केळ्यासारखा दिसणारा साप, नाव बनाना बॉल पायथन! विषासाठी नाही तर मग कशासाठी ओळखला जातो?

केळी सारखा दिसणारा बनाना बॉल पायथन खुप विचित्र आहे, जो दिसायला तर केळी सारखाच आहे आणि विषारीपणामुळे नाही तर पाळीव साप असल्यामुळे हा खूप फेमस आहे. चला तर मग जाणून घेवुयात या विचित्र सापाबद्दल काही खास गोष्टी..

केळ्यासारखा दिसणारा साप, नाव बनाना बॉल पायथन! विषासाठी नाही तर मग कशासाठी ओळखला जातो?
केळ्यासारखा दिसणारा साप
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 6:24 PM

जगभरात वेगवेगळ्या जातीचे साप अनेकदा आपल्याला पाहायला मिळतात. विविध जातीचे/भिन्न प्रकारचे साप आणि त्यांच्या प्रजातींवर रिसर्च सुद्धा करण्यात आले आहे, ज्यामध्ये एक बनाना बॉल पायथन देखील आहे. हा साप दिसायला केळी सारखा असल्यामुळे या सापाचे नाव देखील केळीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. तुम्ही स्वतः या सापाचा फोटो पाहिल्यावर समजून जाल की खरोखरच हा केळीशी खूप मिळता – जुळता आहे. याचा रंग सुद्धा पिवळा असतो. हि सापाची एक प्रजाती आहे, जी आपल्या विषारीपणामुळे नव्हे तर त्याच्या रंगामुळे आणि स्वभावामुळे खूप फेमस आहे.

या सापाचे नाव बनाना बॉल पायथन आहे. अशातच आपण जावून घेवूया की खरंतर हा किती विषारी आहे आणि लोकांमध्ये याच्या मोठ्या प्रमाणात फेमस होण्यामगे नेमके काय कारण आहे सोबतच जाणून घेवूया सापाशी संबंधित असलेले काही तथ्य, ज्यामुळे आपल्याला समजेल की हा साप किती विचित्र आहे..

हा साप, बॉल पायथन प्रकारच्या प्रजातींपैकी आहे, तसं पाहिलं तर या प्रजातीच्या अधिक तर सापांचा रंग हा काळा आणि तपकिरी रंगाचे असतात. मात्र हा खूपच वेगळा आहे, हा बनाना बॉल पायथन खूपच वेगळा असून दिसण्याच्या बाबतीत तो सफेद आणि पिवळ्या रंगाचा असतो. त्यामुळे या सापांना बनाना स्नॅक सुद्धा म्हटले जाते. हे सुध्दा खूप प्रकारचे असतात, ज्यात बनाना स्पाइडर, बनाना क्लाउन, बनाना पेस्टल, बनाना सिनेमन, बनाना मोरवे, बनाना ब्लैक पिस्टल यांचा समावेश आहे. या सर्व खूप लोकप्रिय प्रजाती आहेत.

कुठे आढळून येतो हा साप ?

या सापांना रॉयल पायथन मानले जाते, जे वेस्ट आणि सेंट्रल आफ्रिकेच्या जंगलात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. जर यांच्या एकंदरीत आयुर्मानाबद्दल बोलायचे झाले तर साधारणतः २०- ३० वर्ष असते. यांनी लांबी साधारणपणे ३ ते ५ फूट इतकी असते. या सापांच्या प्रजातीत मेल आणि फिमेल सापानुसार त्यांची लांबी वेगवेगळी असते. ज्यामध्ये मेल साप लांबीने खूपच कमी असतात, ज्यांची लांबी ३ फुटांपर्यंत असते.

हे साप किती विषारी असतात ?

दिसायला या प्रजातींचे साप खूप विषारी असतात, मात्र असे अजिबात नाही. यांचा समावेश बिनविषारी सापांमध्ये होतो आणि हे खूप नम्र स्वरूपाचे देखील असतात. हे साप खूपच कमी अँक्टीव असतात आणि आपल्या शांत स्वभावासाठी देखील हे ओळखले जातात. यांच्या शांत स्वभावामुळेच अधिकतर लोक यांना पाळतात. यांच्याबाबत असे सुध्दा म्हटले जाते की एखाद्या मुलाला किंवा वयस्कर व्यक्तीला मारण्यात सुद्धा हे असमर्थ ठरतात. म्हणजेच याचा अर्थ असा की हे जास्त धोकादायक नसतात.

अनेक रिपोर्ट्स मध्ये असे सुद्धा सांगण्यात आले आहे की, हा साप कोणाला चावल्यानंतर घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही. तसेच घाबरून न जाता याच्यावर उपचार केला पाहिजे. तसेच हे साप खूप हळू हळू हालचाल करत असतात, हे साप खूप आळशी प्रवृत्तीचे असतात असे ही म्हटले जाते.

इतर बातम्या –

Know This | Health | ज्येष्ठंना तरुणांपेक्षा जास्त थंडी वाजते! असं का होतं?

आजच्या दिवशी इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांना देण्यात आली होती फाशी, दोन अंगरक्षकांनी का चालवल्या 25 गोळ्या?

Blood Test | रक्त चाचणीतूनही होणार कॅन्सरचे निदान, शरीरात कर्करोग किती पसरलाय, हेही समजणार

लघवीतून पुरुषांमध्ये भयंकर इन्फेक्शन! हे तुम्हाला माहीत असेल, पण असं का होतं हे माहितीये?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.