Arnab Goswami | अर्णव गोस्वामी प्रकरण : न्यायालयात नेमकं काय घडलं?

अर्णव गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

Arnab Goswami | अर्णव गोस्वामी प्रकरण : न्यायालयात नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 9:13 AM

अलिबाग : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अर्णव गोस्वामी यांना पोलीस कोठडी देण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळली. अर्णव गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. त्यानंतर अर्णव गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. आज दुपारी यावर सुनावणी होणार. त्यांच्यावर लावण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे (Alibaug Court Sent Arnab Goswami To Judiacial Custody).

या प्रकरणातील अन्य आरोपी फिरोज शेख आणि नितेश सारडा यांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अन्वय नाईक प्रकरणात न्यायालयात नक्की काय झालं?

अलिबाग पोलिसांनी सकाळच्या सत्रात साडे 12 वाजता अर्णव गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयात हजर केलं.

अर्णव गोस्वामीच्या वकिलांचा युक्तिवाद

आमच्या आशीलाला कोणतीही पूर्वसूचना न देता घरात घुसून अटक केलेली आहे. हे सगळं करताना त्यांना धक्काबुक्की आणि मारहाण झाली. त्यामध्ये त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या. त्यामुळे पोलिसविरोधात तक्रार दाखल केली

न्यायाधीशांचे आदेश

आरोपीची वैद्यकीय तपासणी करुन अहवालासाहित दुपारनंतरच्या सत्रात पुन्हा कोर्टात हजर राहण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिली. संध्याकाळनंतरच्या सत्रात 5 वाजता अर्णव गोस्वामी आणि त्यानंतर इतर दोन आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले.

न्यायाधीशांनी मारहाणीची तक्रार फेटाळली

आरोपीचा वैद्यकीय तपासणी अहवाल पाहिल्यानंतर तसेच वैद्यकीय अधिक्षकांचे मत जाणून घेतल्यानंतर पोलिसांनी मारहाण केल्याचे स्पष्ट होत नसल्याने तक्रार फेटाळली.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद

अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांनी केलेल्या आत्महत्येस या प्रकरणातील तीनही आरोपी जबाबदार आहेत. याबाबतचा रीतसर गुन्हा दाखल झाला होता. त्याचा योग्य तपास झाला नाही. म्हणून केस रीओपन होऊन नव्याने तपास सुरु केला. त्यामध्ये प्राथमिक चौकशीत सकृतदर्शनी पुरावे संबंधित आरोपींच्या विरोधात पोलिसाकडे आहेत. त्यामुळे अधिक तपासासाठी आणि चौकशीसाठी 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

अर्णव गोस्वामींच्या वकिलांचा युक्तीवाद

मे 2018 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात 2 वर्षात तपासादरम्यान पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे या आरोपीवर कारवाई न करता उलट याच पोलिसांनी माननीय न्यायालयात प्रकरण बंद करण्याचा (क्लोजर रिपोर्ट) देऊन हे प्रकरण संपुष्टात आणले होते. त्यामुळे यामध्ये नव्याने कोणतेही पुरावे पोलिसांकडे नाहीत. केवळ आकसापोटी सूडबुद्धीने ही कारवाई केली असल्याने तसेच आरोपींकडून कोणतीही रिकव्हरी नसल्याने पोलीस कोठडीची गरज नाही (Alibaug Court Sent Arnab Goswami To Judiacial Custody).

न्यायाधीशांनी काय निर्णय दिला?

दोन्हीकडचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पोलीस कोठडीसाठी आवश्यक असणारे मुद्दे तसेच पुरावे पोलिसांनी यावेळी न्यायालयासमोर सादर केलेले दिसत नाहीत. त्याचसोबत क्लोजर रिपोर्टनंतर यावर सुनावणी किंवा फेरतपासणीची कोणतीही कारवाई झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत नाही. यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता वाटत नाही, असं न्यायाधीशांनी सांगितलं. या सगळ्या सुनावणीनंतर आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

अर्णव गोस्वामींकडून गौरव पारकर तर अन्वय नाईक यांच्याकडून विलास नाईक यांनी न्यायालयात बाजू मांडली.

Alibaug Court Sent Arnab Goswami To Judiacial Custody

संबंधित बातम्या:

Arnab Goswami Arrest | अर्णव गोस्वामी यांना अटक झाली तो क्षण, घरात नेमकं काय घडलं?

अर्णव गोस्वामी ‘उसूलों पे चला होगा’; अमृता फडणवीसांकडून पाठराखण

‘भाजपचा पोपट पिंजऱ्यात अडकला’, शिवसेनेचा टोला!, तर ‘पोपट आम्ही नाही, शिवसेनाच पाळते’, भाजपचं प्रत्युत्तर

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.