चीन-अमेरिकेतली तणातणी वाढली, अमेरिकेचे 24 तासात दोन निर्णय, चीनच्या चिंतेत वाढ

अमेरिकेनं फक्त 24 तासांच्या अंतरात घेतलेले दोन निर्णय चीनला धडकी भरवण्यासाठी पुरेसे (America VS China On Chinese embassy closed) आहेत.

चीन-अमेरिकेतली तणातणी वाढली, अमेरिकेचे 24 तासात दोन निर्णय, चीनच्या चिंतेत वाढ
Follow us
| Updated on: Jul 24, 2020 | 10:58 PM

नवी दिल्ली : अमेरिकेनं फक्त 24 तासांच्या अंतरात घेतलेले दोन निर्णय चीनला धडकी भरवण्यासाठी पुरेसे आहेत. भारत-चीन सीमेवरच्या हालचाली थंड पडल्या असल्या तरी चीन-अमेरिकेतली तणातणी मात्र तसूभरही कमी झालेली नाही. (America VS China On Chinese embassy closed)

अमेरिकेनं ह्यूस्टनमधला चीनचा दुतावास बंद करण्याचं फर्मान जारी केलं आहे. म्हणजे पुढच्या 72 तासात चीनच्या अधिकाऱ्यांना गाशा गुंडाळून मायदेशी परतावं लागेल. देशातंर्गत सुरक्षेसाठी हे मोठं पाऊल उचलल्याचं कारण ट्रम्प सरकार देतं आहे.

चीनच्या हकालपट्टीला भलेही अमेरिका सरकार देशातंर्गत सुरक्षेचं कारणं देत असेल, मात्र हे दोन्ही निर्णय चीनविरोधातल्या संतापाचा बांध फुटत असल्याचे संकेत आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

अमेरिकेचं सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेतून कधीच बाहेर पडलं आहे. त्याची पुरेपूर कल्पना चीनला सुद्धा असल्यामुळे चीनही अमेरिकेच्या प्रत्येक वारावर प्रतिवार करतो आहे. मात्र अमेरिकेचे मंत्री जे ऑनरेकॉर्ड बोलतात, त्या विधानांचा अर्थ थेट आर-पारच्या मूडचा आहे.

तिकडे चीननं सुद्धा तोडीस तोड उत्तर देण्यासाठी कंबर कसली आहे. चिनी सरकार आपल्या सैनिकांना सज्ज राहण्याचे आदेश देतं आहे. मात्र चीनला परिणामांची चिंता सुद्धा सतावते आहे. म्हणूनच चीन थेट युद्धाऐवजी अजूनही चर्चेची भाषा वापरतो आहे. मात्र अमेरिकेनं याआधीच चर्चेची सर्व दारं बंद केल्याचं स्पष्ट केलं आहे. (America VS China On Chinese embassy closed)

अमेरिकेनं चीनच्या दुतावासाला कुलूप ठोकताच चीननं दुसऱ्याच सेकंदाला कपटी डाव खेळला. कारण, जेव्हा चीनचा दुतावास बंद करण्याचं फर्मान निघालं. बरोबर तेव्हाच चीनच्या त्याच दुतावासाला आग लागली.

ही आग चीन सरकारचं कारस्थान मानली जाते आहे. याच आगीत चीन दुतावासात असलेली अमेरिकेतली गुप्त माहिती चिनी अधिकाऱ्यांनी जाळल्याचा संशय व्यक्त होतो आहे. आगीदरम्यान काही अधिकाऱ्यांनी जळत असलेल्या खोलीत काही फाईल्स सुद्धा फेकल्याची माहिती आहे. चीन दुतावास बंद झाल्यानंतर त्याचा ताबा हा साहजिकपणे अमेरिकेकडे गेला असता. पण, अमेरिकेच्या हाती काहीही लागण्याआधीच चीननं साऱ्या कागदांची राख करुन टाकली.

मात्र पुरावे मिटवले तरी पाप मिटत नाही. चीननं लावलेली हीच आग युद्धाच्या ज्वाळा भडकवण्यासाठी कारणीभूत ठरु शकते. खुद्द ट्रम्प या आगीच्या घटनेला चीनच्या कपटीपणाचा पुरावा समजतात.

हेही वाचा – India China Conflict | चीनचा दुतोंडीपणा, पँगाँग, शिनजियांग भागात चिनी सैन्य तैनात

ही आग लागली? की मग लावली गेली? हा चौकशीचा विषय आहे. मात्र पलटवार म्हणून चीननं सुद्धा वुहानमध्ये असलेला अमेरिकेचा व्यापारी दुतावास बंद करण्याची तयारी केली आहे. वुहाननंतर हाँगकाँगमधला अमेरिकेचा दुतावासही बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. जाणकारांच्या मते जर चीननं हाँगकाँगमधला अमेरिकन दुतावास बंद करण्याचा निर्णय घेतला, तर हा निर्णय म्हणजे अमेरिकेवरचा वर्मी घाव असेल आणि हाच घाव युद्धाचं निमंत्रण ठरेल…

जेव्हा वुहानमध्ये कोरोनाच्या चौकशीची टीम दाखल होणार होती. तेव्हा चीनवर वुहान पाण्यात बुडवल्याचे आरोप झाले. जेव्हा अमेरिकेनं चिनी दुतावास ताब्यात घेतलं, तेव्हा दुसऱ्याच सेकंदाला ते आगीत खाक झालं. या घडीला चीनला आग लावणं आणि शहर पाण्यात बुडवणं सोपं वाटतं आहे. मात्र त्यातून जर युद्धाचा वणवा पेटला, तर ती आग विझवता-विझवता चीनला नाकीनऊ येणार आहेत. (America VS China On Chinese embassy closed)

संबंधित बातम्या : 

सुपरपॉवर अमेरिकेच्या गुप्त शस्त्रसाठ्यावर चीनचा डोळा, हल्ल्याच्या भीतीने अमेरिकाही सतर्क

चीनचे सर्व फासे उलटे पडणार, भारतीय वायुदलात आकाशातला सर्वात मोठा योद्धा दाखल होणार

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.