गुगल कर्मचाऱ्यांना काम न करता देतोय पगार, कारण काय ?
‘Business Insider’च्या रिपोर्टनुसार, DeepMind चे काही माजी कर्मचारी अजूनही कंपनीकडून पगार घेत आहेत. मात्र, ते आता तेथे काम करत नाहीत. याचे कारण एक करार किंवा नियम आहे. हा असा नियम आहे, ज्यात काही महिने त्या कर्मचाऱ्यांना इतरत्र काम करता येत नाही. पण आधीच्या कंपनीकडून वेतन सुरू राहते. याविषयी जाणून घेऊया.

तुम्हाला कुणी घरी बसल्या, बसल्या पगार दिला तर काय होईल? असंच काहीसं गुगलने केलं आहे. गुगलने काही कर्मचाऱ्यांना घरी बसून पगार देऊ केला आहे. हो. हे सत्य असून हे कर्मचारी घरी बसून पगार घेत आहे आणि गुगल सारखी मोठी कंपनी देखील त्यांना पगार देत आहे, आता यामागचं नेमकं कारण काय आहे, याविषयी जाणून घेऊया.
बड्या टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत असताना गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना काम न करता वर्षभराचा पगार देत आहे. होय, खरं तर गुगलचं असंच एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. गुगलच्या एआय शाखा DeepMind मधील काही अभियंत्यांना कोणतेही काम न करता संपूर्ण वर्षभराचा पगार दिला जात आहे. आता असं का केलं जात आहे? यामागचं कारण तरी काय? या प्रश्नांची उत्तर पुढे जाणून घेऊया.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
Business Insider च्या रिपोर्टनुसार, DeepMind चे काही माजी कर्मचारी अजूनही कंपनीकडून पगार घेत आहेत. मात्र, ते आता तेथे काम करत नाहीत. याचे कारण नॉनकॉम्पिटिशन करार (Noncompete Agreement) आहे. समजा हा असा नियम आहे ज्यात कर्मचाऱ्याला कंपनी सोडल्यानंतर दुसऱ्या मोठ्या कंपनीत काम करण्यापासून रोखले जाते. विशेषत: काही महिने त्या कर्मचाऱ्यांना इतरत्र काम करता येत नाही.
DeepMind मध्ये अशा कर्मचाऱ्यांना “Extended Garden Leave’वर ठेवण्यात आले आहे म्हणजेच ते कंपनीचा भाग नाहीत, तरीही ते इतर कोणत्याही कंपनीत जाऊ नयेत म्हणून त्यांना वर्षभर काम न करता पगार दिला जात आहे.
चर्चेचे कारण काय?
ओपनएआय, मेटा, एचपी आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या हजारो लोकांना कामावरून काढून टाकत असताना गुगलचे हे पाऊल वेगळ्या दिशेने बोट दाखवत आहे. DeepMind चा एक माजी कर्मचारी म्हणतो की “एआयच्या जगात एक वर्ष हा बराच काळ आहे”, याचा अर्थ असा आहे की, इतक्या दीर्घ विश्रांतीदरम्यान तांत्रिक प्रगतीमुळे ते मागे पडू शकतात.
गुगलचं उत्तर काय आहे? गुगलचे म्हणणे आहे की त्यांचा करार व्यवसायाच्या सर्व नियमांचे पालन करतो आणि कंपनी त्याच्या संरक्षणासाठी नॉनकॉम्पिटिशन क्लॉज वापरते. मात्र, काही कर्मचाऱ्यांना या अटी आवडत नाहीत. पण गुगलचे हे पाऊल लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
खरं म्हणजे घरी बसून पगार मिळत असला तरी या स्पर्धेच्या युगात कर्मचारी मागे पडू शकतात. त्यामुळे देखील गुगलचा हा निर्णय अनेक कर्मचाऱ्यांना फारसा आवडल्याचं दिसत नाही.