चालकाचा डोळा लागल्याने बोलेरोची ट्रकला धडक, 6 चिमुकल्यांसह 14 जणांचा जागीच मृत्यू
कार चालकाला झोप आल्याने गाडीवर नियंत्रण सुटलं आणि अपघात झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
लखनऊ : एका भीषण रस्ते अपघातामध्ये तब्बल 14 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील प्रतापगडच्या माणिकपूर पोलीस ठाण्यातील देशराज इनारा इथं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. रात्री उशिरा परतत असताना बोलेरो कारची रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला धडक बसली. यामध्ये तब्बल 14 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. (a 14 persons including 6 children died in car collided with truck at Uttar Pradesh)
मिळालेल्या माहितीनुसार, कार चालकाला झोप आल्याने गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. कारमधील सगळे लग्न समारंभातून घरी परतत होते. यावेळी अपघात झाल्याने तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 6 बालकांचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
Pratapgarh: Fourteen persons including six children died after the vehicle they were travelling in collided with a truck on Prayagraj-Lucknow highway under limits of Manikpur police station last night. pic.twitter.com/2WOFMUyO8Z
— ANI UP (@ANINewsUP) November 20, 2020
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी 2 तास लागले. अपघातातील मृतांमध्ये 12 जण हे कुंडा कोतवालीच्या जिगरापूर चौसा गावातील आहेत. तर बोलेरो कार चालकासह दोन जण हे कुंडा परिसरातील राहणारे आहे. बाकी इतर गावातीलही प्रवासी गाडीमध्ये होते.
पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेहांना ताब्यात घेतलं असून शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. यावर पोलीस अधिक तपास करत असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
इतर बातम्या –
Bus Accident | कराड तालुक्यात मिनी बस नदीत कोसळली, अपघातात 5 जण ठार
ऐन दिवाळीत पिता-पुत्राचा अपघाती मृत्यू, ट्रकच्या चाकाखाली आल्यानं जागीच गमावले प्राण
(a 14 persons including 6 children died in car collided with truck at Uttar Pradesh)