घ्या, त्यांच्या मोबाईलवरील प्रेमाची कहाणी…

कलेक्शनमध्ये इतके मोबाईल्स आल्यानंतर एक्रेमला आता त्यांचे संग्रहालयात रूपांतर करायचे आहे. एक्रेम हे व्यवसायाने सेलफोन दुरुस्ती तंत्रज्ञ आहेत. आपल्या कलेक्शनची व्याप्ती वाढवण्यासाठी तो काम करत आहे. यामुळेच त्यांच्याकडे जगभरातील अनेक देशांतील मोठ्या ब्रँडचे फोन आहेत. अक्रेमला नेहमीच मोबाईलची विशेष आवड होती. म्हणूनच 2010 मध्ये त्यांनी मोबाईल कलेक्शन तयार करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे 1980 च्या दशकातील फोन देखील आहेत त्यात खूप कमी बटणांचा वापर होता.

जवळपास सर्वच फोन सुरु

‘डेलीसबाह’च्या रिपोर्टनुसार, एक्रेमच्या दाव्यानुसार त्याचे सर्वच फोन सुरु आहेत. त्यांच्या कलेक्शनमध्ये असे अनेक फोन आहेत जे ग्राहकांनी त्यांना मोफत दिले, तर काही फोन असेही आहेत जे एका कंपनीने लिमिटेड एडिशन म्हणून लॉन्च केले होते. म्हणजेच तो खास आणि निवडक फोनही त्यांच्या कलेक्शनचा एक भाग आहे. प्रत्येक फोनची स्वतःची एक गोष्ट आहे. एक्रेम म्हणतात. हे फोन माझ्यासाठी खास आहेत. या फोनचे संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी अधिक चांगल्या प्रसिद्धीचीही गरज भासणार आहे.

पूर्वीचे स्मार्ट फोन खरं सोनं

स्मार्टफोनचा देखील एक मनोरंजक इतिहास आहे, एक्रेम म्हणतात, आजच्या युगातील स्मार्टफोनपेक्षा जुन्या काळातील मोबाईल फोन्स खूपच चांगले होते. पूर्वी लोक तो हातात धरून कोणाचा तरी मेसेज येण्याची वाट पाहत असत, पण आता तसे राहिले नाही. आता स्मार्टफोनमध्ये मेसेज आला की लोक तो स्वाइप करतात. ही सवय आपल्याला आळशी बनवत आहे. पूर्वी मेसेज येण्याची जेवढी आतूरता होती तेवढी आता दिसून येत नाही. नवनवीन तंत्र असलेले स्मार्टफोन आले असले तरी पूर्वीच्या फोनला ते टक्कर देउ शकत नाही. भावनेतील ओलावा आता कोरडा पडत चालला आहे.

संबंधित बातम्या

TRP: कशी ठरविली जाते टीव्ही न्यूज चॅनल्सची रेटिंग, BARC म्हणजे नेमके काय? टीआरपी मोजण्यासाठी कोणत्या तांत्रिक पद्धतीचा केला जातो वापर?

विजा चमकल्यावर ढगांचा गडगडाट आवाज येण्यामागे नेमके कारण काय,जाणून घेऊया इंटरेस्टिंग माहिती!

Punjab : मोबाईल रिपेअर करणाऱ्यानं चन्नी यांना धूळ चारली! वाचा आपच्या ‘आम’ उमेदवाराबद्दल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.