Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mayuri Deshmukh | मयुरी देशमुखचं पुनरागमन, गश्मीर महाजनीसोबत नवीन मालिकेचा प्रोमो रिलीज

मयुरी देशमुखने इन्स्टाग्राम अकाऊण्टवरुन इमली या आपल्या नवीन हिंदी मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.

Mayuri Deshmukh | मयुरी देशमुखचं पुनरागमन, गश्मीर महाजनीसोबत नवीन मालिकेचा प्रोमो रिलीज
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 1:21 PM

मुंबई : ‘खुलता कळी खुलेना’ (Khulta Kali Khulena) मालिकेतून मराठीचा छोटा पडदा गाजवलेली अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) हिंदीत पदार्पण करत आहे. स्टार प्लस (Star Plus) वाहिनीवर ‘इमली’ (Imli) या मालिकेत अभिनेता गश्मीर महाजनीसह (Gashmir Mahajani) मयुरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पती आणि अभिनेता आशुतोष भाकरे (Ashutosh Bhakre) याच्या आत्महत्येनंतर चार महिन्यांनी मयुरीने नवा प्रोजेक्ट हाती घेतल्याने चाहतेही सुखावले आहेत. (Actress Mayuri Deshmukh to make come back in Serial Imlie)

‘कुल्फी कुमार बाजेवाला’ आणि ‘ये जादू है जिन का’ सारख्या ब्लॉकबस्टर मालिकांनंतर गुल खान ‘फोर लायन्स’ प्रॉडक्शन अंतर्गत स्टार प्लसवर नवीन रोमँटिक मालिका घेऊन येत आहे. या मालिकेत प्रेमाचा त्रिकोण दाखवणारी कथा सादर केली जाणार आहे. एक नायक आणि दोन नायिकांच्या भोवती मालिकेची कथा फिरणार आहे.

मयुरीसह या मालिकेत अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री सुम्बुल तौकीर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सुम्बुल तौकीर याआधी ‘इशारो इशारो में’ आणि ‘चंद्रगुप्त मौर्य’ या मालिकेत झळकली होती. अभिनेता गश्मीर महाजनीने मराठी-हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

मयुरीने इन्स्टाग्राम अकाऊण्टवरुन इमली मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. गावातील तरुणीचा विवाह शहरी तरुणाशी जबरदस्ती लावला जातो. त्यानंतर तो शहरात परतल्यानंतर त्याच्या मैत्रिणीशी त्यांची गाठ पडते, असे कथानक प्रोमोतून दिसते. मयुरी या मालिकेत गश्मीरच्या मैत्रिणीच्या भूमिकेत आहे.

View this post on Instagram

DEAR ALL, EVERY HEALING THOUGHT YOU SENT ACROSS MATTERED….. EVERY LOVING VIBE YOU SENT MADE A DIFFERENCE… EVERY BEAUTIFUL PRAYER YOU SAID FOR ME AND OUR FAMILY HAS LEFT ME UTTERLY GRATEFUL… GATHERING ENERGY FROM YOUR LOVE, STEPPING INTO SOMETHING NEW.. NEED YOUR WISHES YET AGAIN!!! ❤️? #Repost @imliestarp(Actress Mayuri Deshmukh to make come back in Serial Imlie)lus • • • • • • Mumbai, Maharashtra A small town girl with simple dreams. Come be a part of Imlie’s journey as she straddles the road from her beloved gaon to an alien metropolis. With her grit & determination she takes on the big city. #GaonKeHainGanwarNahi @starplus #imlie #imliestarplus #comingsoon #starplus #imli – @abbas_ratansi93 @atifcam @gulenaghmakhan @sumbul_touqeer @kirankhoje3 @mayurideshmukhofficialll @ritucj @muskan_bajaj02081987 @karishmajain92 @mahajani.gashmeer @ajay.ak07 @meenanathani @nidhin.dp

A post shared by Mayuri 🙂 (@mayurideshmukhofficialll) on

दुःख सावरत मयुरीचे पुरागमन

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने 3 महिन्यांपूर्वी नांदेडमध्ये आत्महत्या केली होती. उदयोन्मुख अभिनेता आशुतोष भाकरे याने वयाच्या 32 व्या वर्षी नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवले होते. नैराश्यामुळे आशुतोषने आत्महत्या केली, असे म्हटले गेले होते. या घटनेने मयुरी देशमुखसह तिच्याच्या चाहत्यांनादेखील मोठा धक्का बसला होता. त्यानंतर, आता पतीच्या मृत्यूचे दुःख सावरत मयुरी पुन्हा एकदा नव्याने सज्ज झाल्याने, तिच्या चाहत्यांनीही तिचे कौतुक केले आहे.

कुटुंबीय घरात असतानाच गळफास

नांदेडमधील गणेश नगर इथल्या घरी मयुरी आणि आशुतोषची आई घरात गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी आशुतोष वरच्या खोलीत होता. बराच वेळ झाला आशुतोष खाली आला नाही. त्यावेळी त्याचा दरवाजा ठोठावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने, दुसऱ्या बाजूने खोलीत डोकावून पाहिले. त्यावेळी आशुतोष लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि एकच थरकाप उडाला.

संबंधित बातम्या : 

Aashutosh Bhakre suicide | नैराश्यावर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला, उपचारांना प्रतिसाद, तरीही आशुतोषचं टोकाचं पाऊल

Mayuri Deshmukh | “आशुडा, अनेक प्रश्न अनुत्तरीत सोडलेस…” मयुरी देशमुखकडून भावनांना वाट मोकळी

(Actress Mayuri Deshmukh to make come back in Serial Imlie)

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.