PHOTO | Mars Water Discovery : मंगळावर पाण्याची अपेक्षा ठरली फोल, ग्रहावर तलाव नाहीत
Mars Water Found : वैज्ञानिकांनी युरोपियन स्पेस एजन्सीच्या मार्स एक्स्प्रेसवर बसवलेल्या मार्सिसचा डेटा गोळा केला आहे. यामुळे मंगळावर पाण्याच्या उपस्थितीची आशा डळमळीत झाली आहे. नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की ते पाणी नाही तर दुसरे काहीतरी आहे.
Follow us
मंगळावर पाण्याच्या शोधात असलेल्या शास्त्रज्ञांच्या आशेला मोठा धक्का बसला आहे (Mars Water Availability). मंगळावर पाण्याच्या तलावाच्या अस्तित्वाबद्दल बरीच चर्चा झाली, असे म्हटले जात आहे की ती चिकण माती असू शकते. प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूटचे संशोधक इसाक स्मिथ म्हणतात की, 2018 मध्ये युरोपियन स्पेस एजन्सीच्या मार्स एक्स्प्रेसवर मार्सिसकडून गोळा केलेला डेटा मंगळावर पाण्याच्या उपस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित करतो.
स्मिथ म्हणाले की चिकण माती क्रायोजेनिक तापमानात परावर्तन करू शकते. त्यांचे म्हणणे आहे की पाणी द्रव स्वरूपात राहण्यासाठी आवश्यक तापमान आणि मीठ यामुळे असे दिसते की ते प्रत्यक्षात पाणी नसून स्मेक्टाइट्स(Smectites) नावाचा खनिज पदार्थ आहे.
ही एक चिकणमाती आहे जी ज्वालामुखीच्या खडकांसारखी आहे आणि मंगळावर (Mars Water Atmosphere) मुबलक प्रमाणात आढळते. संशोधकांनी हे स्केक्टाइट्स-42 डिग्री सेल्सियसवर ठेवले आणि त्या तापमानात जर त्यावर पाणी असेल तर ते मार्सिसप्रमाणे दिसते.
2018 मध्ये, मार्सिस(MARSIS)ने मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाखाली पाण्याची उपस्थिती शोधली(MARS Water Frozen Clay Soil). मग दोन वर्षांनंतर, संशोधकांना सुमारे 6 मैलाचे अनेक नवीन खारट तलाव सापडले. स्मिथचे म्हणणे आहे की, पाणी द्रव स्वरूपात शोधणे कठीण आहे, परंतु नासाच्या जेपीएलच्या जेफ्री प्लॉटसह अनेक लोक यावर विश्वास ठेवण्यास नकार देतात.
स्मिथ म्हणाले की, मंगळावर पाण्याची उपस्थिती वास्तविक सिद्ध झालेली नाही आणि नवीन दस्ताऐवजात पाणी नाही असे म्हटले आहे. पण आम्ही सहमत होण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या अमेरिका आणि चीनसह इतर अनेक देश त्यांच्या रोव्हरद्वारे मंगळावर जीवसृष्टीच्या शक्यतांचा शोध घेत आहेत.
अलीकडेच, नासाच्या Ingenuity मार्स हेलिकॉप्टरने देखील आपले 10 वे आणि आजपर्यंतचे सर्वोच्च उड्डाण केले आहे. त्याच वेळी, पहिल्यांदाच, मंगळाच्या आतील थरांबद्दल महत्वाची माहितीही प्राप्त झाली आहे. येथे पृष्ठभागाच्या खाली असलेले थर 41 मैल दूर सापडले आहेत. प्रत्येक थर वेगळा आहे आणि आवरण 500 मैल खाली आहे. तर त्याचे उर्वरित भाग लोह आणि निकेलचे बनलेले कोर आहेत.