एका काळी “सोने की चिड़िया” होता भारत देश, काय कारण होते असे म्हणण्या मागे, जाणून घेवूया यामागील सत्य!

अनेकदा तुम्ही ऐकले असेल की भारताला आधी "सोने की चिडिया"असे म्हटले जायचे परंतु आपणास माहिती आहे काय भारताला असे का म्हटले जायचे? भारतात असे काय होते जेणेकरून भारताला सोन्याचे भंडार मानले जायचे ?,चला तर मग जाणून घेऊया भारताची सुवर्णमय कहाणी ज्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे

एका काळी सोने की चिड़िया होता भारत देश, काय कारण होते असे म्हणण्या मागे, जाणून घेवूया यामागील सत्य!
gold
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 10:38 PM

तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की सोने (Gold) खूपच मूल्यवान असते आणि त्याचबरोबर सोन्याची किंमत सुद्धा महाग असते. सोने द्वारे बनवले गेलेले दागिने, अलंकार(Gold Jewellry) यांची किंमत दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे आणि म्हणूनच बाजारात सोन्याची किंमत खूपच महाग झालेली आहे. तुमच्या मनात अनेकदा असा प्रश्न निर्माण झाला असेल की हे सोने ज्या कुणाच्या हाती आधी लागले असेल त्या व्यक्तीला सोन्याची किंमत कळली असेल का? तसे पाहायला गेले तर सोन्याचा इतिहास भारतामध्ये खूपच इंटरेस्टिंग राहिलेला आहे म्हणूनच भारताला “सोने की चिडिया” (Gold In India)असे देखील म्हटले जात होते. आज आम्ही आपणास याबद्दलच महत्त्वाची माहिती सांगणार आहोत की पहिल्यांदा सोने कोठे सापडले आणि जगाला याबद्दल कसे कळाले. त्याचबरोबर आपणास एका महत्वपूर्ण माहितीबद्दल सांगणार आहोत ,ज्यामुळे भारताला सोने की चिडिया म्हंटले जायचे तसेच भारतामध्ये किती सोने आहे याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत.चला तर मग जाणून घेऊया या इंटरेस्टिंग माहितीबद्दल.

सर्वात आधी सोने कोठे मिळाले होते?

एपिक चॅनलच्या एका डॉक्युमेंटरी नुसार खरेतर 5500 वर्षांपूर्वी पहिल्यांदा आपल्याला सोने सापडले. हे सोने मिश्र स्वरूपामध्ये उपलब्ध झाले होते .जर जगातील मनुष्यद्वारे शोध लावले गेलेल्या धातु बद्दल बोलायचे झाल्यास सोने आणि कॉपर हे सर्वात जुने सोने आहे.जेव्हा सोने पहिल्यांदा सापडले होते तेव्हा या धातूला लोक सर्वसामान्य दगड समजत होते परंतु लोकांना हळूहळू समजले की हा सर्वसाधारण दगड नसून एक मौल्यवान दगड आहे. लोकांना नंतर कळले की, या दगडाला गंज लागत नाहीये आणि या दगडाला सहजरीत्या आपण वेगवेगळा आकार देऊ शकतो तसेच हा दगड खूपच चमकदार होता आणि त्याची चमक चमचम करणारी होती.

सोन्याची चमक कायमस्वरूपी राहण्याचे कारण म्हणजे सोने हे कधीच नष्ट होत नाही आणि त्याची समजूत सुद्धा निरंतर राहणारी आहे. सोने हे असे धातू आहे जे कधीच खराब होत नाही. असे म्हटले जाते की, 5000 वर्षापासून ते आतापर्यंत खाणीतून जितक्या वेळा सुद्धा सोने काढले गेले ते आजपर्यंत सर्कुलेशन मध्ये आहे. या कारणामुळेच सोन्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि अनेकदा सोने लक्झरीचे, ऐशो आरामाचे, श्रीमंतीचे प्रतीक सुद्धा मानले गेले आहे.

भारतात कधी आले सोने ?

भारतातील सोन्याच्या खाणी बद्दल जर बोलायचे झाल्यास आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 1800 वर्ष पूर्वी भारतामध्ये सोन्याच्या खाणी होत्या. कर्नाटक येथील रायचूर खाणीतून काढले गेलेल्या सोन्याची जेव्हा कार्बन रेटिंग केली गेली तेव्हा समोर आलेल्या माहिती नुसार हे सोने 200 एडी जुने आहे. आता सुद्धा कर्नाटक येथून सर्वात जास्त गोल्ड म्हणजे सोने खाणीतून काढले जाते.

भारताला सोने की चिडीया असे का म्हटले जाते ?

अनेक रिपोर्टनुसार भारतच नाही तर आफ्रिका मध्ये सुद्धा सर्वात जास्त सोन्याच्या खाणी आहेत परंतु असे असून सुद्धा भारताला सोने की चिडिया असा बहुमान मिळाला. असे म्हणण्यामागे एक कारण देखील आहे ते म्हणजे भारतामध्ये अधिक तर राज्यकर्ते सोने लुटण्याचा मनसुबा घेऊनच भारतात आले होते आणि त्यांनी खूप साऱ्या प्रमाणामध्ये सोने देखील लुटले.  1739 मध्ये पर्सियाच्या नादिर शाह ने दिल्लीवर आक्रमण करून सोने लुटले होते त्यांनी दिल्लीवरून इतके सोने लुटले होते की त्यानंतर तीन वर्षापर्यंत पर्सिया मध्ये कोणीच टॅक्स भरला नव्हता. मुघल काळामध्ये शहाजहानने एका सोन्याचे तख्त बनवले होते ज्यास “तख्त ए तौस”असे म्हटले जायचे. असे म्हटले जाते की, हे तख्त बनविण्यासाठी 1 लाख तोळे सोने वापरण्यात आले होते. आता तुमच्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण झाला असेल की पूर्वीच्या काळी सोन्याच्या खाणी जर कमी होत्या तर भारताकडे इतक्या प्रमाणात सोने आले कुठून तर या प्रश्नाचे उत्तर आहे की, त्या काळी भारताने सोने हे मसाले आणि सिल्क म्हणजे रेशीम सारख्या अनेक वस्तूंची विक्री करून कमावले होते याचाच अर्थ व्यापाराच्या माध्यमातून भारताने मोठ्या प्रमाणात सोने कमविले.

भारतामध्ये किती प्रमाणात सोने होते याचा अंदाज आपण एका गोष्टीवरून लावू शकतो. असे म्हटले जाते की, गुजरात मधील सोमनाथ मंदिर अनेकदा लुटण्यात आले होते त्याच बरोबर 2011 मध्ये जेव्हा पद्मनाभ मंदिरातून खजिना काढण्यात आला होता, तेव्हा त्या खजिन्यातील सोने हे केरळच्या बजेटपेक्षा दुपटीने जास्त होते तसेच आज ही अनेक मंदिरांमध्ये सुद्धा सोन्याचे मोठमोठे खजिने आहे, असे म्हटले जाते.

हिजाब आणि बुरखा यांच्यात काय फरक आहे? मराठी मुली पण हिजाब घालतात? खरंच?

LIC ची बंद पडलेली पॉलिसी करा पुन्हा सुरु; महामंडळ घेऊन आलंय नवीन योजना

अक्कल दाढ आल्यावर खरंच अक्कल येते? अक्कल दाढेच्या इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्या!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.