नरेंद्र मोदींचं आजपर्यंतचं सर्वाधिक आवडलेलं भाषण, अविश्वसनीय…; कुणाचं विधान?

Anjali Damania on PM Narendra Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कौतुक केलंय. मात्र त्यांनी काही सवालही उपस्थित केले आहेत. अंजली दमानिया यांनी काय म्हटलं आहे? सूरज चव्हाणांच्या टीकेला उत्तर देताना काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...

नरेंद्र मोदींचं आजपर्यंतचं सर्वाधिक आवडलेलं भाषण, अविश्वसनीय...; कुणाचं विधान?
Follow us
| Updated on: May 29, 2024 | 5:01 PM

आतापर्यंत पाहिले लोकसभेच्या भाषणांपैकी मला सर्वात आवडलेलं भाषण आहे. नरेंद्र मोदींनी अविश्वसनीय भाषण दिलं. हे भाषण ऐकल्यावर मला काही सुचेना…उत्कृष्ट भाषण मोदींनी केलं. जसं त्यांनी लोकसभेत सांगितलं मोदींची गॅरंटी आहे. मी जे म्हणतो ते होणार आणि त्यानंतर परत असं एक इंटरेस्टिंग भाषण झालं. मोदींनी एक ट्विट केलं की, जिसने खाया है उससे बाहर निकालूंगा… जिसका खाया है उसको लौटाऊंगा हे ऐकल्यावर इतकं समाधान झालं, असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. त्या टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या.

नरेंद्र मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया

मुद्दाम मला सांगावसं वाटलं की मी ते ट्विट देखील केलं. मोदींची गॅरंटी त्यांनी परत परत जनतेला दिली. ही पण गॅरंटी आहे का? आणि असेल तर महाराष्ट्राचे 70 हजार चा जो स्कॅम झाला नंतर तो एक लाख दहा हजार कोटीपर्यंत गेला. त्या सिंचन घोटाळ्याचे पैसे अजित पवारांकडून परत घेणार का? आणि महाराष्ट्राला परत देणार का हा सगळ्यात मोठा सवाल आहे, असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली. याला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं. अंजली दमानिया यांची नार्को टेस्ट करा. अंजली दमानिया कुणाच्या सांगण्यावरून काम शकतात. त्या नेत्या नाहीत रिचार्जवर चालणारी बाई आहे. सुपारी मिळाली की मागे लागतात, असं सूरज चव्हाण म्हणाले.

सूरज चव्हाणांच्या टीकेला प्रत्युत्तर

सूरज चव्हाण यांच्या टीकेला अंजली दमानिया यांनी प्रत्युत्तर दिलंय. राजकारणात यांना महिलेने काही बोललेलं अजिबात खपून घेत नाही. त्या महिलेला बाजूला करायचा असेल तर तिच्याबद्दल खालच्या दर्जाचा आणि वाटेल ते बोलायचं. सूरज चव्हाण आणि अजित पवारांना माझं वॉर्निंग आहे. त्यांनी जी भाषा आता वापरली ही बाई काय रिचार्जवर काम करते, सुपारी घेते. असले फालतू डायलॉग त्यांनी त्यांच्या खिशात ठेवावेत. यापुढे मला माफी पाहिजे. त्याने जर माफी दिली नाही. तर या व्यक्तीला मी सोडणार नाही, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.