Cyclone Asani in Bay of Bengal Live : कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळासह पावसाची शक्यता
दोन दिवसानंतर बंगालच्या (BANGAL) उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे असानी चक्रीवादळ (Asani Cyclone) निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
रत्नागिरी – मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्रात (MAHARASHTRA) उष्णतेची लाट (HEAT WAVE) कायम आहे. त्यामुळे लोकांना प्रचंड उकाडा जाणवत आहे. अजून काही दिवस उकाडा जाणवेल असा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे सकाळी दहानंतर प्रचंड ऊन असतं. दोन दिवसानंतर बंगालच्या (BANGAL) उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे असानी चक्रीवादळ (Asani Cyclone) निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. समजा असानी चक्रीवादळ निर्माण झाल्यास मच्छिमारांना इतर राज्यांच्या जवळपासच्या भागात निवारा आणि सुरक्षित ठिकाणांची आवश्यकता भासू शकते. या करीता वादळी हवामानामुळे जहाजांना सुरक्षित ठिकाण व इतर किनारपट्टीवरील राज्यातील मच्छिमारांना निवारा देण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांनी जाहीर केली आहे.
LPA over central parts of south Bay of Bengal become WML on 19th along & off A&N Islands, intensify into a depression by morning of 20th March and into a cyclonic storm on 21st March. To move nearly north-northeastwards and reach near Bangladesh-north Myanmar coasts on 22nd March pic.twitter.com/Iq4CVcwn44
— India Meteorological Department (@Indiametdept) March 17, 2022
कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट
दोन दिवसात बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे असानी चक्रीवादळ निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकल्यानंतर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हवेचा वेग देखील वाढणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात असणाऱ्या लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. या वादळाचा फटका अनेक राज्यांना बसण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. वादळी हवामानामुळे जहाजांना सुरक्षित ठिकाण व इतर किनारपट्टीवरील राज्यातील मच्छिमारांना निवारा देण्यासाठी आवश्यक सूचना सर्व मच्छीमारांना पोहचवण्यात आल्या आहेत.
21 मार्चपर्यंत हळूहळू चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता
बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र 21 मार्चपर्यंत हळूहळू चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते उत्तर-ईशान्य दिशेने सरकून बांगलादेश-म्यानमार किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर 18-21 मार्च दरम्यान अत्यंत मुसळधार पाऊस पडेल. परंतु ही प्रणाली बांगलादेशच्या जवळ आल्याने त्याचा प्रभाव पूर्व आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्येही जाणवेल.
बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात न जाण्याचा इशारा
मच्छिमारांना बुधवारी दक्षिण बंगालचा उपसागर आणि लगतच्या हिंदी महासागरात जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. गुरुवार आणि शुक्रवारसाठी जारी करण्यात आलेल्या आवाहनामध्ये आग्नेय बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. शनिवार ते मंगळवार या काळात मच्छिमारांना अंदमान समुद्र आणि लगतच्या अंदमान निकोबार बेटांमध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुसळधार पावसाच्या भीतीने हवामान आणखी बिघडण्याची शक्यता
रविवारी अंदमान निकोबारमध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. सोमवारी 70-80 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. ते ताशी 90 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांमध्ये बदलू शकते. जोरदार वारा आणि मुसळधार पावसाच्या भीतीने हवामान आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.