Ola-Uber आणि Rapido मध्ये तुम्ही स्वतःचे नाव, पत्ता देता..त्या सर्व माहितीचे कंपन्या काय करतात माहितीये?
Surfshark चे सीईओ सांगतात की लोक कोणत्याही प्रकारचे ॲपलिकेशन्स इंस्टॉल करतात त्यावेळी सुरुवातीला युजर्सकडून डेटा शेअरिंगसाठी काही परमिशन घेतल्या जातात. अनेक ॲप्लिकेशन्स असे असतात जे त्यांना हवा असलेला डेटा रीड आणि युज करण्यासाठी परमिशन घेतात.
दिल्ली एनसीआर (Delhi-NCR) सोबतच देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर साहजिकच तुम्हाला उबर,ओला आणि रॅपिडो (Uber, Ola, Rapido) यांसारख्या सर्विसेसबद्दल माहिती असेलच किंबहुना तुम्ही त्या सर्विसचा वापर सुद्धा करत असाल. याशिवाही ग्रैबटैक्सी (Grabtaxi) आणि यांडेक्स गो कंपन्या सुद्धा मार्केटमध्ये आहेत, ज्या तुम्हाला ऑन डिमांड ट्रांसपोर्टेशनची सुविधा प्रदान करतात. या कंपन्यांच्या ॲप मध्ये तुम्ही तुमची सर्व माहिती भरत असता. तुम्ही कुठे जाता येता त्यासंबंधित सर्व माहिती त्यांना समजत असते. या कंपन्या मोबाईल ॲपच्या मदतीने तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर अशी माहिती आपल्याकडे जमा करत असतात. एक युजर म्हणून तुम्हाला हे सांगितले जाते की तुमच्याकडून दिली जाणारी माहिती एक चांगली सर्व्हिस देण्यासाठी घेतली जात आहे. मात्र तुम्हाला हे माहित आहे का की या कंपन्या तुमची वैयक्तिक माहिती (Personal Data)चे काय करतात? एका अभ्यासामध्ये ही गोष्ट समोर आली आहे की तुमची पर्सनल माहिती या कंपन्या डेटा स्वरूपात जमा करत असतात ज्याच्या मोबदला त्यांना खूप चांगली रक्कम मिळत असते.
डेटा कलेक्ट करण्यात माहिर आहेत या कंपन्या..
बिजनेस स्टँडर्डच्या एका रिपोर्टनुसार सायबर सिक्युरिटी कंपनी Surfsharkने केलेल्या एका अभ्यासात ही माहिती समोर आली आहे की या कंपन्या ग्राहकांचा डेटा कॅलेक्ट करण्यात अतिशय माहिर असतात. खासकरून ग्रैबटैक्सी, यांडेक्स गो आणि उबर यांसारख्या कंपन्या अधिक प्रमाणात डेटा कलेक्ट करत असतात. या सुचीमध्ये ओला सहाव्या क्रमांकावर आहे. ग्रैबटॅक्सीचा तुलनेत अतिशय कमी डेटा रॅपीडो कलेक्ट करते. तर दुसरीकडे टॅक्सीईयू सर्वात कमी डेटा कलेक्ट करणारी कंपनी आहे.
तुमच्या प्रत्येक हालचालींवर नजर!
या अभ्यासात हे निष्कर्ष समोर आले आहेत की मोबाईल ॲपच्या माध्यमातून या कंपन्या तुमची खूप सारी माहिती गोळा करत असतातच शिवाय तुमच्या प्रत्येक हालचालीवर यांची नजर असते. टॅक्सीईयू आणि रॅपीडो यांसारख्या कंपन्या ॲप क्रॅश होणे, परफॉर्मेंस, यूजेज यांसारखे डेटा गोळा करतात. तर लीकॅब (LeCab) सारखी कंपनी एड्रेस, लोकेशन आणि ईमेल आईडी यांसारखी माहिती घेत असते. अनेक रिपोर्ट अनेक रिपोर्ट सांगतात या कंपन्या तुमच्या वेगवेगळ्या हालचालींवर सुद्धा नजर ठेवून असतात. जसे की तुम्ही कोणत्या वेबसाईटला विजीट करता, तुम्ही कशा पद्धतीने पेमेंट करता यांसारखी माहिती त्यांच्या खुप कामाची असते.
