पोस्ट ऑफीसच्या या 5 सेव्हींग स्कीम महिलांसाठी बेस्ट, 8.2 टक्क्यांपर्यंत मिळतंय व्याज

पोस्ट ऑफीसच्या बचत योजनांत गुंतवणूक करुन महिला बॅंकांच्या तुलनेत जादा परतावा मिळवू शकतात. पोस्टाच्या बचत योजनात कोणताही धोका नसून ठराविक काळात बचत होऊन आपला पैसा वाढू शकतो.

पोस्ट ऑफीसच्या या 5 सेव्हींग स्कीम महिलांसाठी बेस्ट, 8.2 टक्क्यांपर्यंत मिळतंय व्याज
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 8:26 PM

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये महिला गुंतवणूकदारांना गुंतवणूकीसाठी चांगले पर्याय मिळत आहेत. पोस्ट बचत योजनेत गुंतवणूक केल्याने महिला गुंतवणूकदारांना केवळ सामाजिक सुरक्षा मिळते असे नाही तर चांगला परतावा देखील मिळतो. पोस्टाच्या अनेक योजनात बॅंकाच्या तुलनेत महिलांना चांगले व्याज मिळत आहे. आज आपण पोस्ट ऑफीसच्या त्या 5 सेव्हींग स्कीमची माहिती घेणार आहोत, ज्या महिलांसाठी बेस्ट आहेत.

सुकन्या समृद्धी बचत योजना

सुकन्या समृद्धी सेव्हींग स्कीम खास करुन कन्येचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तयार केलेली आहे. या योजनेत मुलीचे वय दहा वर्षे होण्याआधी गुंतवणूक करावी लागते. या योजनेत गुंतवणक केल्यानंतर वार्षिक 8.2 टक्के व्याजदर मिळतो. खाते उघडल्यानंतर या योजनेला पंधरा वर्षांपर्यंत चालवता येते. सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरात दर तीन महिन्याला बदल केला जातो. या योजनेत जमा केलेल्या पैशाला कलम 80 सी अंतगर्त टॅक्सची सूट देखील मिलते.

पोस्ट ऑफीस मासिक इन्कम स्कीम

महिलांसाठी पोस्ट कार्यालयाची मंथली इन्कम स्कीम ही दुसरी चांगली योजना आहे. या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. या गुंतवणूकीवर या योजनेत 7.4 टक्के व्याज दर मिळत असतो. ही योजना नियमित उत्पन्न मिळविण्याचा चांगला स्रोत बनविण्यासाठी सहाय्यभूत ठरू शकते.

हे सुद्धा वाचा

महिला सन्मान बचत पत्र

महिला सन्मान बचत पत्र ही महिला गुंतवणूकदारांसाठी ही योजना कोणतीही जोखीम नसलेली योजना आहे. यात प्रत्येक वयाची महिला गुंतवणूक करु शकते. या योजनेत एका खात्यात एका वेळी कमाल 2 लाख रुपयांची रक्कम जमा करु शकता. यात वार्षिक 7.5 टक्के व्याज मिळते. एका वर्षांनंतर आपण जमलेल्या रकमेपैकी 40 टक्के काढू शकतो.

राष्टीय बचत पत्र

राष्ट्रीय बचत पत्र ही पोस्ट ऑफीसची आणखी एक कमी जोखीम असलेली बचत योजना आहे. या योजना सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी फायद्याची आहे.या किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. याचा अवधी पाच वर्षांचा असतो. असे असले तरी 1 ऑक्टोबर पासून नवीन एनएससीमध्ये जमा रकमेवर कोणतेही व्याज मिळणार नाही.परंतू 30 सप्टेंबर 2024 पर्यंत जमा रकमेवर 7.5 टक्के व्याज मिळत आहे.

पोस्ट ऑफीसची पीपीएफ योजना

पोस्ट ऑफीसची पब्लिक प्रोव्हीडंट फंड ( PPF ) ही योजना एक चांगली लॉंग टर्म गुंतवणूक योजना आहे. यात किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. यावर 7.1 टक्के व्याज दर मिळते. ही योजना दीर्घकालिन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी फायदेशीर असून एक सुरक्षित आणि लाभदायक पर्याय आहे.या सर्व पोस्ट ऑफीस योजनेत गुंतवणूक करुन महिला आपले भविष्य सुरक्षित करु शकतात. आणि आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होऊ शकतात.

...म्हणून मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा, त्या क्लिपवरून दमानिया संताप
...म्हणून मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा, त्या क्लिपवरून दमानिया संताप.
सिद्धिविनायकाला जाताय? आता असा ड्रेस कोड असेल तरच मिळणार बाप्पाच दर्शन
सिद्धिविनायकाला जाताय? आता असा ड्रेस कोड असेल तरच मिळणार बाप्पाच दर्शन.
मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर मुंडे स्पष्टच म्हणाले, '...ही माझी इच्छा'
मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर मुंडे स्पष्टच म्हणाले, '...ही माझी इच्छा'.
लोकसभेपूर्वी भाजप-शिंदेंकडून ऑफर, ठाकरेंच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
लोकसभेपूर्वी भाजप-शिंदेंकडून ऑफर, ठाकरेंच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट.
'मी बीड जिल्ह्याचा बाप, चिंता काय...'; कराडचा आणखी एक ऑडिओ व्हायरल
'मी बीड जिल्ह्याचा बाप, चिंता काय...'; कराडचा आणखी एक ऑडिओ व्हायरल.
'लाडक्या बहिणींमुळे कोटींचा खड्डा, आता तुम्ही ठरवा मोदींच्या की...'
'लाडक्या बहिणींमुळे कोटींचा खड्डा, आता तुम्ही ठरवा मोदींच्या की...'.
'अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर...', दमानियांचं चॅलेंज
'अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर...', दमानियांचं चॅलेंज.
एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन
एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन.
ऑनलाईन गेमच्या नादात स्वतःचा चिरला गळा, गुगलवर एकच शब्द सतत सर्च
ऑनलाईन गेमच्या नादात स्वतःचा चिरला गळा, गुगलवर एकच शब्द सतत सर्च.
आठवीच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, स्वतःच्याच डोक्यात झाडली गोळी अन्
आठवीच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, स्वतःच्याच डोक्यात झाडली गोळी अन्.