AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सायकलवरुन पंढरपूरवारी, 24 जणांचं गावात जंगी स्वागत, तब्बल 180 जणांना कोरोना

सायकलवरुन पंढरपूरला दर्शनासाठी जाऊन आलेल्या नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावातील 24 जणांना कोरोनाची लागण झाली होती.

सायकलवरुन पंढरपूरवारी, 24 जणांचं गावात जंगी स्वागत, तब्बल 180 जणांना कोरोना
| Updated on: Dec 25, 2020 | 5:24 PM
Share

नाशिक : सायकलवरुन पंढरपूरला दर्शनासाठी जाऊन आलेल्या नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावातील 24 जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र हे सर्वजण गावात आल्यानंतर अनेकांच्या संपर्कात आले. अनेक ठिकाणी या 24 जणांचे जंगी स्वागत करण्यात आले, तर काही ठिकाणी सत्कार समारंभही पार पडले. मात्र यातील काहींमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आल्यामुळे त्यांची कोव्हिड चाचणी करण्यात आली. या चाचणीत सर्वजण कोरोनाबाधित आढळले. (24 people travel to Pandharpur by bicycle, 180 people affected by covid-19)

धक्कादायक म्हणजे या 24 जणांच्या संपर्कात आलेल्या तब्बल 180 ते 190 गावकऱ्यांचे कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेने जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे, तर खबरदारी म्हणून संपूर्ण गाव पुढील दोन ते तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जगभरातील अनेक देशांमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणातून सूटत आहे. देशातील परिस्थिती सध्या जरी प्रशासनाच्या निंयत्रणात आहे, असे वाटत असले तरी नाशिकसारख्या घटनांमुळे परिस्थिती बिघडत आहे. 24 जणांमुळे आता संपूर्ण गाव बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

जगभरात आतापर्यंत 7 कोटी 98 लाख कोरोनाबाधितांची नोंद

वर्ल्डोमीटर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जगभरात 7 कोटी 98 लाख 31 हजार 138 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 5 कोटी 62 लाख 17 हजार 104 रुग्ण बरे झाले आहेत, तर 17 लाख 51 हजार 341 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सध्या 2 कोटी 18 लाख 62 हजार 581 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

भारतात 2 लाख 82 हजार सक्रिय कोरोनाबाधित

आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरीकेत 1 कोटी 91 लाख 11 हजार 535 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 1 कोटी 12 लाख 19 हजार 882 रुग्ण बरे झाले आहेत, तर 3 लाख 37 हजार 66 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या नंबरवर आहे. भारतात आतापर्यंत 1 कोटी 1 लाख 47 हजार 468 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 97 लाख 17 हजार 834 रुग्ण बरे झाले आहेत, तर 1 लाख 47 हजार 128 बाधितांचा मृत्यू झाला आहे. भारतात सध्या 2 लाख 82 हजार 506 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. भारतातील कोरोनाबाधितांबाबतची ही आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 19 लाख बाधितांची नोंद

देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य सर्वात वर आहे. राज्यात आतापर्यंत 19 लाख 9 हजार 951 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 18 लाख 4 हजार 871 रुग्ण बरे झाले आहेत, तर 49 हजार 58 बाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या

कोरोनाचा नवा अवतार आशियात धडकला, पहिला रुग्ण सापडला

New Strain of Coronavirus : ब्रिटनच नाही तर ‘या’ देशांतही आढळली कोरोनाची नवी प्रजाती, भारताची स्थिती काय?

कोरोनाचा जीवघेणा अवतार आणि त्याची संपूर्ण माहिती, स्पेशल रिपोर्ट

(24 people travel to Pandharpur by bicycle, 180 people affected by covid-19)

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.