रेकॉर्डब्रेक वर्ष जगण्याचं सीक्रेट जपानी लोकांकडे आहे! त्यातील 5 मोठ्या गोष्टी कोणत्या?
जगातील सर्वात वृद्ध महिला असण्याचा रेकॉर्ड जपानच्या केन तनाका यांच्या नावावर आहे. केन यांनी नुकताच आपला 119 वा वाढदिवस साजरा केला. जापानमधील लोक इतके दीर्घायुषी कसे जगतात हाच एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जाणून घेवूया त्यामागील काही गुपिते!!
जपानच्या केन यांनी नुकताच आपला 119 वा वाढदिवस साजरा केला. जगातील सर्वात वृद्ध महिला असण्याचा रेकॉर्ड जपानच्या केन तनाका यांच्या नावावर आहे. केन यांनी नुकताच आपला 119 वा वाढदिवस साजरा केला. केन यांना चॉकलेट्स आणि फिझी ड्रिंक्स सेवन करायला फार आवडते. वयाच्या या टप्प्यावर केन या भले बोलू शकत नाही, पण हावभावांनी आपले म्हणणे मात्र त्या व्यवस्थित मांडतात.
जपानमधील एखाद्या व्यक्तीला सर्वात वयोवृद्ध असण्याचा किताब मिळण्याची ही काही पहिलीच घटना नाही. या आधी ही या यादीत जापानी लोकांची अनेक नावे जगासमोर आली आहेत. अशावेळी अनेकांच्या मनांत एक प्रश्न नक्की निर्माण होतो की, जापानचे लोक इतके दीर्घायुषी कसे काय जगतात? हे लोक नेमके काय खातात? , नेमकी कोणती लाईफ स्टाईल स्वीकारतात ज्यामुळे त्यांच्या नावे अनेक रेकॉर्ड बनतात. चला तर मग जाणून घेऊया…जपानी लोकांचे हे आहेत 5 गुपिते जे त्यांना दीर्घायुषी बनवतात..
1. एका ठिकाणी फार वेळ बसत नाहीत, कारण…
जपानी लोकांना बराच वेळ एकाच ठिकाणी बसायला आवडत नाही. ते आपले शरीर नेहमी एक्टिव ठेवतात त्यामुळे एकतर ते बहुतेक वेळा उभे राहून काम करतात किंवा चालत – फिरत असताना काम करतात. जापानी रिपोर्ट नुसार, या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, येथील लोक जवळच्या ठिकाणी येण्या – जाण्यासाठी वाहनांचा जास्त प्रमाणात वापर करत नाहीत. ते त्या ठिकाणी चालतच जातात. जर एखाद्या ठिकाणी थांबावे लागण्याची शक्यता जर निर्माण झाली तर अश्या वेळी हे लोक उभे राहणे पसंत करतात.
2. दिवसातून अनेकदा पितात माचा चहा
जपानचे लोक दिवसातून अनेकदा माचा चहा पितात. ही चहा सर्व सामान्य चहासारखी अजिबात नसते. या चहा मध्ये अनेक प्रकारचे एंटीऑक्सीरडेंट्स उपलब्ध असतात ज्यामुळे आपल्याला अनेक रोगांशी लढण्याची क्षमता लाभते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते तसेच आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या सुद्धा कमी करते, जेणेकरून तुमची त्वचा नेहमी सतेज राहते. ही चहा विशिष्ट पानांना सुकवून त्याद्वारे पावडर बनवून ही चहा बनवली जाते.
3. कमी तेल आणि मंद आचेवर शिजवले गेलेले अन्न खातात
या लोकांचे खानपान देखील इतर देशांतील लोकांपेक्षा थोडे वेगळे आहे. जसे की यांच्या अन्न पदार्थातील बहुतेक गोष्टी ह्या उकळलेल्या किंवा वाफेत शिजवलेल्या असतात. जापानी लोक मंद आचेवर अन्न शिजवत असतात, कारण की त्याच्यामते जर आपण अन्नपदार्थ मंद आचेवर शिजवल्यास त्यांची चव सुद्धा टिकून राहते व या पदार्थांमधील सर्व पोषक तत्व सुद्धा आपल्या शरीराला प्राप्त होतात. त्यांच्या आहारात बहुतेक जास्त भाज्या असतात, त्यादेखील कमी तेल आणि मसाल्यांमध्ये बनवलेल्या असतात.
4. छोटे छोटे घास खातात कारण..
यांचा आहार जितका खास असतो तितकेच त्यांचे जेवण वाढणे आणि खाण्याची पद्धत ही महत्त्वाची आहे. हे लोक जेवण करताना लहान प्लेट्स आणि चॉपस्टिक्सचा वापर जास्त करतात.जापानी लोकांचे असे म्हणणे आहे की, असे जर आपण केले तर भूक मरून जाते व मनुष्य जास्त जेवण करत नाही, असे केल्याने आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वाढण्याचा धोका सुद्धा निर्माण होत नाही.जर तुम्ही कधीही जापानी खाद्यपदार्थांचे फोटो पाहिल्यास, आपल्याला जाणवेल की त्यांच्या ताटामध्ये कमी प्रमाणात जेवण वाढलेले असते.
5. लोकांसोबत वेळ घालवतात
जपानमधील लोक साधारणतः घरी खूपच कमी वेळ व्यतीत करतात. हे लोक समाजामध्ये खूपच ऍक्टिव्ह राहतात. सुट्टीच्या दिवशी घरी बसून राहण्याऐवजी हे लोक मित्र आणि नातेवाईकांसोबत वेळ व्यतीत करणे या लोकांना आवडत असते. हे लोक मित्र आणि नातेवाईक मंडळी यांच्यासोबत वेळ व्यतीत करण्यासाठी अनेकवेळा बाहेरची स्थळे निवडत असतात. अशाप्रकारे हे लोक नेहमी आनंदी राहतात यामुळे त्यांच्या आजूबाजूला सुद्धा नकारात्मक ऊर्जा कधीच फिरकत देखील नाही.
इतर बातम्या –
चीनने खरोखरच नकली सूर्य बनवला आहे ? त्याचे तापमान किती आणि हे त्यांच्यासाठी का आहे खास?