Jeans shopping | जीन्स खरेदी करताय, हे नीट लक्षात ठेवा, तेव्हाच मिळेल तुम्हाला कम्फर्टेबल जीन्स
जीन्स खरेदी करताना सर्वात महत्त्वाची बाब हीच असते की, ती आपल्याला कशी दिसते आणि दुसरी आणखी एक महत्त्वाची आपल्याला ती किती

मुंबई : जीन्स ही तरुणाईसाठी फक्त फॅशन नाही, तर अत्यावश्यक बाब झाल्यासारखीच आहे. जीन्सची खरेदी करताना सर्व काही नीट लक्षात ठेवून खरेदी करणे आवश्यक आहे. कारण जीन्सच्या किमती तशा काही कमी नाहीत, जर आपण ब्रँण्डेड कंपनीची जीन्स खरेदी करत आहात. जीन्स खरेदी करताना सर्वात महत्त्वाची बाब हीच असते की, ती आपल्याला कशी दिसते आणि दुसरी आणखी एक महत्त्वाची आपल्याला ती किती कम्फर्ट वाटते. तुम्हाला चालताना, बसताना जीन्सचा त्रास नक्कीच व्हायला नको, म्हणून चेजिंग रुममध्ये एकदा जीन्सवर खाली बसून बघितले तर ती आणखी किती कम्फर्ट होवू शकते हे दिसून येईल.खरं तर जीन्स खरेदी करताना त्यावर लिहिलेलं असतं, ते प्रकार आपण नीट लक्षात घ्यायला हवेत.
काही लोकांना अगदी स्कीनी टाईट जीन्स आवडतात, काहींना स्ट्रेट फीट, तर काहींना लोवेस्ट, काहींना मीड लोवेस्ट, तर काहींना खाली पायात फीट जीन्स आवडते.महिलांच्या जीन्समध्येही अनेक महत्त्वाचे प्रकार आहेत. काहींना बूट कट म्हणजे संपूर्ण बूट झाकणारी जीन्स आवडते. काहींना मांड्यांमध्ये फीट जीन्स, त्यातही लोवेस्ट, मीड वेस्ट अशा प्रकारच्या जीन्स आवडतात.
जीन्स खरेदी करताना जीन्सवर नेमकं काय लिहिलं आहे, ते पाहा, त्यानुसार जीन्स ट्राय करा,जीन्सचा रंग थोडा डार्क असलेलाच घ्या, अनेकवेळा बहुतांश जीन्सचा रंग नंतर फिकट होतो.

जीन्स खरेदी करताना तुम्हाला, बाय २, गेट २ फ्रीचं आमिष दाखवलं जातं, यातही हिशेब करुन प्रत्येक जीन्स तुम्हाला किती रुपयांना पडते हे नीट हिशेब करुन घ्या, कारण सर्वात जास्त किंमत असलेल्या २ जीन्सची किंमत खरेदी करताना लावली जाते. यामुळे ग्रुपमध्येच अशी खरेदी करा.
वरील फोटोंमध्ये तुम्हाला, महिला आणि पुरुषांच्या जीन्समध्ये सर्वात जास्त चालणारे ट्रेन्ड दिलेले आहेत. तुम्हाला जीन्स कम्फर्ट वाटत नसेल तर अजिबात घेऊ नका, दुसऱ्या दुकानात किंवा ऑनलाईन खरेदीचा पर्याय निवडा, ऑनलाईला अनेक वेळा आपण निवडतो, त्यापेक्षा दुसऱ्या साईझचे कपडे पाठवले जातात, त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला साईझमध्ये जीन्स येत नाही, तोपर्यंत जीन्स घेऊ नका. कारण जीन्स ही एक महागडी खरेदी नक्कीच आहे.
जीन्स ही तुमची आवडती गोष्ट असली तर ती जास्त वेळ घालून ठेवणे घातक आहे.घरी आल्यानंतर ती बदलणे अत्यावश्यक आहे, कारण स्कीनसाठी जीन्स पाहिजे तेवढी काही चांगली नाही, असं देखील म्हटलं जातं, म्हणून सुती, पातळ आणि हवेशीर कपडे घरी वापरणे कधीही योग्य ठरेल.