तुमच्या डेटाचे काय करतात या कंपन्या?
हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की वैयक्तिक माहितीसोबत (Personal Information) या कंपन्या काय करतात? तर याचे उत्तर असे आहे की या कंपन्या तुमच्याकडून कलेक्ट केलेली सर्व माहिती थर्ड पार्टीला विकतात. या थर्ड पार्टी म्हणजे अशा कंपन्या असतात ज्या ऍडसाठी या प्रकारच्या डेटाचा वापर करतात. तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करत होतात, त्या गोष्टी तुम्ही सर्च करत होतात, त्या पद्धतीच्याच जाहिराती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसल्या तर आश्चर्य वाटत कामा नये. असे यासाठी घडते कारण त्या कंपन्यांकडे आधीपासूनच तुमचा सर्व डेटा उपलब्ध असतो.
काय काय माहिती विकतात कंपन्या?
Surfshark चे सीईओ Vytautas Kaziukonis यांच्या मते, या अभ्यासात ज्या 30 राईड हेलिंग ॲप (Ride Hailing Apps)चा समावेश करण्यात आला होता, त्यापैकी नऊ कंपन्या अशा आहेत ज्या ग्राहकांची माहिती थर्ड पार्टी ॲडव्हर्टायझिंगसाठी (Third Party Advertising) विकतात.
यामध्ये ग्राहकांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल (Name, Address, Mobile Number and Email id) या प्रकारच्या माहितीचा समावेश आहे. उबर आणि लिफ्ट या प्रकारचे काही ॲप तर लिंग, जात, बर्थ इन्फोर्मेशन बायोमेट्रिक डेटा (Race, Ethnicity, Sexual Orientation, Childbirth Info, Biometric Data) यांसारखी माहिती सुद्धा कलेक्ट करतात.
आपण यापासून स्वतःच बचाव कसा करू शकतो?
Surfshark चे सीईओ यांच्या मते ,की लोक कोणत्याही प्रकारचे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतात, तर सुरुवातीला त्यांना डेटा शेअरिंग संबंधित परमिशन मागितली जाते. एप्लीकेशन परमिशन घेतात की या डेटा चा वापर ते करू शकतात. मात्र आपण एवढी मोठी इन्फॉर्मेशन असल्या कारणाने वाचण्याच्या भानगडीत पडत नाही आणि ओके करून ॲप सुरू करण्यावर भर देतो. त्याच नादात आपण आपली वैयक्तिक माहिती त्या ॲपला कलेक्ट करण्याची परवानगी देतो.
प्रत्येक गोष्टीची परमिशन न देता तुम्ही या समस्यांपासून वाचू शकता. जसे की हे राईड हेलींग ॲप्स आहेत तर तुम्ही फक्त त्यांना लोकेशन शेअर करू शकता आणि इंटरनेटचा वापर करत असाल तर त्याची परमिशन देऊ शकता. मात्र कॉन्टॅक्ट, फोन मेमरी, स्टोरेज वाचण्याची
परमिशन का द्यावी?
Kaziukonis सांगतात की या प्रकारच्या ॲप्सना संवेदनशील डेटा कलेक्ट करण्याची परमिशन देऊन आपण जोखीम घेत असतो. त्यांची सर्विस घेण्याच्या मोबदल्यात आपण पर्सनल डिटेल्स फिजिकल ऍड्रेस, तसेच थर्ड पार्टी पर्यंत आपली सर्व माहिती पोहोचवत असतो. तुम्ही कोणत्या प्रकारचे लिंक्सवर क्लिक करता कोणती वेबसाइट विजिट करता या सर्व प्रकारची माहिती थर्ड पार्टी पर्यंत पोहोचत असते. यामुळे कोणत्याही ॲपला परमिशन देताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा आपण आपल्या समस्यांमध्ये स्वतःहून भर पाडून घेऊ.