अनेक स्टेशनच्या नावामध्ये सेंट्रलचा वापर केला जातो, माहित आहे का यामागील कारण?
स्टेशनच्या नावापुढे टर्मिनल तर कधी जंक्शन लिहिलेले असते तसेच, काही स्टेशन आहेत ज्यांच्या नावापुढे सेंट्रल आहे. जसे- मुंबई सेंट्रल, चेन्नई सेंट्रल आणि कानपूर सेंट्रल. चला तर मग जाणून घेवूया आणि जाणून घेऊयात स्टेशनच्या नावापुढे सेंट्रल का लिहिले जाते.
मुंबई : जेव्हा ट्रेनने (Railway) आपण प्रवास करतो तेव्हा वाटेत अनेक स्टेशन्स असतात, तुमच्या शहरातही अनेक स्टेशन्स असतील. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की त्या सर्वांची वेगवेगळी नावे असतात. स्टेशनच्या नावापुढे टर्मिनल (Terminal) तर कधी जंक्शन लिहिलेले असते तसेच, काही स्टेशन आहेत ज्यांच्या नावापुढे सेंट्रल आहे. जसे- मुंबई सेंट्रल, चेन्नई सेंट्रल आणि कानपूर सेंट्रल. चला तर मग जाणून घेवूया आणि जाणून घेऊयात स्टेशनच्या नावापुढे सेंट्रल का लिहिले जाते..
सेंट्रल स्टेशन म्हणजे ते त्या शहरातील सर्वात महत्वाचे आणि गजबजलेले स्टेशन असते. हे स्टेशन शहरातील सर्वात जुने आणि मोठ्या संख्येने गाड्यांच्या प्रवास असणारे स्टेशन असते. पण, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक शहराला सेंट्रल स्टेशन नाव असेल. परंतु, यापूर्वी सेंट्रल स्टेशन गजबजलेलेच्या म्हणजेच गर्दीच्या आधारावर ठरवले जायचे आणि ते शहरातील सर्वात गजबजलेले स्टेशन असायचे. एखाद्या शहरात तीन ते चार स्टेशन असतील तर त्या शहरातल्या सर्वात गजबजलेले स्टेशनच नाव सेंट्रल दिले जायचे.
नवी दिल्लीत कोणतेही सेंट्रल स्टेशन नाही
जर दिल्लीबद्दल विचार केला तर तिथे अनेक स्टेशन आहेत आणि नवी दिल्ली हे सर्वात गर्दीने गजबजलेले स्टेशन आहे तसेच दिल्लीत दुसरे कोणतेही सेंट्रल स्टेशन नाही पण, नवी दिल्ली स्टेशनच्या नावापुढे सेंट्रल नाव लावण्यात आले नाही त्यामुळे प्रत्येक शहरात सेंट्रल स्टेशन असणे ही आवश्यक नाही.
टर्मिनस किंवा टर्मिनलमध्ये काही फरक आहे का?
टर्मिनस किंवा टर्मिनलमध्ये ही काही फरक नाही. टर्मिनल म्हणजे ज्या स्थानकातून गाड्यांच्या पुढे जाण्याचा कोणताही ट्रॅक नाही, म्हणजे गाड्या तिथे आल्या तरी पुढच्या प्रवासासाठी, ज्या दिशेने त्या आल्या आहेत त्याच दिशेने त्यांना जावे लागते. हे असे स्थानक आहे जिथून ट्रेन आलेली आहे म्हणजे ट्रेन केवळ एकाच दिशेने प्रवेश करू शकते. हे आपण असे देखील म्हणु शकतो, की ज्या दिशेने ट्रेन टर्मिनल स्टेशनवर पोहोचते आणि दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेनला परत त्याच मार्गाने पुन्हा एकाच दिशेने मागे जावे लागते.
इतर बातम्या :