AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पृथ्वीवरचा सर्वाधिक श्रीमंत राजकारणी, २० महाल, गुप्त घोस्ट ट्रेन, तब्बल २०० अब्ज डॉलरची संपत्ती

२००७ मध्ये अमेरिकन सिनेट न्यायपालिकेसमोर एक अहवाला सादर केला होता. रशियाचे अध्यक्ष हे जगातील सर्वात श्रीमंत राजकीय व्यक्ती असल्याचा दावा त्या अहवालात केला आला होता. त्यांची संपत्ती २०० अब्ज डॉलर्स इतकी आहे.

पृथ्वीवरचा सर्वाधिक श्रीमंत राजकारणी, २० महाल, गुप्त घोस्ट ट्रेन, तब्बल २०० अब्ज डॉलरची संपत्ती
| Updated on: Jan 28, 2025 | 6:03 PM
Share

पृथ्वीतलावरील सर्वात श्रीमंत नेता म्हणून व्लादीमीर पुतीन यांचे नाव घेतले जाते. व्लादिमीर पुतिन यांनी स्वत:ला रशियाचे तहहयात अध्यक्ष करुन टाकले आहे. व्लादीमीर पुतीन रशियाचे राष्ट्राध्यक्ष असून ते जगातील सर्वात श्रीमंत राजकारणी देखील आहेत. पुतिन यांना वार्षिक 140,000 डॉलर  (सुमारे 11.7 कोटी रुपये ) वेतन मिळते. २००७ मध्ये अमेरिकन सिनेट न्यायपालिकेसमोर सादर केलेल्या अहवालात पुतिन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यांची संपत्ती २०० अब्ज डॉलर्स इतकी आहे. साल २०१५ मध्ये फोर्ब्स मासिकाने म्हटले होते की पुतिन यांच्या संपत्तीची पडताळणी करता येत नाही, ज्यामुळे त्यांना श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट करणे कठीण  असल्याचे म्हटले होते. व्लादिमीर पुतिन हे अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग, ओरॅकलचे संस्थापक लॅरी एलिसन आणि फ्रान्सचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्यापेक्षाही श्रीमंत असल्याचा दावा केला जातो.

महागडी घड्याळे आणि आलिशान राहणीमान

अमेरिकेतील प्रतिष्ठित मॅगझिन ‘फॉर्च्यून’च्या २०१५ च्या एका अहवालात पुतीन यांच्याकडे २० हून अधिक आलिशान राजवाडे आणि सुमारे ७०० गाड्या असल्याचा दावा करण्यात आला होता. याशिवाय त्यांच्याकडे ५८ खाजगी विमाने आणि ‘द फ्लाइंग क्रेमलिन’ नावाचे एक हेलिकॉप्टर देखील आहे. पुतिन यांच्याकडे ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची आलिशान खाजगी बोट आहे. या बोटीचे नाव ‘शेहराजादे’ असे आहे. पुतिन यांना लक्झरी घड्याळे खूप आवडतात. त्याच्याकडे असंख्य घड्याळे आहेत, ज्यांची किंमत ६० हजार ते ५ लाख डॉलर्सपर्यंत आहे.

बुलेटप्रुफ ट्रेन

ब्लॅक सी म्हणजेत काळ्या समुद्राच्या काठावर पुतीन यांचे १९०,००० चौरस फूट पसरलेले एक भव्य राजवाड्यासारखे घर आहे. या राजवाडा सदृश्य घराची किंमत १ अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. पुतीनच्या या राजवाड्यात एक भूमिगत बंकर देखील आहे. याशिवाय, स्विमिंग पूल, जिम, कॅसिनो, सिनेमा हॉल अशा जबरदस्त सुविधा देखील आहेत. याशिवाय पुतीन यांच्याकडे एक घोस्ट ट्रेन देखील आहे. २२ डबे असलेली ही ट्रेन पूर्णपणे बुलेटप्रूफ आहे, तिचे दरवाजे आणि खिडक्या देखील बुलेटप्रूफ आहेत. या ट्रेनमध्ये  हॉस्पिटलची सुविधा देखील आहे.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.