अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कुटुंब सोन्याच्या ताटात जेवणार?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली जात (Donald Trump eat in gold plate) आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली जात (Donald Trump eat in gold plate) आहे. ट्रम्प कुठे उतरणार, कुठे राहणार या सर्व गोष्टी ठरवल्या आहेत. ट्रम्प यांच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यामध्ये ट्रम्प यांच्या कुटुंबियांना भारतीय पद्धतीचे जेवण सोने आणि चांदीच्या ताटात दिले जाणार आहे. यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती मिळत (Donald Trump eat in gold plate) आहे.
सोन्याच्या ताटात जेवण
भारतीय दौऱ्यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे परिवार सोने आणि चांदीच्या ताटात नाश्ता, जेवण करणार आहेत. याशिवाय सोने-चांदीच्या कपमध्ये ट्रम्प यांना चहा दिली जणार आहे. जयपूरचे प्रसिद्ध डिझायनर अरुण पाबूवालने ट्रम्पच्या कुटुंबियांच्या वापरासाठी स्पेशल टेबल वेअर डिझाईन केला आहे.
ट्रम्प भारत दौऱ्या दरम्यान अहमदाबादच्या ऐतिहासिक मोटेरा स्टेडियममध्ये जाणार आहेत. त्यानंतर ते दिल्ली येथे कार्यक्रमासाठी जाणार आहेत. दिल्ली येथे ट्रम्प आग्रा आणि ताजमहल या ठिकाणी भेट देणार आहेत. यासाठीही आग्राचे स्थानिम महापौर यांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे.