यूपी, दिल्लीतून गाड्या चोरायचे अन् महाराष्ट्रात विकायचे, पण अखेर जाळ्यात फसलेच !

सातारा स्थानिक गुन्हे शाखेला एक गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचला अन् संशयित आरोपींना ताब्यात घेतले. यानंतर पोलीस चौकशीत आरोपींकडून घबाड हाती लागले.

यूपी, दिल्लीतून गाड्या चोरायचे अन् महाराष्ट्रात विकायचे, पण अखेर जाळ्यात फसलेच !
वाहन चोरणारी आंतरराज्यीय टोळी अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 5:41 PM

संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा : सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी आणि चार चाकी गाड्या चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद केली आहे. या आरोपींकडून 10 चारचाकी वाहने आणि 8 दुचाकी असा एकूण 1 कोटी 18 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींनी बहुतांशी वाहने ही उत्तर प्रदेश दिल्लीहून चोरी केली आहेत. यामध्ये 1 व्हॅगनार कार, 1 इनोवा क्रिस्टा, 4 क्रेटा कार, 1 ब्रिझा मारुती, 1 होंडा सिटी कार, 1 मारुती स्विफ्ट कार, 1 मारुती बलेनो अशा 10 आधुनिक गाड्यांचा समावेश आहे. तर दुचाकीमध्ये होंडा, अॅक्टिव्हा, मोपेड अशा 8 गाड्यांचा समावेश आहे.

सातारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

उत्तर प्रदेश, दिल्ली या ठिकाणाहून चोरी केल्यानंतर या टोळीने सातारा,रायगड जिल्ह्यामध्ये गाड्यांची विक्री केली होती. सातारा स्थानिक गुन्हे शाखेला याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी रहिमतपूर येथील अजीम सलीम पठाण आणि कोल्हापूर येथील अजित अण्णाप्पा तिपे या दोन चारचाकी वाहने चोरणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली.

या दोघांची चौकशी केली असता संबंधित आरोपींनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या पाच आरोपींची नावे सांगितली. यामध्ये साताऱ्यातील कोडोली येथील महेश अवघडे, बाबाची वाडी येथील संतोष बाबर, कोंडवे येथील वैभव बाबर, मसूर येथील कृष्णात रत्नकांत काकडे, उंब्रज येथील अमित बैले या पाच आरोपींचा समावेश आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने सर्व आरोपींना चारचाकी आणि दुचाकी प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सातारा स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.

हे सुद्धा वाचा

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.