अकाली केसांत पांढरेपणाची समस्या सतावतेय? करू नका चिंता, प्रत्येक वेळी आहार नाही तर ‘या’ काही गोष्टीही ठरतात कारणीभूत!

What causes hair to turn grey : सध्या अकाली केस पांढरे होण्याची समस्या तरुणांमध्ये तसेच लहान मुलांमध्ये सुद्धा उद्भवू लागलेली आहे. वैज्ञानिक या समस्या मागील कारणे शोधण्यात व्यस्त आहेत. केसांचे अकाली पांढरे होणे यासाठी वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी जे संशोधन केलेले आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

अकाली केसांत पांढरेपणाची समस्या सतावतेय? करू नका चिंता, प्रत्येक वेळी आहार नाही तर 'या' काही गोष्टीही ठरतात कारणीभूत!
लहान वयात केस पांढरे होण्याची समस्या/प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 12:35 PM

एक काळ असा होता की आपले वय वर्षे 50 झाल्यावर केसांचा रंग बदलत असे. आपले केस अकाली पांढरे(Pre matured Grey hair) झालेले पाहायला मिळायचे. अनेकदा पिकलेले केस(White hair) म्हणजेच अनुभवाचे प्रतीक सुद्धा मानले जात असे परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळे उलटे घडत आहे आता तरुणांमध्येच नाहीतर लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला अकाली केस पांढरे होण्याची समस्या उद्भवताना पाहायला मिळत आहे म्हणूनच अनेक वैज्ञानिक या समस्यां(problem)मागील कारणे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. केसांमध्ये पांढरेपणा येण्यामागे वैज्ञानिकांनी जे काही सांगितले आहे ते आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

सायन्स फोकसचा रिपोर्ट

सर्वात आधी आपण आपल्या केसांचा रंग पांढरा होतो याबद्दल जाणून घेऊ या. सायन्स फोकस यांच्या रिपोर्टनुसार आपले केस काळे होण्यामागील मेलॅनिनचा सर्वात जास्त वाटा असतो. हे एक पिगमेंट असते जे आपल्या केसांना काळा रंग प्रदान करत असते. जेव्हा आपल्या शरीरामधील मेलॅनिनची कमतरता निर्माण होऊ लागते अशा वेळी आपल्या केसांचा रंग बदलू लागतो आणि परिणामी केसांना पांढरा रंग येऊ लागतो. मनुष्यच नाही तर प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला हा नियम लागू होताना दिसतो, आता समजून घेऊ या की अशी परिस्थिती नेमकी का उद्भवते त्यामागील काय आहे कारण..

मिलेनोसाइट्सचा प्रभाव

रिपोर्ट असे सांगतो, की आपल्या केसांच्या मुळाशी मिलेनोसाइट्स नावाच्या पेशी असतात ज्यामध्ये मिलेनियम तयार होते आणि यातूनच आपल्या केसांना मेलॅनिन हे तत्व मिळते. या कारणामुळेच आपले केस आपल्याला काळे दिसू लागतात. जसा व्यक्ती वृद्ध होत जातो त्याच बरोबर या पेशींमध्ये सुद्धा फरक जाणवू लागतो त्यांची कार्यक्षमता हळूहळू कमी होते आणि मेलॅनिनचा प्रभाव कमी होऊन त्यांचा आपल्या केसांवर विपरीत परिणाम होताना दिसतो. अशावेळी आपल्या केसांचा रंग पांढरा होऊ लागतो परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये ही समस्या तरूण मंडळी यांना तर उद्भवत आहे पण त्याचबरोबर अनेकदा लहान मुलांनासुद्धा अकाली केस पांढरे होण्याची समस्या त्रास देत आहे. या समस्या मागे अनेक वेगवेगळी कारणे सुद्धा असू शकतील.

पोषक तत्वांची कमतरता आणि…

रिपोर्टनुसार असे होण्यामागे अनेक कारणे आहेत, जसे की शरीरामध्ये पोषक तत्वांची असलेली कमतरता, स्मोकिंग, एखादे आजारपण, ताण-तणाव किंवा एखादी जीवनामध्ये घडलेली आकस्मिक घटना यांमुळे मानसिक संतुलन बिघडणे इत्यादी सगळ्या समस्या सुद्धा केसांना पांढरे होण्यासाठी कारणीभूत ठरतात. अगदी कमी वयात केसांना पांढरेपण येण्यामागे नेमके काय कारण असते याबाबत येथील कोलंबिया युनिव्हर्सिटी इरविंग मेडिकल सेंटरमधील संशोधकांनी या समस्येवर संशोधन केलेले आहे. या संशोधनामध्ये अनेक अशा काही गोष्टी समोर आलेले आहेत ज्या आपल्याला थक्क करणाऱ्या आहेत.

ताण तणाव –

संशोधकांचे असे म्हणणे आहे, की केसांना पांढरेपणा येण्याचे सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्या जीवनात असलेला ताण तणाव. अभ्यासाअंतर्गत हे सिद्ध झाले आहे, की लोकांनी कोणत्याही गोष्टीचे टेन्शन घेण्यास कमी केले तेव्हा त्यांचे केस पांढरे होणे कमी होऊ लागले त्यानंतर त्यांचे केस पुन्हा काळे होण्यास सुरुवात झाली. संशोधनानुसार ताण तणावाचा आपल्या केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. त्याचबरोबर हा सगळा अभ्यास करत असताना यामागील पुरावेसुद्धा जमा करण्यात आले आहेत.

तुम्ही वापरत असलेल्या सेफ्टी पिनचा इतिहास माहितीय काय, जाणून घ्या ही मजेशीर गोष्ट…

हॉट एयर बलूनची सफारी का आहे इतकी महागडी? यामध्ये काय असतं खास?

PHOTO | जगातील सर्वात मोठ्या क्रूझचा प्रवास झालाय सुरू, हे क्रुझ नाही तर आहे समुद्रावर वसलेले शहर!

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.