भाडेकरु आणि घरमालकाच्या पत्नीचा मृतदेह सापडला, अहमदनगरमध्ये खळबळ
विवाहबाह्य संबंधातून दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
अहमदनगर : अहमदनगरमध्ये भाडेकरु आणि घरमालकाच्या पत्नीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विवाहबाह्य संबंधातून दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. (Ahmednagar Extra Marital affair Couple Suicide)
पाथर्डी तालुक्यातील माणिकदौडी परिसरात बोरसेवाडी गावाजवळ हा प्रकार घडला. महिला आणि पुरुष अशा दोघांचे मृतदेह सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास आढळले होते.
रस्त्याच्या कडेला बाईक पार्क केलेली होती, त्यापासून 100 मीटर अंतरावर मृतदेह सापडले. दोघांचा विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे.
हेही वाचा : ‘कहानी घर घर की’ फेम अभिनेत्याचा मृतदेह मुंबईतील राहत्या घरी सापडला
35 वर्षीय पुरुषाकडील कागदपत्राच्या आधारे इंद्रजित वाल्मिक इंगळे अशी त्यांची ओळख पटली. मोबाईलवर आलेल्या मिस कॉलवर संपर्क करुन त्यांचे वडील वाल्मिक इंगळे यांना माहिती दिली.
इंद्रजित यांच्यासह मृतावस्थेत सापडलेली महिला त्यांची सून नसल्याचे पोलिसांना समाजले. तेव्हा अधिक चौकशी केली असता संबंधित महिला इंद्रजित यांचे घरमालक बाळासाहेब सानप यांची पत्नी रेखा असल्याची माहिती मिळाली. 30 वर्षीय रेखा सानप बहिणीला भेटायला जामखेडला जाऊन येते, असे सांगून त्या निघाल्या होत्या.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
दोघेही औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील रहिवासी असून दोघेही विवाहित होते. पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी घटनास्थळी गेले. एचसी रांजणे अधिक तपास करत आहेत.
(Ahmednagar Extra Marital affair Couple Suicide)