घराणेशाहीला ‘चेकमेट’ करण्यासाठी ‘क्वीन’ मैदानात, सुशांत आत्महत्या प्रकरणी जबाब देण्यासाठी कंगनाचे पोलिसांना पत्र

"आपल्याला अर्जंट जबाब हवा असल्यास अधिकारी मनालीला पाठवा. किंवा ईमेलच्या माध्यमातून जबाब घ्या" असे कंगनाने आपल्या वकिलामार्फत पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

घराणेशाहीला 'चेकमेट' करण्यासाठी 'क्वीन' मैदानात, सुशांत आत्महत्या प्रकरणी जबाब देण्यासाठी कंगनाचे पोलिसांना पत्र
Follow us
| Updated on: Jul 24, 2020 | 6:01 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत हिने जबाब देण्यासाठी आपणहून पुढाकार घेतला. पोलिसांचा समन्स पोहचण्याआधीच कंगनाने जबाब देण्याची तयारी दाखवली आहे. (Actress Kangana Ranaut reaches Mumbai Police to give statement in Sushantsingh Rajput Suicide Case)

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येबाबत कंगना सुरुवातीपासूनच आवाज उठवत आहे. सध्या मनालीमध्ये असलेल्या कंगनाने पोलिसांशी सुशांत प्रकरणात जबाब देण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. पोलिसांनी 22 जुलै रोजी समन्स पाठवून कंगनाला जबाब देण्यासाठी बोलावलं होतं.

चित्रपट क्षेत्रातील घराणेशाहीने सुशांतचा बळी घेतला, असा धडधडीत आरोप कंगनाने केला आहे. बॉलिवूडमधील बड्या व्यक्ती सुशांतसोबत कशा आणि किती वाईट वागले आहेत, याबाबत आपल्याला संपूर्ण माहिती असल्याचा दावा तिने केला आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“आपण सध्या मनालीमध्ये आहोत. लॉकडाऊनमुळे अडकलो आहोत. मुंबईला येण्याचे कोणतेच साधन नाही. मुंबईत कधी येईन, सांगता येत नाही. मी 23 जुलै ते 31 जुलै या कालावधीत तुम्हाला जबाब देण्यासाठी उपलब्ध होऊ शकेन. आपल्याला माझा अर्जंट जबाब हवा असल्यास आपला अधिकारी मनाली येथे पाठवा. किंवा माझा जबाब ईमेलच्या माध्यमातून घेऊ शकता. आपले काही प्रश्न असल्यास ते मला पाठवा. त्याची मी तुम्हाला उत्तर देते.” असे कंगनाने आपल्या वकिलामार्फत पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचा : लॉकडाऊनमुळे कंगना मनालीला अडकली, मुंबई पोलिसांनी पोस्टाने समन्स पाठवला

हा पत्रव्यवहार 22 जुलै म्हणजेच परवा झाला. मात्र यानंतर कंगना जबाब देण्यासाठी उपलब्ध नाही, असं पोलिसांतर्फे सांगण्यात येत होतं. एवढंच नाही, तर काल सकाळी वांद्रे पोलीस स्टेशनचे अधिकारी पुन्हा कंगनाच्या कार्यालयात जाऊन आले. पुन्हा समन्स देण्याचा प्रयत्न केला. कंगना तिथे नसल्याने त्यांनी तिचा मनाली येथील पत्ता मिळवला आणि त्या पत्त्यावर पोस्टाने समन्स पाठवलं. कंगना जबाब देण्यासाठी येत नाही, टाळाटाळ करत आहे, यामुळे तिला तिच्या गावी मनाली येथे पोस्टाने समन्स पाठवलं, असं चित्र निर्माण करण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता, असं म्हटलं जात होतं.

आता पोलिसांनी पोस्टाने समन्स पाठवण्याआधीच कंगनाने जबाब देण्याची तयारी दाखवली आहे. या प्रकारावरुन पोलीस कंगनाच्या जबाबावरुन माहिती लपवत असल्याचं दिसून येत आहे.

संबंधित बातमी :

“कंगनाचे अख्खे करिअर कंपूशाहीवर आधारित” नगमाच्या आरोपांनंतर सोशल मीडियावर जुगलबंदी

(Actress Kangana Ranaut reaches Mumbai Police to give statement in Sushantsingh Rajput Suicide Case)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.