विनोद कांबळी यांना झालेला आजार कोणता? त्या आजाराची कारणे अन् लक्षणे कोणती? किती गंभीर आहे हा आजार?
Vinod Kambli has clots in brain: मेंदूत रक्ताच्या गाठी होणे हा गंभीर आजार आहे. या आजारात रुग्णाचा मृत्यू होण्याचाही धोका आहे. मेंदूत सतत रक्तप्रवाह सुरु असणे गरजेचे आहे. मेंदू हा शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. जर रक्त प्रवाह थांबला तर ऑक्सीजन आणि ग्लूकोजचा प्रवाह थांबतो.
Vinod Kambli has clots in brain: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी आजारी आहे. त्यांना २३ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक कांबळी बेशुद्ध झाल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अनेक चाचण्या करण्यात आला. त्यानंतर त्यांचा मेडिकल अहवाल समोर आला. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आजाराचे निदान केले आहे. विनोद कांबळी यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याचे उपचार करणारे डॉ. विवेक त्रिवेदी यांनी म्हटले आहे. विनोद कांबळी यांनी सुरुवातीला मूत्रमार्गात संसर्ग आणि वेदना असल्याची तक्रार केली होती. परंतु अनेक चाचण्यानंतर मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी मिळाल्या.
विनोद कांबळी यांच्या उपचार सुरु असलेल्या रुग्णालयाने मोठा निर्णय घेतला आहे. विनोद कांबळी यांची आर्थिक परिस्थिती पाहून आयुष्यभर त्यांच्यावर मोफत उपाचार करण्याचा निर्णय ठाण्यातील आकृती रुग्णालयाचे प्रभारी एस सिंग यांनी जाहीर केला.
कसे होतात रक्ताच्या गाठी?
मेंदूत रक्ताच्या गाठी होणे हा गंभीर आजार आहे. या आजारात रुग्णाचा मृत्यू होण्याचाही धोका आहे. मेंदूत सतत रक्तप्रवाह सुरु असणे गरजेचे आहे. मेंदू हा शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. जर रक्त प्रवाह थांबला तर ऑक्सीजन आणि ग्लूकोजचा प्रवाह थांबतो. त्याचे गंभीर परिणाम होतात. त्यालाच रक्ताच्या गाठी किंवा ब्लड क्लॉटिंग म्हटले जाते. जेव्हा मेंदूतील रक्तवाहिन्या बंद होतात, रक्त प्रवाह आणि ऑक्सिजन मेंदूच्या टिशूजपर्यंत पोहोचत नाही तेव्हा मेंदूच्या पेशी मरतात. ज्यामुळे न्यूरोलॉजिकल डॅमेज होते.
मेंदूत रक्ताच्या गाठी होण्याची कारणे?
विविध आजारांमुळे मेंदूत रक्ताच्या गाठी तयार होतात. या दहा गोष्टी रक्ताच्या गाठी करण्यासाठी कारणीभूत ठरत असतात.
- उच्च रक्तदाब
- मधुमेह
- उच्च कोलेस्ट्रॉल
- लठ्ठपणा
- धूम्रपान
- जीवनशैली
- रक्त गोठण्याशी संबंधित कोणताही आजार
- नुकतीच झालेली शस्त्रक्रिया किंवा दुखापत
- अनुवांशिक घटक
- गर्भनिरोधक गोळ्या
मेंदूत रक्ताच्या गाठी होण्याची लक्षणे कोणती?
मेंदूत रक्ताच्या गाठी होण्याचे निदान अनेक चाचण्या केल्यानंतर होते. परंतु त्याची काही लक्षणे आहे.
- अचानक तीव्र डोकेदुखी
- सुन्नपणा किंवा अशक्तपणा
- स्मृती भ्रम
- चक्कर येणे
- संतुलन गमावणे
- बोलण्यात अडचण
हे ही वाचा…