Corona Update | खरोखर NeoCoV कोरोनाचा नवा व्हेरिएंट आहे ? वाचा काय सांगताय तज्ज्ञ
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची चर्चा होत असताना निओकोव हा नवीन शब्द कानावर पडत आहे. अनेक लोक याला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट म्हणून संबोधत आहेत. याची अद्याप मानसाला लागन झाली नसल्याचा नवीन अभ्यास समोर आला असला तरी लोक याला का घाबरत आहेत ?
मुंबई : कोरोनाच्या महाभयंकर लाटेत ‘डेल्टा’ (Delta) या व्हेरिएंटने सर्वत्र हाहा:कार माजवला होता. तुलनेत तिसरी लाट सौम्य असली तरी रुग्णवाढीचा वेग हा डेल्टाच्या तुलनेत सहापट अधिक आहे. कोरोनाची तिसरी लाट अद्याप सुरु आहे. असे असताना आता कोरोनाच्या निओकोव्ह (NeoCoV) या नव्या व्हेरिएंटबाबत मोठी चर्चा सुरु आहे. अनेकांकडून हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक अभ्यासातून तर दर तिसरा व्यक्ती हा निओकोवचा बळी ठरु शकतो असेही सांगण्यात आले आहे. अद्याप मानसाला या आजाराची लागण झालेली नसली तरी सर्वसामान्यांमध्ये या नवीन प्रकाराची प्रचंड धास्ती आहे. निओकोव हा शब्द एमइआरएस-कोव (MERS-CoV) शी संबंधित आहे. ग्रीक वर्णमालेतील डेल्टा, ओमिक्रॉन इत्यादींवर आधारित कोरोनाच्या व्हेरिएंटचा सामना केल्यानंतर आता लोकांना या नवीन शब्दाची भीती वाटू लागली आहे. पण हा कोरोनाचा नवीन प्रकार आहे का? याबद्दल काळजी करण्याची गरज आहे का? त्याचा संसर्ग घातक ठरू शकतो का? अनेक अहवाल आले, पण सत्य काय? तज्ज्ञही याला फारशी चिंतेची बाब मानत नाहीत.
काय सांगतो अभ्यास
चीनी शास्त्रज्ञांच्या गटाने प्रसिद्ध केलेल्या पीअर रिव्ह्यू अभ्यासाचा भाग NeoCoV शी संबंधित आहे. यातील काही तज्ज्ञ वुहान विद्यापीठातील आहेत. दरम्यान, व्हायरसचा एक प्रकार म्हणून वापरला जाणारा NeoCoV हा शब्द MERS-CoV शी संबंधित आहे. Sars, MERS-CoV इत्यादी व्हेरिएंट हे कोरोनाशीच निगडीत आहेत. MERS-CoV हा 7 प्रकारच्या कोरोना विषाणूंपैकी एक असून मानवांनाही बाधित करु शकतो. 2010 च्या दशकात, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि दक्षिण कोरिया सारख्या देशांमध्ये MERS-CoV चा प्रादुर्भाव पसरला होता. डब्ल्यूएचओ (WHO)च्या म्हणण्यानुसार, MERS-CoV ने प्रभावित झालेल्या सुमारे 35 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. NeoCoV हा या विशिष्ट कोरोना विषाणूचा संभाव्य प्रकार आहे. आयएमएचे अध्यक्ष राजीव जयदेवेन यांनी ट्विटरवर सांगितले आहे की, हा नवा कोरोना विषाणू नाही किंवा कोणताही नवीन व्हेरिएंट नाही.
हा व्हेरिएंट केवळ वटवाघळातच
द प्रिंटेन आपल्या रिपोर्टमध्ये या नवीन प्रकाराबाबत माहिती दिली आहे. त्याच्या मते, ज्या रिसर्च पेपरमुळे NeoCoV चर्चेत आला आहे, तो देखील याला नोवेल कोरोनाव्हायरसचे नवीन स्वरूप मानत नाही. ते वटवाघुळांमध्ये आढळणाऱ्या MERS-CoV चे सर्वात जवळचे संबंधित मानले जाऊ शकतात. काही प्रकारचे वटवाघुळ NeoCoV संक्रमित करण्यासाठी ACE2 वापरू शकतात. ACE2 पेशींचा एक प्रकार आहे, ज्यांना जैविक भाषेत रिसेप्टर्स म्हणतात. NeoCoV विषाणू T510F उत्परिवर्तनानंतर मानवी पेशी ACE2 ला संक्रमित करू शकतो. रिसर्च पेपरमध्ये असे सांगण्यात आले आहे की, आतापर्यंत ते फक्त वटवाघुळांमध्येच आढळले आहे. NeoCoV विशिष्ट प्रकारच्या उत्परिवर्तनानंतरच मानवांना संक्रमित करू शकतो, त्याची आताच काळजी करण्याची गरज नाही नसल्याचेही तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. NeoCoV मानवी पेशींना संक्रमित करू शकतो की नाही याचा सध्या तपास सुरू आहे. म्हणूनच 10 वर्षांपेक्षा जुना असलेल्या या व्हायरसपासून घाबरण्याची गरज नाही, असे तज्ज्ञ सांगत आहेत.
इतर बातम्या :
‘मागे व्हा, तुम्ही ब्राम्हण नाही!’ असं म्हटल्यानंतर गांधींनी टिळकांच्या अंत्ययात्रेत नेमकं काय केलं?